जर्मनीला अधिकृतपणे जर्मनी फेडरल रिपब्लिक म्हणून ओळखले जाते, हा युरोपच्या केंद्रीय प्रदेशातील देश आहे. हे जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय सुट्टीच्या ठिकाणांपैकी एक आहे, जे त्यांच्या विविध प्रकारच्या पर्यटक आकर्षणांसाठी ओळखले जाते. तुम्हाला सुंदर ग्रामीण भागात वेळ घालवायचा असेल किंवा विविध ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांना भेट द्यायची असेल, या देशात पर्यटकांसाठी पाहण्यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या देशात तुमच्या पुढील युरोपियन सुट्टीचे नियोजन करताना, चांगल्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करा.
जर्मनीसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला तुमच्या ट्रिपदरम्यान होऊ शकणाऱ्या अनेक आकस्मिक गरजांसाठी आर्थिकदृष्ट्या कव्हर प्रदान करेल. या प्रकरणावर अतिरिक्त माहितीसाठी पुढे वाचणे सुरू ठेवा.
जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची यादी येथे दिली आहे ;
प्रमुख वैशिष्ट्ये | तपशील |
कमाल कव्हरेज | वैद्यकीय, प्रवास आणि सामानाशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती यासारख्या विविध अनपेक्षित घटनांसाठी कव्हरेज देऊ करते. |
सातत्यपूर्ण सहाय्य | 24x7 कस्टमर केअर सपोर्ट आणि इन-हाऊस क्लेम सेटलमेंटद्वारे सर्वकाळ सहाय्य. |
सुलभ कॅशलेस क्लेम | एकाधिक नेटवर्क हॉस्पिटल्सद्वारे ॲक्सेस होणारे कॅशलेस क्लेम लाभ देऊ करते. |
कोविड-19 कव्हरेज | कोविड-19 मुळे झालेल्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी कव्हरेज. |
मोठी कव्हर रक्कम | $40k पासून ते $1000K पर्यंत व्यापक कव्हरेज. |
तुम्ही निवडलेल्या जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचा प्रकार तुमच्या प्रवासाच्या आवश्यकतेवर आधारित असावा. येथे ऑफर केलेल्या मुख्य निवडी खालीलप्रमाणे: ;
जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे एकाधिक लाभ आहेत. काही महत्वाच्या पैलूंचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे:
आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनपेक्षित परिस्थितीसाठी कव्हरेज प्रदान करण्याद्वारे तणाव आणि फायनान्शियल ओझे कमी करून आर्थिक शांती प्रदान करते.
जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये कॅशलेस वैद्यकीय सहाय्य समाविष्ट आहे. तुम्ही अपफ्रंट पेमेंटची चिंता न करता नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये उपचार प्राप्त करू शकता.
जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह 24x7 कस्टमर सपोर्ट आणि कार्यक्षम क्लेम प्रोसेसिंगचा आनंद घ्या, त्रासमुक्त ट्रिपची खात्री करा.
जर्मनी ट्रिप इन्श्युरन्स खरेदी करून तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान विलंब, नुकसान किंवा हानीपासून तुमच्या वस्तूंचे संरक्षण करा.
जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्स आपत्कालीन वैद्यकीय काळजी, दंत खर्च, निर्वासन, प्रत्यावर्तन आणि बरेच काही समाविष्ट विविध वैद्यकीय खर्च कव्हर करते.
फ्लाईट डीले, वैयक्तिक दायित्व आणि हायजॅक डिस्ट्रेस भत्ता यासारख्या अनपेक्षित परिस्थितींसाठी कव्हरेज मिळवा, तुमचा प्रवासाचा अनुभव वाढवा.
सामान्यपणे भारतातील जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केलेल्या काही गोष्टी येथे दिल्या आहेत ;
आमची पॉलिसी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित खर्च कव्हर करते. जेणेकरून तुम्हाला तुमच्या ट्रिपदरम्यान तुमच्या खिशावर आर्थिक भार सहन करण्याची आवश्यकता राहणार नाही.
जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला होऊ शकणाऱ्या दंत आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित खर्च देखील कव्हर करते.
