नॉलेज सेंटर

वनटास्टिक

वनटास्टिक

एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्सला एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स सह एकीकृत केल्यानंतर आम्ही एकमेकांच्या क्षमतांना बळकटी देण्यासाठी ‘'वन फन्टास्टिक'’ कंपनीची निर्मिती केली आणि त्यानंतर खऱ्याअर्थाने सुरू झाला अनोखा प्रवास #वनटास्टिक चा. म्हणजेच जिथे कर्मचारी, तिथे HR. एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स मध्ये आमचा ठाम विश्वास आहे की, आनंदी कर्मचारी हेच कस्टमर्सला आनंदी ठेऊ शकतात. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य ही आमची प्राथमिकता आहे; यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वृद्धी होते. आम्ही आमच्या कस्टमर्सला कुशाग्र, कुशल आणि समर्पित मनुष्यबळासह सर्व्हिस प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जे आमची मूल्ये- संवेदनशीलता(सेन्सिटिव्हिटी), उत्कृष्टता (एक्सलन्स), नैतिकता (एथिक्स) आणि गतिशीलता (डायनॅमिझम) (SEED)नुसार कार्यरत असतील. अशाचप्रकारे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना अशा प्लॅटफॉर्म प्रदान करतो आहोत की, जिथे त्यांना क्षमतेनुसार विकासाच्या संधी उपलब्ध होतील. एचडीएफसी एर्गो मध्ये ह्यूमन रिसोर्स टीम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या संपर्कात असते आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी कटिबद्ध असते. यामुळेच HR टीम विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसे की कौतुक, प्रशिक्षण, सर्व्हिस परफॉर्मन्स मॅनेजमेंट, वेलनेस कनेक्ट, टार्गेट-निश्चिती आणि फीडबॅक आदीच्या माध्यमातून त्यांच्या क्षमतांमध्ये सुधारणा केली जाते.

#वनटास्टिक हे कार्य पाच प्रमुख स्तंभावर आधारभूत आहे. यामध्ये लर्निंग, प्रोत्साहन, वेलनेस, सर्व्हिसेस आणि पोल्स यांचा समावेश होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याचे ज्ञान वर्धन, आरोग्य आणि कल्याण करण्याशी सर्व बाबी संबंधित आहे. त्यांच्या सोबत विचारविनिमय आणि सर्वश्रेष्ठ क्षमतेचा विकास करणे यामध्ये समाविष्ट आहे. सीनिअर लीडरशिप सोबत वार्तालाप, व्हर्च्युअल योगा सेशनचे आयोजन, कुकिंग इ. सारख्या मजेशीर मात्र कलेला वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन ही पाऊले आम्ही उचलतो. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'प्रोजेक्ट शक्ती' होय. या अंतर्गत आमचे उद्दिष्ट अधिकाधिक महिलांचा कंपनीत समावेश करणे आणि स्वत:चा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे.

आमचा ठाम विश्वास आहे की, एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्सच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये प्रगतीची आणि गौरवपूर्ण कामगिरीची क्षमता आहे. त्यांना केवळ संधी, प्रोत्साहन आणि पाठबळाची आवश्यकता असते. SEED अवॉर्ड्स, #वनटास्टिकचा भाग, हा एक असाच उपक्रम आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि सहभाग यांची योग्य प्रकारे दखल घेतली जाते. आम्ही सर्वोत्तम सहकारी, सदस्य, लर्नर किंवा कर्मचारी यांचे समर्पण आणि त्याग वृत्तीला जाणतो आणि त्यांना अभिनंदनातून सलाम करण्याद्वारे त्यांच्या कार्याचे कौतुक करतो.

काम म्हणजे केवळ डेडलाईन पाळणं असं वर्ककल्चर आम्ही मानत नाही. यामुळे आपल्या कामात एकसुरीपणा निर्माण होतो. जेव्हा काम मजेदार आणि गमतीशीर बनते आणि शिकण्याच्या नव्या संधी मिळतात. त्यातून मिळणारा आनंद प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी निश्चितच अविस्मरणीय असतो. #वनटास्टिक च्या माध्यमातून आम्ही हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे.

