नॉलेज सेंटर
एचडीएफसी एर्गो #1.6 कोटी+ आनंदी कस्टमर्स
#1.6 कोटी+

आनंदी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो 1 लाख+ कॅशलेस हॉस्पिटल्स
1 लाख

कॅशलेस हॉस्पिटल

एचडीएफसी एर्गो 24x7 इन-हाऊस क्लेम सहाय्य
24x7 इन-हाऊस

क्लेम असिस्टन्स

एचडीएफसी एर्गो कोणतीही आरोग्य तपासणी नाही
कोणतीही आरोग्य

तपासणी नाही

होम / ट्रॅव्हल इन्श्युरन्स / भारतातून थायलँड ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करा

ट्रॅव्हल इन्श्युरन्स करिता थायलँड

थायलंड हा रंगीबेरंगी संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य असलेला एक अद्भुत देश आहे. त्याचा समृद्ध इतिहास, मोहक दृश्ये, मनःपूर्वक आदरातिथ्य पर्यटकांना आकर्षित करते. तुम्ही तुमच्या थायलंडच्या रोमांचक सहलीला सुरुवात करत असताना, थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स सुरक्षित करणे खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला मनःशांती तर मिळेलच, पण तुम्ही गजबजलेल्या बाजारपेठा, प्रसन्न मंदिरे आणि रमणीय समुद्रकिनाऱ्यांवर कोणतीही चिंता न करता फिरू शकाल.

थायलंडसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या गरजेनुसार कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफर करतो. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीपासून ते ट्रिप कॅन्सलेशन किंवा सामान हरवण्यापर्यंत, योग्य प्लॅन शोधणे चिंता-मुक्त प्रवास सुनिश्चित करते. थायलंड पास इन्श्युरन्सचा विचार करा. विशेषत: या काळात देशाच्या प्रवेश आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले.

भारतातून थायलंडसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्सची ऑनलाईन निवड करणे सोयीस्कर आणि सुविधाजनक तर आहेच, तसेच तुम्ही या मनमोहक देशात निरंतर सफर देखील करू शकता. लक्षात ठेवा, सर्वोत्तम इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्या ट्रॅव्हल प्लॅन्ससह संरेखित असतो, ज्याने थायलंडच्या अविस्मरणीय प्रवासादरम्यान तुम्ही पूर्णपणे संरक्षित असल्याची खात्री मिळते.

थायलँडच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रमुख वैशिष्ट्ये तपशील
व्यापक कव्हरेज वैद्यकीय, प्रवास आणि सामानाशी संबंधित समस्यांसाठी कव्हर.
कॅशलेस लाभ एकाधिक नेटवर्क हॉस्पिटल्सद्वारे कॅशलेस ऑफर केले जातात.
कोविड-19 कव्हरेज COVID-19-related हॉस्पिटलायझेशन कव्हर करते.
24x7 कस्टमर सपोर्ट चोवीस तास त्वरित कस्टमर सपोर्ट.
त्वरित क्लेम सेटलमेंट जलद क्लेम सेटलमेंटसाठी समर्पित क्लेम मंजुरी टीम.
विस्तृत कव्हरेज रक्कम एकूण कव्हरेजची रक्कम $40K ते $1000K पर्यंत.

थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे प्रकार

तुम्ही तुमच्या ट्रिपच्या आवश्यकतेनुसार थायलंडसाठी विविध प्रकारच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्समधून निवडू शकता. मुख्य पर्याय खालीलप्रमाणे- ;

एचडीएफसी एर्गोचा एका व्यक्तीसाठी ट्रॅव्हल प्लॅन

व्यक्तींसाठी ट्रॅव्हल प्लॅन्स

एकटे प्रवासी आणि साहस प्रेमींसाठी

या प्रकारची पॉलिसी एकट्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या आकस्मिक परिस्थितींपासून संरक्षण देते. एचडीएफसी एर्गो इंडिव्हिज्युअल थायलंड ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय अशा दोन्ही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना आर्थिकदृष्ट्या कव्हर ठेवण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये आणि लाभांसह सुसज्ज आहे.

प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
एचडीएफसी एर्गो द्वारे कुटुंबांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

कुटुंबांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

एकत्र प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी

तुमच्या कुटुंबासोबत परदेशी प्रवास करताना तुम्हाला त्यांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी अनेक घटक विचारात घेणे आवश्यक आहे. कुटुंबांसाठी थायलँड ट्रॅव्हल इन्श्युरन्स त्यांच्या प्रवासादरम्यान एकाच प्लॅन अंतर्गत कुटुंबातील अनेक सदस्यांना कव्हरेज देऊ करते.