तत्काळ उपचारांची आवश्यकता असलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, आमची पॉलिसी नजीकच्या आरोग्यसेवा केंद्राशी हवा/जमीन वैद्यकीय स्थलांतर संबंधित खर्च कव्हर करून मदत करते.
आमची पॉलिसी तुम्हाला हॉस्पिटलायझेशनशी संबंधित खर्चाची काळजी घेण्यासही मदत करते. जेणेकरून तुम्हाला तुमचे ट्रॅव्हल बजेट ओलांडण्याची गरज नाही.
मृत्यूची दुःखद घटना घडल्यास, आमची पॉलिसी तुमचा मृतदेह तुमच्या मायदेशात आणण्याचा खर्च भागवेल.
प्रवासात अपघाती मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमध्ये, आमची पॉलिसी तुमच्या कुटुंबाला एकरकमी भरपाई देऊ करेल.
जर अनपेक्षित घटना घडल्यास तुमचा भार कमी करण्यासाठी, पॉलिसी तुम्हाला एकरकमी भरपाई देऊ करेल.
जर तुम्हाला परदेशात थर्ड-पार्टी नुकसानीसाठी जबाबदार वाटत असेल तर आमची पॉलिसी तुमच्यासाठी त्या नुकसानीसाठी भरपाई देणे सोपे करेल.
जर तुम्हाला चोरी किंवा दरोड्यामुळे होणारी रोख दुर्घटना अनुभवत असेल तर आमची पॉलिसी भारतातून आपत्कालीन फंड ट्रान्सफर सुलभ करण्यास मदत करेल.
जर तुमचे फ्लाईट हायजॅक झाले तर संबंधित अधिकारी समस्येचे निराकरण करत असताना, आम्ही देखील आमची जबाबदारी घेऊ आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीची भरपाई देऊ.
आमचा जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्स एक रिएम्बर्समेंट वैशिष्ट्य ऑफर करतो जो तुम्हाला फ्लाईट विलंबामुळे उद्भवणाऱ्या आवश्यक खरेदीशी संबंधित खर्च कव्हर करण्यास मदत करेल.
जर तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या हॉटेल मधील मुक्काम वाढवायचा असल्यास तुम्हाला या पॉलिसीच्या द्वारे कव्हरेज प्रदान केले जाईल.
आमच्या जर्मनी ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह हरवलेले किंवा चोरीला गेलेले वैयक्तिक डॉक्युमेंट्स आणि वस्तू बदलण्याच्या खर्चासाठी तुम्हाला कव्हर केले जाईल.
चेक-इन केलेले सामान हरवल्यास आमची पॉलिसी तुम्हाला भरपाई देऊ करेल. त्यामुळे, तुमच्या आवश्यक गोष्टींच्या अनुपस्थितीत तुमची जर्मनी ट्रिप घालवण्याची चिंता करू नका.
तुमच्या चेक-इन बॅगेजला विलंब झाल्यास, या समस्येचे निराकरण होत असताना आमची पॉलिसी आवश्यक वस्तूंच्या खरेदीला कव्हर करेल.
तुमची भारतातून जर्मनीसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी यासाठी कव्हरेज ऑफर न करण्याची शक्यता आहे
युद्ध, दहशतवाद किंवा कायद्याच्या उल्लंघनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक गुंतागुंती ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत कव्हर केल्या जात नाहीत.
जर तुम्ही मादक पदार्थ किंवा प्रतिबंधित पदार्थ वापरत असाल तर जर्मनी ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन कोणतेही कव्हरेज ऑफर करणार नाही.
ट्रिपपूर्वी तुमची कोणतीही वैद्यकीय स्थिती असल्यास, किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगावर उपचार सुरू असल्यास प्लॅन त्या खर्चांना कव्हर करणार नाही.
दहशतवाद किंवा युद्धामुळे झालेल्या दुखापती किंवा आरोग्य जटिलता.
इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत जाणूनबुजून हानी किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे झालेल्या दुखापती कव्हर केल्या जात नाहीत.
