थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसीधारकाच्या वाहनाद्वारे अपघातामुळे उद्भवणाऱ्या थर्ड पार्टी लायबिलिटीजना कव्हर करते. टू-व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्स इन्श्युअर्ड व्यक्तीच्या वाहनाद्वारे अपघात झाल्यास थर्ड पार्टी प्रॉपर्टी/व्यक्तीला झालेल्या नुकसानीसाठी कव्हरेज प्रदान करते. यामध्ये थर्ड पार्टी व्यक्तीचा मृत्यू किंवा कायमस्वरुपी अपंगत्व समाविष्ट आहे. 1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्टनुसार, टू-व्हीलर मालकाकडे थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे. थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्सशिवाय भारतात बाईक किंवा स्कूटर चालवणे बेकायदेशीर आहे आणि ट्रॅफिक पोलीस तुम्हाला त्याशिवाय तुमचे वाहन चालवण्यासाठी ₹2000 पर्यंत दंड करू शकतात. एचडीएफसी एर्गो वेबसाईटवरून थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स खरेदी करणे त्रासमुक्त आहे, आजच तुमची राईड सुरक्षित करा.
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला त्याच्या काही वैशिष्ट्यांविषयी माहिती असायला हवी
वैशिष्ट्ये | वर्णन |
कमी प्रीमियम | थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स प्रीमियम ₹ 538 पासून सुरू होते आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्सच्या तुलनेत ते खूपच परवडणारे आहे. |
लायबिलिटी कव्हर प्रदान करते | 3rd पार्टी बाईक इन्श्युरन्स थर्ड-पार्टी प्रॉपर्टी/व्यक्तीला झालेल्या नुकसानामुळे उद्भवणाऱ्या फायनान्शियल आणि कायदेशीर लायबिलिटीजसाठी कव्हर करतो. यामध्ये तुमच्या इन्श्युअर्ड टू-व्हीलरमुळे थर्ड पार्टीला झालेली दुखापत किंवा मृत्यू समाविष्ट आहे. |
खरेदी करण्यास सोपे | थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स शून्य डॉक्युमेंटेशनसह सहजपणे ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो. |
कायदेशीर आवश्यकता पूर्ण करा | थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करून तुम्ही 1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार अनिवार्य आवश्यकता पूर्ण करू शकता. |
लाभ | वर्णन |
कायदेशीर गुंतागुंत टाळा | 1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार थर्ड पार्टी इन्श्युरन्स अनिवार्य आहे. जर तुम्ही वैध थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीशिवाय टू-व्हीलर चालवत असल्याचे आढळले तर तुम्हाला दंड आकारला जाईल. |
थर्ड पार्टी लायबिलिटीज करिता कव्हरेज | जर इन्श्युअर्ड बाईकमुळे थर्ड-पार्टीला दुखापत झाली असेल किंवा दुर्दैवी मृत्यू झाला तर या पॉलिसी अंतर्गत फायनान्शियल भरपाई कव्हर केली जाईल. |
परवडणारी पॉलिसी | थर्ड-पार्टी बाईक इन्श्युरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि स्टँडअलोन ओन-डॅमेज पॉलिसीपेक्षा अधिक परवडणारे आहे. IRDAI आपले प्रीमियम क्युबिक क्षमतेवर आधारित निर्धारित करते. |
थर्ड-पार्टी वाहनासाठी कव्हरेज | जर इन्श्युअर्ड बाईकने थर्ड पार्टीला नुकसान केले तर थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी कव्हरेज प्रदान करते. |
पेपरलेस प्रोसेस | तुम्ही थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स क्लेम कराल किंवा प्लॅन रिन्यू कराल तरीही कोणत्याही पेपरवर्कची आवश्यकता नाही. तुम्हाला सर्व संबंधित डॉक्युमेंट्स केवळ ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. |
आमच्या थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसीसह आम्ही तुमचे कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी ₹15 लाखांची अनिवार्य पर्सनल ॲक्सिडेंट (CPA) पॉलिसी ऑफर करतो.