प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
एचडीएफसी एर्गोद्वारे विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल प्लॅन

ज्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत त्यांच्यासाठी

या प्रकारचा प्लॅन अभ्यास/शिक्षण संबंधित उद्देशांसाठी थायलंडला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हा तुम्हाला जामीन पत्र, अनुकंपा भेटी, प्रायोजक संरक्षण इ. सारख्या निवासाशी संबंधित कव्हरेजसह विविध आकस्मिक परिस्थितींपासून सुरक्षित ठेवेल, जेणेकरून तुम्ही परदेशात राहताना तुमच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकता.

प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
एचडीएफसी एर्गोद्वारे फ्रिक्वेंट फ्लायर्ससाठी ट्रॅव्हल प्लॅन

फ्रिक्वेंट फ्लायर्ससाठी ट्रॅव्हल प्लॅन

वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांसाठी

हा प्लॅन वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांसाठी डिझाईन केला आहे, त्यांना एका कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत अनेक ट्रिप्ससाठी कव्हरेज मिळते. एचडीएफसी एर्गो फ्रीक्वेंट फ्लायर ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह, तुम्हाला निर्दिष्ट पॉलिसी कालावधीमध्ये प्रत्येक ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्याची चिंता करण्याची गरज नाही.

प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या
सिनिअर सिटीझन साठी ट्रॅव्हल प्लॅन

सिनिअर सिटीझन साठी ट्रॅव्हल प्लॅन

नेहमी चिरतरुण असलेल्यांसाठी

या प्रकारचा प्लॅन विशेषत: आंतरराष्ट्रीय ट्रिपवर होऊ शकणाऱ्या विविध गुंतागुंतींपासून सीनिअर सिटीझन्सला कव्हरेज ऑफर करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. थायलंडसाठी एचडीएफसी एर्गो सीनिअर सिटीझन ट्रॅव्हल इन्श्युरन्स ट्रिपदरम्यान वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय अनिश्चितता असल्यास तुम्हाला कव्हर करण्याची खात्री देतो.

प्लॅन पाहा अधिक जाणून घ्या

ट्रॅव्हल इन्श्युरन्स थायलँड खरेदीचे लाभ

प्रवासासाठी थायलँड ट्रॅव्हल इन्श्युरन्स असण्याचे काही आवश्यक लाभ पुढीलप्रमाणे : ;

1

24x7 कस्टमर सपोर्ट

ट्रिपदरम्यान परदेशात अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता नेहमीच असते. तथापि, थायलँडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून, तुम्ही ते कठीण परिस्थितीशी सहजपणे नियंत्रण ठेवू शकता. एचडीएफसी एर्गो संकटाच्या वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव कस्टमर केअर सपोर्ट आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह थायलँड ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑफर करते.

2

वैद्यकीय कव्हरेज

आंतरराष्ट्रीय प्रवास करताना वैद्यकीय आणि दातांसंबंधी आपत्कालीन परिस्थिती ऐकिवात आहेत. त्यामुळे, तुमच्या थायलंडच्या सुट्टीदरम्यान अशा अनपेक्षित घटनांपासून स्वत:ला आर्थिकदृष्ट्या संरक्षित ठेवण्यासाठी, थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवण्याचा विचार करा. या पॉलिसीअंतर्गत वैद्यकीय कव्हरेजमध्ये आपत्कालीन वैद्यकीय आणि दातांसंबंधी खर्च, वैद्यकीय आणि शरीराचे प्रत्यावर्तन, अपघाती मृत्यू इ. गोष्टींचा समावेश होतो.

3

नॉन-मेडिकल कव्हरेज

अनपेक्षित वैद्यकीय समस्यांव्यतिरिक्त, ट्रॅव्हल इन्श्युरन्स थायलंड ट्रिपदरम्यान होऊ शकणाऱ्या अनेक गैर-वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींसाठी फायनान्शियल कव्हरेज ऑफर करतो. यामध्ये पर्सनल लायबिलिटी, हायजॅक डिस्ट्रेस अलाउन्स, फायनान्शियल इमर्जन्सी असिस्टन्स, सामान आणि वैयक्तिक डॉक्युमेंट्स हरवणे इत्यादींसारख्या अनेक सामान्य प्रवास आणि सामानाशी संबंधित गैरसोयी समाविष्ट आहेत.