ही पॉलिसी धोकादायक उपक्रम आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्यामुळे झालेल्या दुखापती आणि हॉस्पिटलचे खर्च कव्हर करणार नाही.
परदेशात प्रवास करताना, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणावरील उपचार घेतले तर त्या संबंधित खर्च प्लॅन अंतर्गत कव्हर केले जाणार नाहीत.
• आमची पॉलिसी खरेदी करण्यासाठी येथे लिंक वर क्लिक करा, किंवा एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स वेबपेजला भेट द्या.
• प्रवाशाचा तपशील, डेस्टिनेशनची माहिती आणि ट्रिपची प्रारंभ आणि समाप्ती तारीख टाईप करा.
• आमच्या तीन तयार पर्यायांमधून तुमचा प्राधान्यित प्लॅन निवडा.
• तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा.
• प्रवाशांविषयी अतिरिक्त तपशील भरा आणि ऑनलाईन पेमेंट पद्धती वापरून पेमेंट करण्यासाठी पुढे सुरू ठेवा.
• आता केवळ करायचे शिल्लक म्हणजे- तुमची पॉलिसी त्वरित डाउनलोड करा!
कॅटेगरी | विशिष्टता |
सांस्कृतिक वारसा | जर्मनीच्या ऐतिहासिक शहरांमध्ये पौराणिक सौंदर्याचा आधुनिक चैतन्यमयतेशी मिलाफ होतो. |
कार्यक्षमता आणि इंजिनीअरिंग | प्रमुख ऑटोमोटिव्ह कंपन्यांचे घर, जर्मनी अचूक इंजिनीअरिंग आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात जागतिक मानके स्थापित करतो. |
रमणीय भूप्रदेश | ब्लॅक फॉरेस्टच्या सुंदर गावे, घनदाट जंगले आणि सदाबहार सौंदर्याचा आनंद घ्या. |
स्वादिष्ट पाककृती | अस्सल जर्मन जेवणाच्या अनुभवासाठी पौष्टिक स्टू, सॉसेज आणि प्रसिद्ध प्रेट्झेलचा आनंद घ्या. |
नवकल्पना आणि टेक्नॉलॉजी | संशोधन आणि विकासासाठी जर्मनीची वचनबद्धता त्याला टेक्नॉलॉजीच्या प्रगतीत आघाडीवर ठेवते. |
ऐतिहासिक लँडमार्क्स | ब्रँडनबर्ग गेट हे जर्मन ऐक्याचे प्रतिष्ठित प्रतीक आहे, तर न्यूशवांस्टीन किल्ला तुम्हाला परीकथेच्या जगात नेतो. |
जर्मनी टूरिस्ट व्हिसासाठी तुम्हाला सादर करण्यासाठी डॉक्युमेंट्सची उदाहरणे येथे आहेत ;
• पूर्ण आणि स्वाक्षरी केलेला जर्मन टूरिस्ट व्हिसा ॲप्लिकेशन फॉर्म,
• वैध पासपोर्ट,
• काही अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो,
• निवासाचा पुरावा,
• राउंडट्रिप प्रवासाचा किंवा आरक्षणाचा पुरावा,
• ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स,
• जर्मनीतील तुमच्या होस्टचे आमंत्रण पत्र,
• आर्थिक साधनांचा पुरावा,
• रोजगार स्टेटसचा पुरावा,
• जन्म प्रमाणपत्र आणि दोन्ही पालकांकडून संमती पत्र (केवळ अल्पवयीन मुलांसाठी), आणि
• अतिरिक्त डॉक्युमेंट्स (आवश्यक असल्यास).
सर्वसाधारणपणे, वसंत ऋतु आणि उन्हाळा हे दोन्ही काळ पर्यटनाच्या उद्देशाने जर्मनीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानले जातात. या देशात वसंत ऋतू मार्च ते मे पर्यंत चालतो, जो हुडहुडी भरणाऱ्या थंडीनंतर हवामानात उबदारपणा आणतो. एप्रिलच्या मध्यात तापमान 14°C आणि मे मध्ये 19°C पर्यंत पोहोचते. प्रवास, पर्यटन आणि ट्रेकिंग, हायकिंग, माउंटन बाइकिंग इत्यादीसारख्या साहसी उपक्रमांसाठी हा उत्तम काळ आहे. पूर्णपणे बहरलेला चेरी ब्लॉसम वसंत ऋतूमध्ये जर्मनीची सहल आणखी सुंदर बनवतो.