प्रोजेक्ट शक्ती

प्रोजेक्ट शक्ती

एचडीएफसी एर्गो मध्ये आमचा सर्वांसाठी अनुकूल कामाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरुन त्यामधून विविधतेचे दर्शन सर्वांना घडेल आणि ‘प्रोजेक्ट शक्ती’चा प्रयत्न याप्रकारच्या ‘शक्ती’ च्या दिशेनं उचललेलं पाऊल आहे. विचार, कौशल्य आणि क्षमतांमध्ये विविधता निर्माण करण्यासाठी सर्वांना अनुकूल-समान कामाचं वातावरण निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. एचडीएफसी एर्गो समानतेचा गौरव करतानाच विभिन्नतेचा देखील आदर करते आणि आमचं उद्दिष्ट एकजूट होऊन सर्व अडथळ्यांवर मात करणं आहे. तसेच आम्ही अशा वर्क कल्चरच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहोत. जिथे कुणासोबतही भेदभाव होणार नाही आणि लीडरशीपच्या सर्व स्तरांवर प्रतिनिधित्वाचे वैविध्य निश्चितपणे असेल. आमच्यासाठी वैविध्यपूर्ण टीम म्हणजे, विचारांत विविधता, सर्वोत्तम निर्णय आणि आमच्या पार्टनर आणि कस्टमर्ससाठी सर्वोत्तम परिणाम. आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकू इच्छितो आणि आपल्यापणाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देऊ इच्छितो. जिथे सहकारी-सदस्य संपूर्ण क्षमेतेने काम करतील आणि स्वतंत्रपणे आपलं मत ठामपणे मांडू शकतील आणि त्यांच्या समर्पण वृत्तीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. आमचे लक्ष्य विविधतेचा गौरव करणे आहे आणि योग्यप्रकारे सर्व कार्याला प्रोत्साहन देणे आहे. आमच्यासाठी मनुष्यबळात असलेली विविधता सर्वात महत्वाची आहे आणि आम्ही सुनिश्चित करू इच्छितो की, आमच्या कंपनीच्या विकासात प्रत्येकाच्या योगदानाचा निश्चितपणे समावेश आहे.

लाईफ @ एचडीएफसी एर्गो

एचडीएफसी एर्गो मधील लाईफचा प्रत्येक टप्पा निश्चितपणे साहसपूर्ण आहे. अंतिम उद्दिष्ट — कस्टमर समाधान — यशस्वीपणे प्राप्त करण्यासाठीच्या आमच्या सर्वश्रेष्ठ प्रयत्नांच्या दरम्यान येणाऱ्या दैनंदिन अडथळ्यांवर कम्युनिटी इव्हेंटच्या सहाय्याने मात केली जाते. जेणेकरुन कर्मचाऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी होणार नाही. तुम्ही क्लेम सेटल करीत असाल किंवा टार्गेट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असाल किंवा अन्य कामात व्यस्त असाल — तुम्ही एचडीएफसी एर्गो मध्ये एक क्षणभरासाठीही निराश होणार नाही.

SEED अवॉर्ड्स

SEED अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गो मधील लाईफ कंपनीच्या मूल्यांवर — SEED (संवेदनशीलता, उत्कृष्टता , नैतिकता आणि गतिशीलता) वर आधारीत आहे. जे कंपनीचे खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. आम्ही प्रत्येक वर्षी स्थापना दिवशी एचडीएफसी एर्गो उपरोक्त मूल्यांसाठी समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची कामगिरी आणि कंपनीसाठीच्या त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करतो.