4

तणावमुक्त सुट्टी

आंतरराष्ट्रीय ट्रिपदरम्यान दुर्दैवी घटना अनुभवास येणे हे आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही दृष्ट्या आव्हानात्मक असते. अशा समस्या तुमच्यासाठी भरपूर तणाव निर्माण करू शकतात, विशेषत: जर तुम्ही त्यांना तोंड देण्यास तयार नसाल तर. तथापि, थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स एक फायनान्शियल सुरक्षा म्हणून काम करते ज्यामुळे तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता. पॉलिसीद्वारे ऑफर केलेले जलद आणि विस्तृत कव्हरेज तुमच्या चिंता कमीत कमी ठेवते.

5

तुमच्या खिशाला परवडणारे

तुम्हाला भारतातून थायलंडसाठी परवडणारा ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळू शकतो जो तुम्हाला काही परिस्थितीत फायनान्शियल सहाय्य ऑफर करेल. अशा प्रकारे, अनपेक्षित घटनेदरम्यान तुम्हाला स्वत:च्या खिशातून अतिरिक्त कॅश खर्च करावी लागणार नाही, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या निश्चित केलेल्या बजेटमध्ये राहता येईल. ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे भरपूर लाभ त्याच्या खर्चापेक्षा सहजपणे जास्त आहेत.

6

कॅशलेस लाभ

थायलंड ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे मुख्य फायदे म्हणजे त्यांचे कॅशलेस क्लेम वैशिष्ट्य. याचा अर्थ असा की परतफेडी सह व्यक्ती परदेशात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना कॅशलेस उपचार निवडू शकतात. एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये जगभरातील नेटवर्क अंतर्गत 1 लाखांपेक्षा जास्त भागीदारीत हॉस्पिटल्स आहेत. ज्यात व्यक्तींना त्वरित वैद्यकीय सर्व्हिस प्रदान केली जाते.

तुमच्या थायलंड ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स शोधत आहात का? आणखी शोधण्याची गरज नाही.

थायलंडसाठी भारतातील ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जाते

सामान्यपणे भारतातील थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केलेल्या काही गोष्टी येथे दिल्या आहेत ;

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

या लाभामध्ये हॉस्पिटलायझेशन, रुमचे भाडे, OPD उपचार आणि रोड ॲम्ब्युलन्स खर्च यांचा समावेश होतो. आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय प्रत्यावर्तन आणि मृत शरीराच्या प्रत्यावर्तन यावरील खर्चाची देखील परतफेड केली जाते.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे आपत्कालीन दातांच्या खर्चाचे कव्हरेज

दातांचा खर्च

आमचा असा विश्वास आहे की, डेंटल हेल्थकेअर हे शारीरिक आजारामुळे किंवा दुखापतीमुळे हॉस्पिटलायझेशन करण्याइतकेच महत्त्वाचे आहे; म्हणून, तुमच्या प्रवासादरम्यान होणारे दातासंबंधीचे खर्च आम्ही कव्हर करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

पर्सनल ॲक्सिडेंट

पर्सनल ॲक्सिडेंट

आम्ही तुम्हाला बारकाईने सर्व बाबी जाणून घेण्याचा सल्ला देतो.. अपघाताच्या घटनेमध्ये, परदेशात प्रवास करताना, आमचा इन्श्युरन्स प्लॅन कायमस्वरुपी अपंगत्व किंवा अपघाती मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक संकटाच्या स्थितीत सहाय्य करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला लंपसम पेमेंट प्रदान करतो.

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

आम्ही चढ-उताराच्या काळात तुमच्यासोबत असण्याचा विश्वास व्यक्त करतो.. त्यामुळे, दुर्दैवी परिस्थितीत, कॉमन कॅरियर असताना अपघाती मृत्यू किंवा दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आल्यास आम्ही एकरकमी पेआउट देऊ.

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

जर एखाद्या व्यक्तीला इजा किंवा आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल तर आम्ही हॉस्पिटलायझेशनच्या प्रत्येक दिवसासाठी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कमाल दिवसांपर्यंत प्रति दिवस सम इन्श्युअर्ड अदा करू.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे विमानाला होणाऱ्या विलंबासाठी कव्हरेज

फ्लाईट विलंब आणि कॅन्सलेशन

फ्लाईट विलंब किंवा कॅन्सलेशन आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात, परंतु काळजी नसावी, आमची रिएम्बर्समेंट वैशिष्ट्ये तुम्हाला अडचणीतून उद्भवणारे कोणतेही आवश्यक खर्च पूर्ण करण्याची परवानगी देते.