उन्हाळी हंगाम जून ते ऑगस्ट पर्यंत चालतो आणि यावेळी अधिक आल्हाददायक तापमान आणि हवामान असते. बाल्टिक समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तरेकडील प्रदेश किंचित थंड असू शकतो, तर दक्षिणेकडील प्रदेश तुलनेने अधिक उष्ण असतो. जर्मनीमध्ये प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आणि देशाच्या आतील भागाचे सौंदर्य पाहण्यासाठी हा उत्तम काळ आहे. बर्लिन कल्चर फेस्टिव्हल आणि कार्निव्हल, शुटझेनफेस्ट हनोवर, फ्रीबर्ग वाईन फेस्टिव्हल इत्यादी प्रसिद्ध कार्यक्रम या काळात आयोजित केले जातात.
जर्मनीला भेट देण्यापूर्वी सर्वोत्तम वेळ, हवामान, तापमान आणि इतर घटकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी. जर्मनीला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ब्लॉग नक्की वाचा.
1. आवश्यक असल्यास शेंगेन व्हिसासह पासपोर्ट आणि ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स आणि ट्रॅव्हल इन्श्युरन्स माहिती.
2. शहरे आणि ग्रामीण भागात फिरण्यासाठी आरामदायी वॉकिंग शूज.
3. उन्हाळ्यासाठी सनग्लासेस आणि सनस्क्रीन.
4. हायड्रेटेड राहण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य पाण्याची बॉटल.
5. कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक चार्जर्स/अडॅप्टर्स.
6. उन्हाळ्यासाठी वजनाला हलके एसपीएफ सनस्क्रीन, हवादार कपडे आणि सँडल्स.
7. उबदार संध्याकाळसाठी हलके जाकीट, स्कार्फ किंवा कार्डिगन.
• तुमच्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल जागरूक रहा.
• तुमची पर्स, वैयक्तिक डॉक्युमेंट्स आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, विशेषतः गर्दीच्या पर्यटन भागात.
• केवळ अधिकृतरित्या चिन्हांकित टॅक्सी वापरा
• नेहमीच तुमच्यासोबत भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील असू द्या.
• शहरातील 'सुरक्षित' आणि 'असुरक्षित' क्षेत्रांबद्दल अद्ययावत माहितीसाठी, तुमच्या हॉटेल मॅनेजरशी किंवा स्थानिक पर्यटन माहिती अधिकाऱ्यांशी बोला.
कोविड-19 प्रवास विशिष्ट प्रवास मार्गदर्शक तत्त्वे
• सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना फेस मास्क परिधान करा.
• गर्दीच्या पर्यटक क्षेत्रांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखा.
• नवीनतम प्रादेशिक कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांविषयी जाणून घ्या आणि त्यांचे पालन करा.
• तुम्हाला काही लक्षणे आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनुरूप वागा.
