Mr. Keki M MistryChairman
श्री. केकी एम. मिस्त्री (DIN: 00008886) हे कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत. . ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे फेलो आहेत. ते वर्ष 1981 मध्ये हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) मध्ये सहभागी झाले आणि वर्ष 1993 मध्ये त्यांची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. वर्ष 1999 मध्ये डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आणि वर्ष 2000 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर झाले. त्यांची ऑक्टोबर 2007 मध्ये एचडीएफसीचे व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली. जानेवारी 1, 2010 पासून व्हाईस चेअरमन आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. सध्या ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स वरील CII राष्ट्रीय परिषदेचे चेअरमनआहेत आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे स्थापित प्रायमरी मार्केट सल्लागार समितीचे सदस्य आहेत. ते सेबीद्वारे स्थापित कॉर्पोरेट गव्हर्नन्स समितीचे देखील सदस्य होते.
Ms. Renu Sud KarnadNon-Executive Director
श्रीमती रेणु सुद कर्नाड (DIN: 00008064) या कंपनीच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. श्रीमती कर्नाड या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचडीएफसी) मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात आणि मुंबई युनिव्हर्सिटीतून कायद्यातील बॅचलर डिग्री संपादित केली आहे. त्या अमेरिका स्थित प्रिन्स्टन युनिर्व्हसिटीच्या वूड्रो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेयर्सच्या पार्विन फेलो आहेत. त्या वर्ष 1978 मध्ये एचडीएफसी मध्ये सहभागी झाल्या आणि वर्ष 2000 मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर 2007 मध्ये एचडीएफसीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात आली. श्रीमती कर्नाड या जानेवारी 1, 2010 पासून एचडीएफसीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. श्रीमती कर्नाड सध्या ग्लोबल हाऊसिंग फायनान्स फर्म्स असोसिएशनच्या इंटरनॅशनल युनियन फॉर हाऊसिंग फायनान्स (IUHF) च्या अध्यक्ष आहेत.
Mr. Bernhard SteinrueckeIndependent DIrector
श्री. बर्नहार्ड स्टेनरुके (DIN: 01122939) हे 2003 पासून ते 2021 पर्यंत इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर होते. त्यांनी व्हिएन्ना, बॉन, जिनिव्हा आणि हेडलबर्ग येथे कायदा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि 1980 (ऑनर्स डिग्री) मध्ये हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीतून कायद्याची डिग्री संपादित केली आणि 1983 मध्ये हॅम्बर्गच्या उच्च न्यायालयात बार परीक्षा उत्तीर्ण केली. श्री. स्टेनरुके हे डॉइचे बँक इंडियाचे को-CEO आणि ABC प्रायव्हेटकुंडन-बँक, बर्लिन बोर्डाचे को-ओनर आणि स्पीकर होते. श्री. स्टेनरुके यांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी सप्टेंबर 9, 2016 पासून कार्यभार सांभाळला आणि सलग 5 वर्षांच्या अन्य कालावधीसाठी इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले. त्यांनी सप्टेंबर 9, 2021 पासून कार्यभार सांभाळला
Mr. Mehernosh B. Kapadia Independent Director
श्री. मेहरनोश बी. कपाडिया (DIN: 00046612) यांनी कॉमर्स मध्ये मास्टर्स डिग्री (ऑनर्स) संपादित केली आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे मेंबर्स आहेत. त्यांच्या 34 वर्षांच्या एकूण कॉर्पोरेट कारकीर्द पैकी सर्वाधिक काळ ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लिमिटेड (GSK) मध्ये राहिला. जिथे त्यांनी 27 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ते डिसेंबर 1, 2014 रोजी GSK चे सिनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे फायनान्स आणि कंपनी सचिवालय संबंधित बाबींची जबाबदारी होती. इन्व्हेस्टर संबंध, कायदेशीर आणि अनुपालन, कॉर्पोरेट घडामोडी, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, प्रशासन आणि माहिती तंत्रज्ञान यासह GSK सह त्यांच्या कार्यकाळात त्यांनी इतर कार्यांसाठी मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी देखील सांभाळली आहे आणि अनेक वर्षे कंपनी सचिव पदावर काम केले आहे. श्री कपाडिया यांची 5 वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सप्टेंबर 9, 2016 पासून कार्यभार सांभाळला आणि सलग 5 वर्षांच्या अन्य कालावधीसाठी इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले. त्यांनी सप्टेंबर 9, 2021 पासून कार्यभार सांभाळला.
Mr. Arvind MahajanIndependent Director
श्री. अरविंद महाजन (DIN: 07553144) हे कंपनीचे इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. त्यांनी दिल्ली स्थित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून (बी.कॉम ऑनर्स) ग्रॅज्युएट व IIM अहमदाबाद येथून मॅनेजमेंट विषयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा संपादित केला आहे.