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्समध्ये, इन्श्युअर्ड व्यक्तीच्या वाहनाचा समावेश असलेल्या कोणत्याही थर्ड पार्टी प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी इन्श्युरर खर्च भरेल.
जर इन्श्युअर्ड व्यक्तीच्या वाहनामुळे थर्ड पार्टी व्यक्तीला दुखापत झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर इन्श्युरर वैद्यकीय उपचार किंवा इतर नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करेल.
कायद्यानुसार प्रत्येक बाईक/स्कूटर मालकासाठी टू-व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्स खरेदी करणे आवश्यक आहे. तुम्ही 3rd पार्टी बाईक इन्श्युरन्सचे फायदे आणि तोटे यांचा अभ्यास केल्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्श्युरन्स पॉलिसी निवडू शकता. खालील टेबलमध्ये आपण त्यावर एक नजर टाकूया
फायदे | तोटे |
बाईकसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीसाठी इन्श्युररला कव्हरेज प्रदान करते, ज्यामध्ये थर्ड पार्टीला दुखापत किंवा मृत्यूचा समावेश होतो. उदा. श्री.A त्यांची टू-व्हीलर चालवताना चुकून श्री.B यांना दुखापत होते, अशावेळी इन्श्युरर श्री.B यांच्या उपचारांच्या खर्चासाठी पैसे देईल. | थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये इन्श्युअर्ड व्यक्तीला किंवा त्यांच्या वाहनाला झालेले कोणतेही नुकसान किंवा हानी कव्हर होणार नाही. उदा. श्री.A यांच्याकडे ही पॉलिसी आहे आणि त्यांचा अपघात झाला जिथे त्यांचे स्कूटर नुकसानग्रस्त झाले, अशा परिस्थितीत दुरुस्तीचा खर्च श्री.A द्वारे केला जाईल.. |
थर्ड पार्टी लायबिलिटीज करिता कव्हरेज | या पॉलिसीसह, इन्श्युरर पॉलिसीधारकाच्या बाईकच्या चोरीसाठी भरपाई देणार नाही. |
कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्श्युरन्स पॉलिसीच्या तुलनेत थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्ससाठी प्रीमियम परवडणारे आहे. | टू-व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्सचा खर्च कमी असतो, तथापि, तुम्हाला मर्यादित कव्हरेज मिळते. |
ही पॉलिसी खरेदी करण्यास सोपी आहे आणि प्रीमियम रेट इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (IRDAI) द्वारे निर्धारित केला जातो. | थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्ससह कोणतेही रायडर्स उपलब्ध नाहीत. तसेच, तुम्ही इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) कस्टमाईज करू शकत नाही. |
थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स तुम्हाला पॉलिसीधारकाला सर्वात मूलभूत प्रकारचे कव्हरेज प्रदान करते. हे तुम्हाला वाहन, प्रॉपर्टी किंवा व्यक्तीला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून कव्हर करते. सर्व टू-व्हीलर मालकांसाठी थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स देखील अनिवार्य आहे, ते नसल्यास ₹2000 दंड आणि/3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
पॅरामीटर | कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्श्युरन्स | थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स |
कव्हरेज | कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी स्वत:च्या नुकसानीसाठी तसेच थर्ड पार्टी लायबिलिटीज साठी देखील कव्हरेज प्रदान करते. | थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी केवळ थर्ड पार्टी लायबिलिटीजसाठी कव्हरेज ऑफर करते. यामध्ये इन्श्युअर्डच्या वाहनामुळे थर्ड पार्टीची दुखापत, मृत्यू आणि प्रॉपर्टीचे नुकसान समाविष्ट आहे. |
आवश्यकतेचे स्वरूप | हे अनिवार्य नाही, तथापि तुमच्यासाठी आणि तुमच्या वाहनासाठी एकूण संरक्षण मिळविण्याची शिफारस केली जाते. | मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार किमान थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर असणे अनिवार्य आहे |