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब किंवा कॅन्सलेशनच्या बाबतीत, आम्ही तुमच्या पूर्व-बुक केलेल्या निवास आणि ॲक्टिव्हिटीचा नॉन-रिफंडेबल भाग रिफंड करू. पॉलिसीच्या अटी आणि शब्दांच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे सामान आणि वैयक्तिक डॉक्युमेंट्स हरवणे

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे

महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गमावल्याने तुम्हाला परदेशात अडकले जाऊ शकते. त्यामुळे, आम्ही नवीन किंवा ड्युप्लिकेट पासपोर्ट आणि/किंवा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्याशी संबंधित खर्चाची परतफेड करू.

ट्रिपमध्ये खंड

ट्रिपमध्ये खंड

अनपेक्षित परिस्थितीमुळे तुम्हाला तुमची ट्रिप अर्ध्यावर सोडावी लागल्यास चिंता करू नका.. आम्ही तुम्हाला पॉलिसी शेड्यूलनुसार तुमच्या नॉन-रिफंडेबल निवासासाठी आणि प्री-बुक केलेल्या उपक्रमांसाठी परतफेड करू.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे वैयक्तिक दायित्व कव्हरेज

पर्सनल लायबिलिटी

जर तुम्हाला परदेशात थर्ड-पार्टीच्या नुकसानीसाठी कधीही जबाबदार वाटत असेल तर आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला त्या नुकसानीसाठी सहजपणे भरपाई देण्यास मदत करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

ट्रिपमध्ये खंड

इन्श्युअर्ड व्यक्तीसाठी आपत्कालीन हॉटेल निवास

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा अर्थ असा असू शकतो की तुम्हाला तुमचे हॉटेल बुकिंग आणखी काही दिवस वाढवावे लागेल. अतिरिक्त खर्चाबद्दल काळजी वाटते? तुम्ही रिकव्हर करताना आम्ही त्याची काळजी घेऊ. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन

फ्लाईट कनेक्शन चुकले आहे

फ्लाईट कनेक्शन चुकणे

फ्लाईट कनेक्शन चुकल्यामुळे अनपेक्षित खर्चाची चिंता करू नका; तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवास आणि पर्यायी विमान बुकिंगवर झालेल्या खर्चासाठी आम्ही तुम्हाला परतफेड करू.

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे :

हायजॅक डिस्ट्रेस अलाउन्स

विमान हायजॅक हा निश्चितच त्रासदायक अनुभव ठरू शकतो.. आणि अधिकारी समस्येचे निराकरण करण्यास मदत करताना, आम्ही निश्चितच मदतीचा हात देऊ आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी तुम्हाला भरपाई देऊ.

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

आपत्कालीन कॅश असिस्टन्स सर्व्हिस

प्रवास करताना, चोरी किंवा दरोडा यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते.. परंतु काळजी करू नका ; एचडीएफसी एर्गो भारतातील इन्श्युअर्डच्या कुटुंबाकडून फंड ट्रान्सफरची सुविधा देऊ शकते. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे चेक-इन केलेले सामान हरवणे

चेक-इन केलेले सामान हरवणे

तुमचे चेक-इन केलेले बॅगेज हरवले का?? काळजी करू नका ; आम्ही नुकसानासाठी तुम्हाला भरपाई देऊ, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवश्यक व सुट्टीच्या मूलभूत गोष्टींशिवाय जावे लागणार नाही. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

वाट पाहण्यात कधीही मजा येत नाही. जर तुमच्या सामानाला विलंब झाला तर आम्ही तुम्हाला कपडे, प्रसाधने आणि औषधे यासारख्या आवश्यक गोष्टींसाठी परतफेड करू, जेणेकरून तुम्ही तुमचे सुट्टी चिंता-मुक्त करू शकता.

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे :

सामान आणि त्यामधील साहित्याची चोरी

सामानाच्या चोरीमुळे तुमच्या ट्रिपवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या ट्रिपच्या सुयोग्य नियोजनासाठी आम्ही साहित्य चोरीच्या स्थितीत तुम्हाला परतफेड करू. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

आमच्या काही ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये वर नमूद केलेले कव्हरेज उपलब्ध नसतील. कृपया आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी मजकूर, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

थायलंडसाठी भारतातील ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जात नाही

भारतातून थायलंडसाठीची तुमची ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी कदाचित यासाठी कव्हरेज ऑफर करू शकत नाही ;

कायद्याचे उल्लंघन

कायद्याचे उल्लंघन

युद्धामुळे उद्भवलेले आजार किंवा आरोग्यविषयक समस्या किंवा कायद्याचे उल्लंघन प्लॅनद्वारे कव्हर केले जात नाही.