श्री. महाजन यांच्याकडे मॅनेजमेंट कन्सल्टिंग आणि इंडस्ट्रीमध्ये 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांच्या मॅनेजमेंट कन्सल्टिंग अनुभवामध्ये AF फर्ग्यूसन अँड कॉ. प्राईस वॉटरहाऊस कूपर्स, IBM ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस आणि सर्वात अलीकडेच KPMG सह पार्टनर म्हणून 22 वर्षांपेक्षा जास्त अनुभव समाविष्ट आहे. त्यांच्याकडील इंडस्ट्री अनुभवात प्रॉक्टर अँड गॅम्बल सोबतचा फायनान्शियल मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट रिपोर्टिंगमधील अनुभवाचा अंतर्भाव आहे.
श्री. महाजन यांची कंपनीचे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून दुसऱ्या टर्म साठी 14 नोव्हेंबर 2016 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. पुन्हा त्यांची इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून 14 नोव्हेंबर 2021 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती
Mr. Ameet P. HarianiIndependent Director
श्री. अमित पी. हरियानी (DIN:00087866) यांच्याकडे कॉर्पोरेट आणि कमर्शियल लॉ, विलिनीकरण आणि अधिग्रहण, रिअल इस्टेट आणि रिअल इस्टेट फायनान्स ट्रान्झॅक्शन याविषयी कस्टमरला सल्ला देण्याचा 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन्स, आर्बिट्रेशन्स आणि प्रमुख खटल्यांमध्ये प्रख्यात संस्थांचे प्रतिनिधित्व केले आहे.. ते अंबुभाई आणि दिवाणजी, मुंबई, अँडरसन लीगल इंडिया, मुंबई येथे पार्टनर होते आणि हरियानी अँड कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग पार्टनर होते. त्यांनी ज्युनिअर वकील ते विख्यात अनुभवी वरिष्ठ कायदेशीर सल्लागार असा पल्ला गाठला आहे.. त्यांनी आर्बिट्रेटर म्हणूनही काम पाहिले. त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी आणि मुंबई युनिव्हर्सिटीतून कायद्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.. ते बॉम्बे इनकॉर्पोरेटेड लॉ सोसायटी आणि लॉ सोसायटी ऑफ इंग्लंड अँड वेल्समध्ये नोंदणीकृत असलेले सॉलिसिटर आहेत. ते लॉ सोसायटी ऑफ सिंगापूर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि बॉम्बे बार असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. श्री. हरियानी यांची जुलै 16, 2018 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती.
Mr. Sanjib ChaudhuriIndependent Director
श्री. संजीव चौधरी (DIN: 09565962) यांच्याकडे भारतातील नॉन-लाईफ इन्श्युरन्स आणि रि-इन्श्युरन्स इंडस्ट्रीमधील चाळीस वर्षांहून अधिक वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. ते वर्ष 1979 पासून ते 1997 पर्यंत नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडसह जोडले गेले होते आणि वर्ष 1997 पासून ते 2014 पर्यंत म्युनिच रिइन्श्युरन्स कंपनीचे भारतातील मुख्य प्रतिनिधी होते. 2015 ते 2018 पर्यंत, पॉलिसीधारकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी IRDAI द्वारे नामनिर्देशित जनरल इन्श्युरन्स कौन्सिलच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य म्हणून पदभार सांभाळला. श्री चौधरी हे हेल्थ इन्शुरन्स फोरम, IRDAI चे सदस्य देखील आहेत. वर्ष 2018 पासून IRDAI द्वारे कंझ्युमर प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित आहेत आणि IRDAI द्वारे रि-इन्श्युरन्स, इन्व्हेस्टमेंट, FRB आणि लॉयड्स इंडिया संबंधी रेग्युलेशन मध्ये सुधारणांची शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य होते.
Dr. Rajgopal ThirumalaiIndependent Director
डॉ. राजगोपाल तिरुमलई (DIN:02253615) हे नामांकित हेल्थकेअर प्रोफेशनल आहेत. ज्यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, पब्लिक हेल्थ, ऑक्युपेशनल हेल्थ आणि हेल्थ आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन सोबतच इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स, ब्रोकर्स आणि प्रोव्हायडर्स सह डील करण्याचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी युनिलिव्हर ग्रूप समवेत जवळपास तीस वर्षे काम केले आहे आणि युनिलिव्हर PLC मध्ये 'व्हाईस प्रेसिडेंट', ग्लोबल मेडिकल व ऑक्युपेशनल हेल्थ सारख्या पदांवर विराजमान होते. ज्याअंतर्गत त्यांनी जगभरातील 155,000 हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी महामारी प्रतिरोध, ग्लोबल हेल्थ इन्श्युरन्स, मेडिकल आणि ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिसेस (शारीरिक व मानसिक देखभाल)सहित कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअरच्या संदर्भात रणनीतीकार आणि नेतृत्व प्रदान करण्याचे काम करत होते. डॉ. राजगोपाल यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वर्कप्लेस वेलनेस अलायन्स लीडरशीप बोर्डचे सदस्य म्हणून युनिलिव्हरचे प्रतिनिधित्व केले आहे.. त्यांच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये हेल्दी वर्कप्लेसचा अवॉर्ड जिंकला होता. ते ऑगस्ट 2017 ते मार्च 2021 पर्यंत अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायजेस लिमिटेड आणि अपोलो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून कार्यभार पाहिला आहे. त्यांनी एप्रिल 2021 पासून मार्च 2022 पर्यंत मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलसाठी COO म्हणूनही काम केले. डॉ. राजगोपाल यांना डॉ. बी.सी रॉय नॅशनल अवॉर्ड (मेडिकल फिल्ड) द्वारे गौरविण्यात आले. हा अवॉर्ड 2016 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे प्रदान करण्यात आला होता.
