हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

  • तुमच्या हेल्थ पॉलिसी संदर्भात महत्त्वाचे अपडेट!

  • कृपया लक्षात घ्या की 15 एप्रिल 2023 पासून, रिएम्बर्समेंटच्या आधारावरील क्लेम्ससाठीचे हॉस्पिटलायझेशन नियोजित उपचारांसाठी किमान 48 तासांपूर्वी आणि आपत्कालीन हॉस्पिटलायझेशनसाठी 24 तासांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे. हे आम्हाला सुरळीत अनुभवासाठी तुमच्या क्लेमवर प्री-प्रोसेस करण्यास मदत करेल. कृपया येथे क्लिक करून क्लेम सूचित करा



स्टेप 1. हॉस्पिटलायझेशन

हे कोण करेल : पॉलिसीधारक
काय केले पाहिजे? नजीकचे नेटवर्क हॉस्पिटल शोधण्यासाठी येथे क्लिक करा

स्टेप 2. कॅशलेस हॉस्पिटलायझेशनचा लाभ घ्या आणि डॉक्युमेंट्स सादर करा

हे कोण करेल : पॉलिसीधारक
काय केले पाहिजे? तुमचे हेल्थ कार्ड आणि वैध फोटो ID दाखवून नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळवा

स्टेप 3. प्री-ऑथोरायझेशन

हे कोण करेल: नेटवर्क हॉस्पिटल
काय केले पाहिजे? हॉस्पिटल एचडीएफसी एर्गोला कॅशलेस विनंती पाठवेल आणि प्री-ऑथोरायझेशन फॉर्म साठी आमच्याशी समन्वय साधेल .

स्टेप 4. डिस्चार्ज आणि क्लेम सेटलमेंटच्या वेळी

हे कोण करेल: एचडीएफसी एर्गो
काय केले पाहिजे? एचडीएफसी एर्गो/ TPA सर्व प्राप्त डॉक्युमेंटची छाननी करेल आणि क्लेमवरील अंतिम भूमिका सांगेल.

स्टेप 5. स्टेटस अपडेट

हे कोण करेल: एचडीएफसी एर्गो
काय केले पाहिजे? तुम्हाला क्लेमच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID वर SMS/ईमेलद्वारे अपडेट प्राप्त होईल.

स्टेप 6. कॅशलेस अधिकृतता आणि क्लेमची मंजुरी

हे कोण करेल: एचडीएफसी एर्गो आणि नेटवर्क हॉस्पिटल
काय केले पाहिजे? अधिकृततेसाठी हॉस्पिटल एचडीएफसी एर्गोला अंतिम बिल पाठवेल आणि एचडीएफसी एर्गो त्याची छाननी करेल आणि हॉस्पिटलला मंजूर ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत अंतिम अधिकृतता देईल. कोणतेही अस्वीकार्य खर्च, को-पेमेंट, वजावट तुम्हाला भरावे लागतील.

डॉक्युमेंट चेक लिस्ट

  • संपूर्ण डॉक्युमेंट्स प्राप्त झाल्यानंतर, शेवटचे डॉक्युमेंट प्राप्त झाल्यापासून 2 तासांमध्ये क्लेमवर प्रोसेस केली जाईल.
    ( अंतर्गत व्हेरिफिकेशनच्या बाबतीत एचडीएफसी एर्गो/TPA द्वारे शेवटचे डॉक्युमेंट प्राप्त झाल्यापासून 24 तासांच्या आत अंतिम भूमिका कन्फर्म केली जाईल )

स्टेप 1. क्लेम रजिस्ट्रेशन


रिएम्बर्समेंट किंवा सप्लीमेंटरी क्लेम रजिस्टर करण्यासाठी आणि डॉक्युमेंट्स त्वरित अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (फाईलची साईझ प्रत्येक डॉक्युमेंटसाठी 8MB असावी). तुमच्या पुढील संदर्भासाठी KYC / NEFT आणि डिजिटल क्लेम फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लिंक येथे नमूद केल्या आहेत. येथे क्लिक करा KYCNEFT, डिजिटल क्लेम फॉर्म. जर तुमचा क्लेम यापूर्वीच रजिस्टर्ड असेल तर कृपया येथे क्लिक करा तुमचे डॉक्युमेंट्स त्वरित अपलोड करण्यासाठी.