मादक पदार्थांचे सेवन एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे कव्हर केलेले नाही

मादक पदार्थांचे सेवन

जर तुम्ही कोणतेही मादक पदार्थ किंवा प्रतिबंधित पदार्थ सेवन केले तर पॉलिसी कोणतेही क्लेम स्वीकारणार नाही.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये पूर्व विद्यमान रोग कव्हर केलेले नाहीत

पूर्व विद्यमान रोग

तुम्ही इन्श्युअर्ड केलेल्या प्रवासापूर्वी तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असल्यास आणि आधीच अस्तित्वात असलेल्या आजारावर तुम्ही उपचार घेत असल्यास, पॉलिसी या घटनांशी संबंधित खर्च कव्हर करत नाही.

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणा यासंबंधी उपचार एचडीएफसी एर्गोच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये कव्हर केलेला नाही

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार

इन्श्युअर्ड केलेल्या प्रवासादरम्यान तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणासंबंधी उपचार घेण्याचा निर्णय घेतला असेल तर, असे खर्च कव्हर केले जात नाहीत.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे स्वत:ला झालेली इजा कव्हर केली जात नाही

स्वत: ला केलेली दुखापत

आम्ही ऑफर करत असलेल्या इन्श्युरन्स प्लॅन्सद्वारे स्वत: ला केलेल्या दुखापतीमुळे उद्भवणारे कोणतेही हॉस्पिटलायझेशन खर्च किंवा वैद्यकीय खर्च कव्हर केले जात नाहीत.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन कसा खरेदी करावा?

• आमची पॉलिसी खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा लिंक, किंवा एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स वेबपेजला भेट द्या.

• प्रवाशाचा तपशील, डेस्टिनेशनची माहिती आणि ट्रिपची प्रारंभ आणि समाप्ती तारीख टाईप करा.

• आमच्या तीन तयार पर्यायांमधून तुमचा प्राधान्यित प्लॅन निवडा.

• तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा.

• प्रवाशांविषयी अतिरिक्त तपशील भरा आणि ऑनलाईन पेमेंट पद्धती वापरून पेमेंट करण्यासाठी पुढे सुरू ठेवा.

• आता केवळ करायचे शिल्लक म्हणजे- तुमची पॉलिसी त्वरित डाउनलोड करा!

परदेशात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे तुमच्या प्रवासाच्या बजेटमध्ये अडथळा येऊ देऊ नका. ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह आपत्कालीन वैद्यकीय आणि दातासंबंधी खर्चासाठी स्वत:ला आर्थिकदृष्ट्या कव्हर ठेवा.

थायलँड विषयी मजेदार तथ्ये

थायलंड मधील तुमचा अनुभव वर्धित करण्यासाठी, थायलंड विषयी काही मजेदार तथ्ये येथे जाणून घ्या:

कॅटेगरी विशिष्टता
मनमोहक वन्यजीवअभयारण्यांमधील हत्तींपासून ते सिमिलन बेटांसारख्या प्रख्यात डायव्हिंग स्पॉट्समध्ये जिवंत सागरी जीवनापर्यंत विविध प्रकारचे वन्यजीव या देशात आहेत.
फ्लोटिंग मार्केट्सयेथील प्रसिद्ध डॅमनोएन सादुक मार्केट तुम्हाला एक अद्भुत अनुभव देते, येथील स्थानिक जीवन आणि पाण्यावर तरंगणाऱ्या बोटींवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे हे मार्केट अप्रतिम दिसते.
फेस्टिव्हल्स आणि सेलिब्रेशन्सयेथील रंगीबेरंगी उत्सव, सॉन्गक्रान (थाई नववर्ष) हा जलोत्सव आहे, ज्यामध्ये लोक एकमेकांवर पाणी फेकून हा सण साजरा करतात, हे थायलंडची अनोखी संस्कृती आणि परंपरा दर्शवते.
फिल्म इंडस्ट्रीथायलंडची फिल्म इंडस्ट्री भरभराटीला येत आहे, येथे "ओंग-बक" आणि "द प्रोटेक्टर" सारख्या प्रतिष्ठित सिनेमांची निर्मिती झाली आहे, जे त्याची जागतिक सिनेमाची क्षमता प्रदर्शित करते.
बौद्ध मंदिरेथायलंडमध्ये, प्रत्येक युनिक, वाट फो च्या प्रसिद्ध विराजमान बुद्धसह 40,000 पेक्षा जास्त बौद्ध मंदिरे आहेत.
पाककृती विविधताथाई फूड त्याच्या स्वादिष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे - ते गोड, आंबट, खारट आणि मसालेदार यांचा समतोल राखते, पॅड थाई आणि टॉम यम गूंग हे लोकप्रिय पदार्थ आहेत.
सर्वात मोठे नावथायलंडमध्ये एक गाव आहे ज्याचे नाव जगात सर्वात लांब आहे: "क्रुंग थेप महानाखोन आमोन रतनकोसिन महिंथरा अयुथया महादिलोक फोप नोपफरत रतचथानी बुरिरोम उडोमरातचानिवेत महासाथन आमोन पिमन अवतन सथित सक्कथट्टिया वित्सानुकम प्रसित.”
हत्तींची राजधानी"जागतिक हत्तीची राजधानी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थायलंडचा या भव्य प्राण्यांशी एक टिकाऊ सांस्कृतिक संबंध आहे. जो सामर्थ्य आणि अध्यात्माचे प्रतीक आहे.
तुक-तुक्सआयकॉनिक थ्री-व्हील्ड तुक-तुक थायलंडच्या शहरांमध्ये सर्वसमावेशक आहेत, जे स्थानिक आणि पर्यटकांसाठी वाहतुकीची सोयीस्कर आणि साहसी पद्धत प्रदान करतात.

थायलंड टूरिस्ट व्हिसासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

थायलँड मध्ये प्रवास करताना, तुम्हाला थायलँड टूरिस्ट व्हिसाची आवश्यकता असेल आणि खालील डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:

• पूर्ण व्हिसा ॲप्लिकेशन फॉर्म

• हॉटेल किंवा प्रायव्हेट निवास बुकिंगचे कन्फर्मेशन

• कालबाह्य होईपर्यंत किमान 6 महिन्यांचा वैध पासपोर्ट

• अर्जदाराचा अलीकडील 4x6cm फोटो

• फायनान्शियल पुरावा: बँक स्टेटमेंटद्वारे प्रति व्यक्ती 10,000 बात किंवा प्रति कुटुंब 20,000 बात

• पूर्णपणे भरलेले राउंड-ट्रिप एअर तिकीट किंवा ई-तिकीट

थायलँडला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ

थायलंडला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ मुख्यत्वे तुम्ही पाहू इच्छित असलेल्या प्रदेशावर अवलंबून आहे. साधारणपणे, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा प्रमुख हंगाम असतो. ज्याचे वैशिष्ट्य थंड तापमान आणि कमीत कमी पर्जन्यमान असते. ज्यामुळे फुकेत, बँकॉक आणि चियांग माई सारख्या भागात प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आणि समुद्रकिना-यावर आराम करण्यासाठी ते अनुकूल ठरते. ही अशी वेळ आहे जेव्हा हवामान आल्हाददायक असते, त्यामुळे तुम्ही मैदानी उपक्रमांचा आनंद घेऊ शकता आणि लॉय क्रथोंग सारख्या सांस्कृतिक उत्सवांत सामील होऊ शकता.

किमान खर्च आणि कमी गर्दी अपेक्षित असणाऱ्या प्रवाश्यांसाठी मार्च ते जून हे महिना हा सर्वोत्तम संधीचा ठरतो. विशेषत: मध्य आणि उत्तर थायलंड अनुकूल आहे. तथापि, उच्च तापमान आणि अवकाळी पावसासाठी देखील सज्ज राहा.

जुलै ते ऑक्टोबर या मान्सूनच्या हंगामात विशेषतः पश्चिम किनाऱ्यावर पावसाचे प्रमाण वाढते. तरीही कोह सामुई सारख्या भागात या काळात हवामान शुष्क स्वरुपाचे असते. सीझनचा विचार न करता थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स महत्त्वाचा असला तरी, उघडीप असलेल्या महिन्यांत भेटीचे नियोजन केल्याने एकूण अनुभव वाढू शकतो आणि संभाव्य हवामानाशी संबंधित व्यत्यय कमी होऊ शकतो.