शहर | एअरपोर्टचे नाव |
फ्रँकफर्ट | फ्रँकफर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट |
बर्लिन | बर्लिन टेगेल एअरपोर्ट |
हॅमबर्ग | हॅम्बर्ग एअरपोर्ट |
डॉर्टमंड | डॉर्टमंड एअरपोर्ट |
कोलोन | कोलोन बॉन एअरपोर्ट |
जर्मनीतील काही सर्वात लोकप्रिय प्रवासाचे डेस्टिनेशन्स येथे आहेत. जे तुम्ही तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात समाविष्ट करू शकता ;
बर्लिन हे जर्मनी मधील सर्वात मोठे तसेच राजधानी शहर आहे. 3.7 दशलक्षपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले शहर हे जर्मनी दर्शनाचा प्रारंभ बिंदू ठरतो.. बर्लिन शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि नामांकित पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.. सुंदर बर्लिन कॅथेड्रलला भेट देण्यापासून ते अनेक प्रसिद्ध बारमध्ये थंड बियरचा आनंद घेण्यापर्यंत, शहराच्या भेटीदरम्यान तुम्ही बरेच काही करू शकता. रिचस्टाग, म्युझियम आयलंड, जेंडारमेनमार्क्ट, व्हिक्टरी कॉलम, बर्लिन वॉल मेमोरियल इ. बर्लिनची प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
सुंदर इसार नदीच्या काठावर वसलेले म्युनिक हे देशातील तिसरे मोठे शहर आहे. हे जर्मनीमधील एक आदर्श ठिकाण आहे, जिथे तुम्हाला समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि आधुनिक घडामोडींचे अनोखे मिश्रण आढळू शकते. जागतिक दर्जाचे फुटबॉल क्लब, FC बायर्न म्युनिक आणि BMW चे सेंट्रल हेडक्वार्टर, म्युनिक हे जर्मनीतील पर्यटक सर्वाधिक भेट देत असलेल्या शहरांपैकी एक आहे. श्लॉस निम्फिनबर्ग, ड्यूश म्युझियम, पीटर्सकिर्चे, रेसिडेंझ, असमकिर्चे ही शहराची इतर पर्यटन स्थळे आहेत. एचडीएफसी एर्गोसह भारतातून जर्मनीसाठी स्वस्त ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवा.
फ्रँकफर्ट, अधिकृतपणे फ्रँकफर्ट एम मेन, या प्रदेशातील इतिहास आणि धर्माचे प्रमुख केंद्र आहे. आधुनिक गगनचुंबी इमारती आणि मध्ययुगीन संरचनांच्या उपस्थितीमुळे शहराचे सुंदर दृश्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. फ्रँकफर्ट आणि आसपासची काही सर्वात उल्लेखनीय आकर्षणे आहेत – रोमर, फ्रँकफर्ट ओल्ड टाऊन, पॉलस्कीर्चे, कैसरडॅम सेंट बार्थोलोमेयस, इझना स्टेग, झू फ्रँकफर्ट इ.
देशाच्या पाश्चिमात्य भागात स्थित कोलोन हे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे सुंदर शहर या प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे, जिथे अनेक गॅलरी, संग्रहालये, ऐतिहासिक स्थळे इ. आहेत. तुमच्या कोलोन, जर्मनीच्या प्रवासादरम्यान, कोलोन कॅथेड्रल, ओल्ड टाऊन कोलोन, कोलोन सिटी हॉल इत्यादींना भेट देण्यास चुकवू नका.
हॅम्बर्ग हे जर्मनीतील बर्लिन नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. हे या प्रदेशातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि कला, इतिहास, संस्कृती, मनोरंजन आणि वाणिज्य यांचे विस्तृत केंद्र आहे. याच्या काही मुख्य आकर्षणांमध्ये स्पायकरस्टॅड्ट, हॅफेन सिटी, मेरीटाइम म्युझियम हॅम्बर्ग, प्लाँटेन अन ब्लोमेन हॅम्बर्ग इ. समाविष्ट आहेत.
नेकर नदीकाठी वसलेले, हीडलबर्ग त्याच्या अद्भुतरम्य आकर्षणासाठी आणि प्रसिद्ध हीडलबर्ग किल्ल्यासाठी ओळखले जाते. या ऐतिहासिक जुन्या शहराच्या सुंदर वास्तुकला नजरेत साठवा, जर्मनीच्या सर्वात जुन्या युनिव्हर्सिटीला भेट द्या आणि फिलॉसॉफर्स वॉक पासून दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा आनंद घ्या. शहराचे अनोखे सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि शांत नदी किनारे एक अविस्मरणीय अनुभव देतात.
जर्मनीच्या प्रवासादरम्यान तुम्ही खालील बाबींची सुनिश्चिती करा ;
• 368 मीटर उंची वरुन शहराचे सर्वोत्तम पॅनोरमिक व्ह्यू मिळविण्यासाठी बर्लिन टीव्ही टॉवरला भेट द्या.