ॲड-ऑन्स उपलब्धता | एचडीएफसी एर्गो कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्श्युरन्स सह तुम्ही झिरो डेप्रीसिएशन कव्हर आणि इमर्जन्सी असिस्टन्स कव्हर प्राप्त करू शकता. | थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्ससह ॲड-ऑन कव्हर निवडता येत नाही. |
खर्च | हे तुलनात्मकरित्या महाग आहे कारण हे व्यापक कव्हरेज ऑफर करते. | हे कमी महाग आहे कारण ते केवळ थर्ड पार्टी लायबिलिटीजसाठी कव्हरेज ऑफर करते. |
बाईक मूल्याचे कस्टमायझेशन | तुम्ही तुमच्या इन्श्युरन्सच्या आवश्यकतांनुसार कॉम्प्रिहेन्सिव्ह टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी कस्टमाईज करू शकता. | थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी कस्टमाईज केली जाऊ शकत नाही. ही एक प्रमाणित पॉलिसी आहे ज्याचा खर्च IRDAI घोषित वार्षिक बाईक इन्श्युरन्स रेट्स आणि तुमच्या बाईकच्या इंजिन क्यूबिक क्षमतेच्या आधारावर निर्धारित केला जातो. |
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स अंतर्गत मालक-ड्रायव्हरला भरपाई ऑफर केली जाते. तथापि, मालक-ड्रायव्हरकडे इन्श्युअर्ड बाईकचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. खालील टेबलमध्ये, तुम्ही पॉलिसीधारकाला थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत ऑफर केली जाणारी भरपाईची टक्केवारी पाहू शकता:
दुखापतीचे स्वरूप | भरपाईचे प्रमाण |
मृत्यूच्या बाबतीत | 100% |
दोन अवयव किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावण्याच्या बाबतीत | 100% |
एक अवयव आणि एका डोळ्याची दृष्टी गमावण्याच्या बाबतीत | 50% |
दुखापतींमुळे कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वाच्या बाबतीत | 100% |
सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार, सर्व जनरल इन्श्युरन्स कंपन्यांना नवीन बाईकसाठी लाँग टर्म थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करावी लागेल. टू-व्हीलर्ससाठी अनिवार्य पाच वर्षाची पॉलिसी ऑफर करण्यासाठी IRDAI ने इन्श्युरन्स कंपन्यांना निर्देशित केले आहे. त्यामुळे, प्रत्येक नवीन बाईक मालकाने त्यांच्या वाहनाची पाच वर्षांची थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी असल्याची खात्री करावी. या नवीन पॉलिसीच्या प्रारंभासह, आता प्रत्येक वर्षी पॉलिसी रिन्यू करण्याचा कोणताही त्रास राहिलेला नाही. या पॉलिसीसह, पॉलिसीधारक प्रीमियममध्ये वार्षिक वाढ टाळू शकतो कारण ती पाच वर्षांसाठी सेट केली जाते.
1 जून, 2022 पासून लागू असलेल्या लाँग टर्म थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसीसाठी खालील रेट्स लागू आहेत
इंजिन क्षमता (cc) | 5 वर्षांसाठी थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स रेट्स |
75cc पर्यंत | ₹ 2901 |
75 ते 150 cc दरम्यान | ₹ 3851 |
150 ते 350 cc दरम्यान | ₹ 7365 |
350 cc पेक्षा जास्त | ₹ 15117 |
IRDAI टू-व्हीलरच्या इंजिन क्षमतेवर आधारित थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स प्रीमियम निर्धारित करते. म्हणून, टू-व्हीलरची इंजिन क्युबिक क्षमता (cc) हा एकमेव घटक आहे जो थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करतो.
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करताना, त्याचे प्रीमियम कसे कॅल्क्युलेट केले जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमचे बाईक इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाईड येथे दिले आहे
• स्टेप 1 – एचडीएफसी एर्गो वेबसाईटला भेट द्या आणि तुमचा बाईक रजिस्ट्रेशन क्रमांक टाईप करा आणि कोट मिळवा वर क्लिक करून पुढे सुरू ठेवा.
• स्टेप 2- तुम्हाला तुमच्या बाईकचे मेक आणि मॉडेल टाईप करावे लागेल.
• स्टेप 3 – तुम्ही थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स प्लॅन निवडणे आवश्यक आहे.