स्टेप 2. क्लेमचे प्रोसेसिंग


तुम्ही डॉक्युमेंट्स शेअर केल्यानंतर, एचडीएफसी एर्गोच्या डॉक्टरांची टीम सर्व डॉक्युमेंट्स रिव्ह्यू करेल. सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स समाधानकारकरित्या प्राप्त झाल्यानंतर एचडीएफसी एर्गोच्या अटी व शर्तींनुसार शेवटचे डॉक्युमेंट मिळाल्याच्या 15 दिवसांत क्लेम प्रोसेस केला जाईल. तुम्हाला क्लेमच्या प्रत्येक टप्प्यावर SMS/ईमेलद्वारे क्लेम स्टेटससह अपडेट देखील प्राप्त होईल. तुम्ही येथे तुमचे क्लेम स्टेटस त्वरित ट्रॅक देखील करू शकता
येथे क्लिक करा

स्टेप 3. अतिरिक्त/प्रलंबित डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी प्रोसेस


कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा डॉक्युमेंट्स आवश्यक असल्यास, एचडीएफसी एर्गो त्यासाठी SMS आणि ईमेलद्वारे सूचना पाठवेल आणि तुम्ही येथे नमूद लिंकद्वारे ते अपलोड करू शकता. शंका /प्रलंबित डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स समाधानकारकरित्या प्राप्त झाल्यानंतर एचडीएफसी एर्गोच्या अटी व शर्तींनुसार शेवटचे डॉक्युमेंट मिळाल्याच्या 15 दिवसांत क्लेम प्रोसेस केला जाईल.

स्टेप 4. क्लेमचे सेटलमेंट


सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स समाधानकारकरित्या प्राप्त झाल्यानंतर एचडीएफसी एर्गोद्वारे क्लेम शेवटचे डॉक्युमेंट प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत सेटल केला जाईल आणि मंजूर क्लेम पेमेंटवर प्रोसेस केली जाईल. तुमच्या बँक अकाउंटमध्ये NEFT द्वारे पेमेंट केले जाईल.

(कृपया लक्षात घ्या की कोणत्याही अंतर्गत व्हेरिफिकेशनच्या बाबतीत अंतिम भूमिका एचडीएफसी एर्गो/ TPA द्वारे शेवटचे डॉक्युमेंट प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत कन्फर्म केली जाईल)

डॉक्युमेंट चेक लिस्ट

क्लेम रजिस्टर करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची लिस्ट

  • एचडीएफसी एर्गो पॉलिसी क्रमांकासह योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म.
  • मूळ डिस्चार्ज सारांश.
  • तपशीलवार विवरण, पेमेंट पावती आणि प्रीस्क्रिप्शनद्वारे समर्थित मूळ फार्मसी इनव्हॉईस सह मूळ अंतिम बिल.
  • मूळ तपासणी रिपोर्ट्स (उदा. ब्लड रिपोर्ट्स, एक्स-रे, इ).
  • इम्प्लांट स्टिकर/इनव्हॉईस, वापरले असल्यास (उदा. अँजिओप्लास्टी, लेन्स मोतीबिंदू इत्यादींमधील स्टेंट साठी).
  • मागील उपचाराचे डॉक्युमेंट्स, जर असल्यास.
  • अपघाताच्या बाबतीत, मेडिको लीगल सर्टिफिकेट (MLC) किंवा FIR.
  • प्रपोजरचा मृत्यू झाल्यास नॉमिनीचा तपशील प्रदान करावा लागेल. नॉमिनी अल्पवयीन असल्यास लीगल वारसा सर्टिफिकेट आवश्यक आहे.
  • इतर संबंधित डॉक्युमेंट्स, जर असल्यास.
  • पेमेंटसाठी neft तपशील: प्रपोजरच्या नावाने कॅन्सल्ड चेक किंवा बँकद्वारे साक्षांकित पासबुक कॉपी. तसेच, प्रपोजरचा ekyc ID पॉलिसीशी लिंक असल्याची खात्री करा. eKYC प्रक्रियेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.
  • लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे - येथे क्लिक करा.
  • नमुना क्लेम फॉर्म - येथे क्लिक करा.

अवॉर्ड्स आणि मान्यता

best_bfsi_2011 best_employer_brand best_employer_brand_2012            best_employer_brand_besi_2012 bfsi_2014 cfo_2014 iAAA icai_2013 icai_2014 icai_2015 icai_2016 iir_2012 iir_2016
नॉलेज सेंटर
x