• जर्मनीमधील अनेक शहरांमध्ये ऑफर केलेल्या वाईन-टेस्टिंग टूरवर जा.
• जर्मनीच्या सर्वात मोठ्या प्रोफेशनल फुटबॉल लीग बुंडेसलीगामध्ये रोमांचक फुटबॉल खेळ थेट पहा.
• देशभरातील आकर्षक किल्ल्यांचा मार्गदर्शित दौरा करा.
• तुमच्या प्रियजनांसोबत साहसी राईन रिव्हरबोट राईडचा आनंद घ्या.
• इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या म्युझियम आयलंडला भेट द्या.
• कोलोनमधील शिल्डरगॅसे, फ्रँकफर्टमधील झील, बर्लिनमधील कुडॅम, डसेलडॉर्फमधील कोनिग्साले इत्यादीसारख्या जर्मनीच्या प्रमुख मार्केटमध्ये मनमुराद खरेदी करा.
जर्मनीमध्ये प्रवास करणे खूपच महाग असू शकते, तथापि, अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही बरेच पैसे बचत करू शकता. उदाहरणार्थ ;
• तुमच्या जर्मनी ट्रिपदरम्यान पैसे बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नॉन-पीक सीझन दरम्यान तुमची भेट नियोजित करणे. या काळात कमी पर्यटक गर्दीमुळे निवास, ट्रान्सफर आणि इतर सर्व्हिसची किंमत तुलनात्मकरित्या स्वस्त राहील.
• जर्मनीमध्ये प्रवास करताना टॅक्सी किंवा भाड्याने वाहन घेणे टाळा कारण ते खूप महाग असू शकतात. ट्रॅम्स, बस, ट्रेन इ. सारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करा. कारण ते सर्वसाधारण विश्वसनीय आणि तुलनेत खूप स्वस्त आहेत.
• जर्मनीमध्ये असताना सुज्ञपणे खरेदी करा. कारण गोष्टी तिथे खूपच महाग आहेत आणि बहुतांश ठिकाणी वाटाघाटी करणे काम करू शकणार नाही.
• जर्मनीमध्ये पैसे वाचवण्यासाठी स्थानिक रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा विचार करा. अन्यथा, लक्झरी रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा खर्च तुमच्या प्रवासाचे बजेट बिघडवू शकतो.
• जर्मनीमधील विविध ठिकाणी ऑफर केलेल्या विनामूल्य उपक्रम आणि म्युझियम टूर्सचा लाभ घेण्यास विसरू नका. याद्वारे तुम्ही प्रेक्षणीय स्थळे देखील पाहू शकाल आणि तुमचे पैसेही वाचवू शकाल.
• जर्मनीसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणे तुम्हाला अनपेक्षित घटनांपासून फायनान्शियल दृष्ट्या सुरक्षित ठेवू शकते. हा एक महत्त्वाचा सावधगिरीचा उपाय आहे जो तुम्हाला तुमच्या जर्मनीच्या प्रवासादरम्यान पैसे वाचविण्यात मदत करू शकतो. येथे क्लिक करून जर्मनीसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवा.
जर्मनीतील काही सर्वोत्तम भारतीय रेस्टॉरंट येथे आहेत. जिथे तुम्ही तुमच्या ट्रिपदरम्यान भेट देऊ शकता ;
• बॉम्बे पॅलेस
ॲड्रेस: डार्मस्टॅड्टर लँडस्ट्रास 6, 60594 फ्रँकफर्ट एम मेन, जर्मनी
शिफारशित डिश: लस्सी
• इंडिया क्लब
ॲड्रेस: बेहरेनस्ट्रास 72, 10117 बर्लिन, जर्मनी
शिफारशित डिश: पिंडी छोले कुलचा
• सिंग इंडियन रेस्टॉरंट
ॲड्रेस: स्टेनडम 35, 20099 हॅम्बर्ग, जर्मनी
शिफारशित डिश: शाही पनीर
• दिल्ली 6 रेस्टॉरंट
ॲड्रेस: फ्रीड्रिकस्ट्रास 237, 10969 बर्लिन, जर्मनी
शिफारशित डिश: कढई पनीर
येथे जर्मनीतील काही महत्त्वाचे स्थानिक कायदे आणि शिष्टाचार आहेत जे पर्यटकांनी पाळले पाहिजेत ;
• जर्मनीमध्ये जे-वॉकिंग (रस्त्यावर निष्काळजीपणे, अनियमितपणे किंवा निषिद्ध ठिकाणी चालणे) बेकायदेशीर आणि दंडनीय गुन्हा आहे. झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना रोड-क्रॉसिंग लाईट हिरवा होण्याची प्रतीक्षा करा.