• स्टेप 4 – तुमच्या मागील बाईक इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल तपशील द्या- कालबाह्यता तारीख. तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID टाईप करा.
• स्टेप 5 - तुम्ही आता तुमच्या थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्सची किंमत पाहू शकता.
मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स अनिवार्य असण्याव्यतिरिक्त, तुमच्याकडे हे कव्हर का असावे याची इतर कारणे आहेत:
✔ कायद्यानुसार अनिवार्य: थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्स हे एक आवश्यक परंतु अनिवार्य कव्हर आहे जे भारतातील सर्व बाईक मालकांकडे असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ट्रॅफिक पोलिसांना थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्सशिवाय आढळलात तर तुम्हाला ₹2000/ पर्यंत दंड होऊ शकतो.
✔ 3rd पार्टी वाहनाचे कोणतेही नुकसान कव्हर करते: इन्श्युअर्ड बाईकमुळे थर्ड पार्टी वाहन किंवा त्यांच्या प्रॉपर्टी सोबत झालेल्या अपघाताच्या बाबतीत, तुमचे थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स कव्हरेज तुम्हाला त्याबद्दल काळजी न करता नुकसानीच्या खर्चाची भरपाई करेल.
✔ 3rd पार्टी वाहन मालक-ड्रायव्हरच्या कोणत्याही दुखापत किंवा मृत्यूसाठी कव्हरेज: जर इन्श्युअर्ड बाईकद्वारे अपघातादरम्यान थर्ड पार्टी वाहनाच्या मालकाला दुखापत झाली तर थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स अशा वैयक्तिक नुकसानासाठी फायनान्शियल नुकसान भरेल. तसेच, जर थर्ड पार्टी व्यक्तीचा अपघातामुळे मृत्यू झाला तर थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स इन्श्युअर्डला कायदेशीर आणि फायनान्शियल परिणामांपासून संरक्षित करेल.
✔ जलद आणि सोपी खरेदी: कंटाळवाणी इन्श्युरन्स खरेदी प्रक्रिया आता जुनी झाली आहे. आता आमच्या वेबसाईटला भेट देऊन किमान डॉक्युमेंटेशनसह केवळ काही क्लिक्समध्ये तुमचा प्राधान्यित थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स मिळवा
✔ किफायतशीर इन्श्युरन्स पॉलिसी: सर्व थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स प्रीमियम IRDAI द्वारे पूर्वनिर्धारित केले जात असल्याने; हे या पॉलिसीला सर्वांसाठी परवडणारी बनवते. त्यामुळे, नाममात्र मूल्यामध्ये, तुम्ही रस्त्याच्या वळणावर तुमच्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या कोणत्याही अनपेक्षित थर्ड पार्टी खर्चासाठी कव्हरेजची अपेक्षा करू शकता.
तसेच वाचा: थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्सचे फायदे
एचडीएफसी एर्गो टू-व्हीलर इन्श्युरन्सला खास बनवणारे प्रमुख मुद्दे येथे दिले आहेत:
• त्वरित, पेपरलेस इन्श्युरन्स खरेदी प्रक्रिया
• प्रीमियम ₹ 538 पासून सुरु*
• इमर्जन्सी डोअरस्टेप किंवा रोडसाईड असिस्टन्स ॲड-ऑन कव्हरचा पर्याय
• 2000+ कॅशलेस गॅरेजचे एक विस्तृत नेटवर्क
• अमर्यादित क्लेम केले जाऊ शकतात
• 100% क्लेम सेटलमेंट रेशिओ^
• तपासणीशिवाय रिन्यूवलचा पर्याय
खालील स्टेप्स तुम्हाला थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्याबाबत मार्गदर्शन करतील.
सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारे प्रीमियम भरा. टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेसवर किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवली जाईल.
जर तुम्हाला थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करायची असेल तर तुम्हाला खालील स्टेप्स पाहणे आवश्यक आहे:
स्टेप 1: इन्श्युररच्या वेबसाईटला भेट द्या, वाहन रजिस्ट्रेशन नंबर टाईप करा आणि पॉलिसी रिन्यू करा निवडा.