Mr. Vinay Sanghi Independent Director
श्री. विनय संघी (DIN: 00309085) यांच्याकडे ऑटो इंडस्ट्रीमधील तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. श्री. संघी हे कारट्रेड टेकचे संस्थापक आणि चेअरमन आहेत आणि कारवाले, बाईकवाले, ॲड्रॉईट ऑटो आणि श्रीराम ऑटोमॉल संपादित करण्याद्वारे मार्केटमध्ये नेतृत्व प्रस्थापित करण्यात आणि एकत्रीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. यापूर्वी ते महिंद्रा फर्स्ट चॉईस व्हील्स लिमिटेडचे CEO होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली युज्ड-कार सेगमेंट मधील भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक होण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. ते शाह आणि संघी ग्रूप ऑफ कंपन्यांचे देखील पार्टनर होते.
Mr. Edward Ler
Non-Executive Director
श्री. एडवर्ड लेर (DIN: 10426805) हे कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. ते UK मधील ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीत रिस्क मॅनेजमेंटमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (डिस्टिंक्शनसह) सह ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांच्याकडे चार्टर्ड इन्श्युरन्स इन्स्टिट्यूट, U.K. कडून चार्टर्ड इन्श्युरन्स पद आहे. सध्या ते चीफ अंडररायटिंग ऑफिसर आणि एर्गो ग्रुप AG ("एर्गो") च्या मॅनेजमेंट बोर्डचे सदस्य आहेत, आणि एर्गोच्या कंझ्युमर इन्श्युरन्स पोर्टफोलिओ आणि कमर्शियल प्रॉपर्टी/कॅज्युअल्टी पोर्टफोलिओ, लाईफ, हेल्थ आणि ट्रॅव्हल साठी जागतिक क्षमता केंद्र, प्रॉपर्टी/कॅज्युअल्टी प्रॉडक्ट मॅनेजमेंट, क्लेम आणि रिइन्श्युरन्ससाठी जबाबदार आहेत.
Dr. Oliver Martin Willmes Non Executive Director
डॉ. विल्यम्स (DIN: 08876420) हे कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. त्यांनी कोलोन युनिव्हर्सिटीत बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे धडे गिरवले आहेत. डॉ. विल्यम्स यांनी अमेरिका स्थित ईस्टर्न इलिनॉईस युनिव्हर्सिटी मधून MBA पूर्ण केले आहे. डॉ. विल्यम्स सध्या एर्गो इंटरनॅशनल AG येथे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि सध्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन आहेत.
Mr. Samir H. ShahExecutive Director & CFO
श्री. समीर एच. शाह (DIN: 08114828) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (FCA) फेलो मेंबर आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ACS) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (ACMA) असोसिएट मेंबर आहेत. त्यांची वर्ष 2006 मध्ये कंपनीमध्ये नेमणूक झाली आणि जवळपास 31 वर्षांचा कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ज्यापैकी जनरल इन्श्युरन्स सेक्टरमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. श्री. शाह यांची जून 1, 2018 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CFO म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि सध्या कंपनीच्या फायनान्स, अकाउंट, टॅक्स, सेक्रेटरिअल, लीगल व कम्प्लायन्स, रिस्क मॅनेजमेंट, अंतर्गत ऑडिट कार्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.
श्री. अनुज त्यागीमॅनेजिंग डायरेक्टर व CEO
श्री. अनुज त्यागी (DIN: 07505313) वर्ष 2008 मध्ये एचडीएफएसी एर्गो मध्ये कमर्शियल बिझनेस डिपार्टमेंटचे हेड म्हणून जॉईन झाले आणि तेव्हापासून त्यांनी बिझनेस, अंडररायटिंग, रि-इन्श्युरन्स, टेक्नॉलॉजी आणि मनुष्यबळ सनियंत्रण सारख्या विविध विभागात त्यांनी आघाडीच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. श्री. अनुज वर्ष 2016 पासून बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य आहेत आणि जुलै 1, 2024 पासून कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कंपनीचे सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. अनुज हे गेल्या 26 वर्षापासून भारतातील आघाडीच्या फायनान्शियल संस्था आणि इन्श्युरन्स ग्रूपमध्ये कार्यरत आहे.
श्री. अनुज हे फायनान्शियल सुरक्षिततेचे जाळे निर्माण करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला इन्श्युरन्सची उपलब्धता वाढवण्यास उत्सुक आहेत आणि त्याचवेळी ते कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे संबंधित लोकांना दिला जावा असा वेगळा अनुभव तयार करण्यासाठी बिझनेस/जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी आणण्यासाठी उत्साहाने काम करत आहेत.