• तुमच्या भेटीपूर्वी, जर्मनीमध्ये कचरा पुर्नवापर करण्याच्या उचित पद्धती विषयी जाणून घ्या. अयोग्य पद्धतीने केलेली कचऱ्याची विल्हेवाट जर्मनीत प्रशंसनीय नाही.
• घरात प्रवेश करण्यापूर्वी बूट घालण्याची परवानगी आहे किंवा नाही याची खात्री करा.
• सायकल लेन आणि फूट पाथ याबाबत निश्चितच गल्लत करु नका. कारण तुम्ही कदाचित सायकलिस्टचा मार्ग अडवू शकतात. हे धोकादायक आणि दंडनीय ट्रॅफिक अपराध आहे.
• जर्मनीमध्ये कुणाला शुभेच्छा देताना, विशेषत: अपरिचित, त्यांना औपचारिकरित्या संबोधित करण्याची खात्री बाळगा.
• एखाद्याला अभिवादन करण्यासाठी, तुम्ही गुटेन टॅग (तुमचा दिवस चांगला जावो) किंवा हॅलो (हेलो) दोन्ही वापरू शकता. आणि निरोप घेण्यासाठी, "चुस" शब्द वापरा.
जर्मनीमधील भारतीय दूतावासाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत ;
जर्मनी-स्थित भारतीय दूतावास | कामकाजाचे तास | ॲड्रेस |
भारतीय दूतावास | सोम-शुक्र, 9:00 AM - 5:30 PM | टियरगार्टनस्ट्रास 17, 10785 बर्लिन, जर्मनी |
खालील पर्यायांमधून तुमची निवड करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या परदेशी ट्रिपसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता
होय. जर्मनीसाठी शेंगेन व्हिसासाठी अप्लाय करण्यासाठी, तुमच्याकडे वैध ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे.
जर्मनीसाठी ट्रिप कालावधी, एकूण प्रवासी आणि त्यांचे वय, निवडलेल्या कव्हरेजचा प्रकार इ. सारखे अनेक घटक ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या किंमतीवर परिणाम करू शकतात. तुम्ही भारतातून जर्मनीसाठी स्वस्त ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी वैद्यकीय तपासणी आवश्यकता पूर्णपणे तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, एचडीएफसी एर्गो द्वारे ऑफर केलेल्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स जर्मनी प्लॅन्ससह, तुम्हाला प्रवासापूर्वी अनिवार्य आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता नाही.
सामान्यपणे, बहुतांश जर्मन ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स त्याच्या संरक्षणाखाली पूर्व-विद्यमान आजार कव्हर करत नाही.
तुम्ही जर्मनीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स सहजपणे खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही या पेजवर नमूद केलेल्या स्टेप-बाय-स्टेप पद्धतीचे अनुसरण करू शकता किंवा एचडीएफसी एर्गो कडून जर्मनीसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स कसा खरेदी करावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करू शकता.
जर्मनीसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही एक पॉलिसी आहे जी तुमच्या सर्व मूलभूत गरजा कव्हर करते. त्यामध्ये अनेक लाभ आणि वैशिष्ट्ये आहेत आणि योग्य किंमतीच्या कक्षेत समाविष्ट आहेत. तुम्ही एचडीएफसी एर्गो येथे भारतातून जर्मनी साठी स्वस्त ट्रॅव्हल इन्श्युरन्स शोधू शकता.
किमान जर्मन ट्रॅव्हल हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज 30,000 EUR असावे आणि ते सर्व शेंगेन सदस्य राज्यांना लागू होते.