स्टेप 2: तुम्हाला रिन्यू करायची असलेल्या तुमच्या पॉलिसीशी संबंधित तपशील टाईप करा. थर्ड पार्टी कव्हर प्लॅन निवडा.
स्टेप 3: रिन्यू केलेली बाईक इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या रजिस्टर्ड ईमेल-ID वर मेल केली जाईल.
भारतीय रस्त्यांवर बाईक राईड करण्यामध्ये अपघातांचा जास्त संभाव्यता दर असल्यामुळे अनेक जोखीम समाविष्ट आहेत. नुकसानीसाठी भरपाई देण्यासाठी सर्व टू-व्हीलर मालकांसाठी इन्श्युरन्स महत्त्वाचा आहे आणि आदर्श प्लॅनने कोणत्याही वाहनाच्या नुकसानीसाठी कव्हरेज प्रदान केला पाहिजे. जर तुमच्याकडे मूलभूत थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी असेल तर तुम्हाला केवळ थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी कव्हरेज मिळेल, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स स्वत:च्या नुकसानीसाठी आणि थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी कव्हरेज प्रदान करते. जर तुमच्याकडे तुमच्या बाईकसाठी केवळ मूलभूत थर्ड पार्टी इन्श्युरन्स असेल तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्समध्ये बदलण्याच्या स्टेप्स येथे आहेत:
• इन्श्युररच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
• टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी करा वर क्लिक करा.
• तुमच्या विद्यमान थर्ड-पार्टी इन्श्युरन्स पॉलिसीच्या संदर्भात तपशील असलेले सर्व आवश्यक फॉर्म सादर करा
• तुम्ही तुमच्या टू-व्हीलरसाठी स्वत: तपासणी पर्याय निवडू शकता.
• सर्व्हेयरने दिलेल्या रिपोर्टवर आधारित, पॉलिसी प्लॅन अपग्रेड केला जाईल
• मागील थर्ड-पार्टी इन्श्युरन्स प्लॅन कॅन्सल केला जाईल आणि नवीन पॉलिसी सुरू केली जाईल
✔ वैध पुरावा इन्श्युअर्ड बाईकने त्यांना, त्यांची कार किंवा त्यांच्या प्रॉपर्टीला केलेल्या नुकसानीसाठी क्लेम करण्यापूर्वी थर्ड पार्टीकडे योग्य, अचूक आणि विश्वासार्ह पुरावा असणे आवश्यक आहे.
✔ इन्श्युरन्स कंपनी आणि पोलिसांना कळवणे: जर तुमची कव्हर केलेली बाईक अपघातात समाविष्ट असेल तर तुमच्या इन्श्युरन्स कंपनी आणि पोलिसांना त्वरित सूचित करण्याची खात्री करा, जेणेकरून थर्ड पार्टीला हानी झाल्यास तुम्ही सहजरित्या खालील पावले उचलू शकता.
✔ नुकसानीची लिमिट मोटर अपघात क्लेम न्यायाधिकरण नुकसानीमध्ये दिली जाऊ शकणारी कमाल रक्कम नमूद करणारी ऑर्डर पास करेल. भरपाईची रक्कम IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. सध्या, थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी कमाल देय रक्कम ₹7.5 लाख आहे. तथापि, थर्ड पार्टीला दुखापत झाल्यास, भरपाईच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
• थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसीची कॉपी
• व्हेरिफिकेशनसाठी बाईकच्या RC आणि मूळ कर पावत्यांची कॉपी.
• थर्ड पार्टीच्या मृत्यू, नुकसान आणि शारीरिक दुखापती रिपोर्ट करताना पोलिस FIR रिपोर्ट.
• तुमच्या मूळ ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी.
• नुकसान दुरुस्तीचा अंदाज.
• पेमेंट पावती आणि दुरुस्ती बिल.
बाईक इंजिन क्षमता | प्रीमियम |
75cc पेक्षा कमी | ₹482 |
75cc पेक्षा अधिक परंतु 150cc पेक्षा कमी | ₹752 |
150cc पेक्षा अधिक परंतु 350cc पेक्षा कमी | ₹1,193 |
350cc पेक्षा अधिक | ₹2,323 |