कर्मचारी प्रतिबद्धता

कर्मचारी प्रतिबद्धता

एचडीएफसी एर्गो ही 'विविधतेत एकता' या तत्वाची जपवणूक करते. ज्या अंतर्गत आम्ही संपूर्ण वर्षभरात संस्कृतीची जपवणूक करतो आणि विविध उत्सव जल्लोषात आणि मजेदार उपक्रमांसह साजरे करतो. ईद असो की दिवाळी किंवा ख्रिसमस. आमचे कर्मचारी सर्व उत्सवात जल्लोषात सहभागी होतात आणि आपलेपणं तसेच एकात्मतेचा संदेश देतात.

हेल्थ कॅम्प

हेल्थ कॅम्प

कर्मचारी निरोगी असल्यास संस्थेचा कारभारही निरोगी बनतो. त्यामुळेच आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जपवणूक करण्यासाठी एचडीएफसी एर्गो नियमितपणे सर्व ऑफिसमध्ये हेल्थ कॅम्पचे आयोजन करते. कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक समस्या भेडसावू नये यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची अनिवार्यपणे आरोग्य तपासणी केली जाते.

स्पोर्ट्स

स्पोर्ट्स

दररोजच्या कामातून थोडा ब्रेक घेऊन आपल्या ऊर्जेला गतिमान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खेळ होय. आमचे इंटर-टीम स्पोर्टिंग इव्हेंट/टूर्नामेंट हे आमच्या कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्तीचा अनुभव प्रदान करतात. ज्याद्वारे वैयक्तिकरित्या किंवा अनेक उत्साहासह टीम म्हणून स्पर्धा करतात. अर्थातच, अत्यंत महत्त्वाचे ट्रॉफी पटकाविण्यासाठी जीवाचं रान करतात.

आमचे ध्येय

"कस्टमरच्या गरजांना प्रतिसाद देऊन आणि त्यांची प्रगती सुलभ करून कस्टमर-फर्स्ट दृष्टीकोनासह अग्रगण्य जनरल इन्श्युरन्स कंपनी होणे"

आमचे मूल्य

आमचे मूल्य

आमचे ध्येय सत्यात उतरविण्यासाठी आम्ही आमच्या मूल्यांचे अर्थात SEED चे बीजारोपण आणि त्याचे संगोपन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचा नैतिक दृष्टीकोन आणि उच्च पातळीची सचोटी आम्हाला आमच्या मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेडकडून मिळालेली 'विश्वासाची परंपरा पुढे चालू ठेवण्यास' सक्षम करते. हा विश्वास आमच्या सर्व निर्णय आणि कामगिरीमध्ये दिसून येईल याची आम्ही खात्री बाळगतो. हे आम्हाला आमच्या सर्व भागधारकांसाठी, म्हणजे कस्टमर्स, बिझनेस पार्टनर्स, रि-इन्श्युरर्स, शेअर होल्डर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचारी यांच्यासाठी मूल्य निर्माण आणि टिकवून ठेवण्यासाठी एक टीम म्हणून काम करण्यास मदत करते.

SEED — संवेदनशीलता (सेन्सिटिव्हिटी), उत्कृष्टता (एक्सलन्स), नैतिकता (एथिक्स) आणि गतिशीलता (डायनॅमिझम)

संवेदनशीलता

आम्ही आमच्या बिझनेसची उभारणी कस्टमरप्रती सहानुभूती आणि कस्टमरच्या अंतर्गत तसेच बाह्य आवश्यकता विचारात घेऊन करू.

उत्कृष्टता

आम्ही नेहमीच नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट आणि सर्व्हिस ऑफर करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकवेळी सर्वोत्तम गोष्टी करण्यासाठी नवीन बेंचमार्क सेट करण्याचा प्रयत्न करू.

नैतिकता

आम्ही नेहमीच वचनांशी बांधील असू आणि भागधारकांसोबत पारदर्शकतेने व्यवहार करू.

गतिशीलता

आमची "करू शकतो" या दृष्टीकोनासह सकारात्मक कार्यपद्धती आहे आणि आम्ही आव्हानांचा स्विकार करतो आणि प्रत्येक टप्प्यावर त्यावर मात करतो.