जपानला भेट देण्यापूर्वी सर्वोत्तम वेळ, हवामान, तापमान आणि इतर घटकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी. जपानला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ याविषयीचा आमचा ब्लॉग नक्की वाचा.

थायलँडसाठी नेहमीच आवश्यक असलेल्या बाबी

1. ट्रॅव्हल इन्श्युरन्स तपशीलासह पासपोर्ट, व्हिसा आणि ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स.

2. वैयक्तिक औषधे आणि प्रवासाच्या आकाराचे प्रथमोपचार किट.

3. कडक उष्णकटिबंधीय उन्हासाठी सनग्लासेस, सन हॅट आणि सनस्क्रीन.

4. फिरण्यासाठी आरामदायक, हवेशीर शूज.

5. समुद्रकिनारे आणि पूलसाठी स्विमवेअर.

6. कॅमेरा आणि चार्जर्स/अडॅप्टर्स सारखे इलेक्ट्रॉनिक्स.

7. हायड्रेटेड राहण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य पाण्याची बॉटल.

थायलँड सुरक्षा आणि सावधगिरीचे उपाय हाती घेणे आवश्यक आहे

थायलँड मार्फत प्रवास करताना घेतल्या जाणाऱ्या काही सुरक्षा आणि सावधगिरीचे उपाय येथे दिले आहेत:

• पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांवरील धोकादायक लाटांसारख्या नैसर्गिक धोक्यांपासून सावध रहा. चेतावणी चिन्हे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.

• डासांपासून बचाव करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट वापरा आणि आवश्यक असल्यास. काही प्रदेशांमध्ये मलेरियाविरोधी औषध घ्या. प्रवासापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

• थायलँड ट्रिपसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवा. ज्यामध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि अनपेक्षित घटना कव्हर केल्या जातात. चिंता-मुक्त ट्रिपची सुनिश्चिती होते.

• घोटाळेबाज आणि पर्यटकांना फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा. एखादी व्यक्ती खूप मैत्रीपूर्ण वर्तन करत असल्यास सावध व्हा, विशेषत: कोणीतरी जो तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सल्ला देतो किंवा एखादी डील ऑफर करतो जी आवश्यकतेपेक्षा अधिक आकर्षक वाटते.

• रस्ता ओलांडताना ट्रॅफिक बाबत दक्ष राहा. थायलंडमधील ट्रॅफिक गोंधळाची असू शकते ; पादचारी क्रॉसिंगचा वापर करा आणि दोन्ही बाजूंनी पाहा.

• बाटलीबंद पाणी प्या आणि रस्त्याच्या कडील अन्नपदार्थ खाणे टाळा. शिजवलेले अन्न खा आणि ती फळे घ्या जी तुम्ही सोलून खाऊ शकता जेणेकरून खाद्य पदार्थांमुळे होणारे आजार टाळता येतील.

• मंदिराच्या भेटीवेळी, तुम्ही स्थानिक नियमांचे पालन करावे. योग्यपद्धतीने ड्रेस परिधान करा, धार्मिक स्थळाला भेटीवेळी तुमची पादत्राणे बाहेर काढण्यास विसरु नका, प्रेमाचे सार्वजनिक प्रदर्शन टाळा.

• थाई राजेशाहीबद्दल अत्यंत आदर बाळगा ; कोणत्याही प्रकारचा अनादर टाळा. कारण थायलंडमध्ये हा एक गंभीर गुन्हा आहे.

• पर्यटन क्षेत्रातील जेट स्की घोटाळ्यांपासून सावध रहा, यासाठी तुमचा भाडे करार काळजीपूर्वक तपासा आणि वापरण्यापूर्वी फोटो घ्या.

• सॉन्गक्रान उत्सवादरम्यान खबरदारी घ्या ; पाण्याच्या लढाईचा हा आनंददायी उत्सव असला तरी मौज करताना अपघात घडू शकतात.

कोविड-19 विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे

• तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी सार्वजनिक क्षेत्रात चेहऱ्यावर मास्क लावा.

• वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा.

• वैयक्तिक स्वच्छता बाळगा.

• थायलंडमध्ये कोविड-19 संबंधित स्थानिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.

• जर तुम्हाला कोविड-19 ची लक्षणे आढळली तर स्थानिक अधिकाऱ्यांना सूचित करा आणि सहकार्य करा.

थायलंडमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाची यादी

हे विमानतळ थायलंड आणि आसपासच्या प्रदेशात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रमुख एंट्री पॉईंट आणि हब म्हणून काम करतात.
येथे लक्षात ठेवण्यासारखे आहेत:

शहर एअरपोर्टचे नाव
बँकॉकडॉन मुआंग इंटरनॅशनल एअरपोर्ट (DMK)
बँकॉकसुवर्णभूमी एअरपोर्ट (बीकेके)
चियांग मेचियांग मे इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएनएक्स)
फुकेतफुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट (एचकेटी)
क्राबीक्राबी इंटरनॅशनल एअरपोर्ट (KBV)
हॅट याईहॅट याई इंटरनॅशनल एअरपोर्ट (HDY)
रेयॉन्ग/पटायायू-तापाओ रेयॉन्ग-पटाया इंटरनॅशनल एअरपोर्ट (UTP)
कोह समुईसमुई इंटरनॅशनल एअरपोर्ट (USM)
ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करा

मनःशांती आणि सुरक्षिततेसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह तुमच्या स्वप्नातील थायलंड सुट्टीला सुरुवात करा.

थायलँड मधील लोकप्रिय डेस्टिनेशन्स

थायलंड मध्ये पर्यटकांसाठी आकर्षण स्थळांची मोठ्या प्रमाणात विपुलता आहे. तुम्ही खालील लोकप्रिय स्थळांबाबत निश्चितपणे जाणून घ्या:

1

फुकेत

थायलंडमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत, जसे की पटॉन्ग आणि काटा, फुकेतचे नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांचक जल उपक्रम तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. आकर्षक फी फी बेटांवर डायव्हिंगचा आनंद घ्या आणि फुकेतच्या ओल्ड टाउनच्या सांस्कृतिक सौंदर्यात हरवून जा. सुविधाजनक ट्रॅव्हल इन्श्युरन्स थायलंड ऑनलाईन मिळवा आणि त्याच्या जोषपूर्ण नाईटलाईफचा आनंद घ्या, ज्यामुळे तुम्हाला मनःशांतीसह या लोकप्रिय गंतव्यस्थानावर सफर करता येईल.

2

बँकॉक

थायलंडची राजधानी, बँकॉक, अनेक सांस्कृतिक वारसा स्थळांनी परिपूर्ण आहे, जसे की वाट फो येथील मागे टेकून पहुडलेल्या बुद्धाची मूर्ती आणि भव्य ग्रँड पॅलेस. चतुचकच्या चैतन्यमय मार्केट्समध्ये खरेदीचा आनंद घ्या आणि चाओ फ्राया रिव्हर क्रूझ राईडचा आनंद घ्या. सुखुमवितचे गजबजलेले नाईटलाईफ तुम्हाला खुणावते. या गतिशील शहरात सफर करण्यासाठी थायलंडसाठीचा सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला मन:शांतीसह तेथील विविधतेचा आनंद घेता येईल.

3

चियांग मे

उत्तरेकडील चियांग माईमध्ये पवित्र दोई सुथेपसह प्राचीन मंदिरे आहेत. इथल्या नाईट बाजारमध्ये स्थानिक कारागिरी पाहायला मिळते आणि सांस्कृतिक गोष्टींमध्ये रममाण होता येते. ऐतिहासिक समृद्धी आणि मनोरंजक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या या सांस्कृतिक केंद्राला भेट देताना भारतातून थायलंडसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे फायदेशीर ठरेल.

4

पटाया

हे समुद्रतटीय रत्न उत्साही नाईटलाईफ आणि किनाऱ्यावरील विविध उपक्रमांनी चमकते. त्याच्या जोमदार वातावरणाच्या पलीकडे प्रसन्न असे सत्याचे अभयारण्य आहे जे एक सांस्कृतिक रत्न आहे. थायलंडची जोमदार बाजू आणि सांस्कृतिक देणगी याच्यात संतुलन साधणाऱ्या एका संपन्न प्रवास अनुभवासाठी थायलंड पास इन्श्युरन्स सुनिश्चित करा.

5

क्राबी

क्राबी हे चुनखडीचे खडक, विलोभनीय दृश्ये आणि रेले सारख्या नेत्रदीपक बीचसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे तुमची भेट संस्मरणीय बनते. रॉक क्लायम्बिंग किंवा आयलँड हॉपिंग सारख्या साहसी उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. येथील सुंदर दृश्ये तुम्हाला तुमच्या थायलंड सहलीसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे किती महत्त्वाचे आहे हे सांगतात, यामुळे तुमचा प्रवास सुलभ होतो आणि तुम्ही नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

6

कोह समुई

कोह समुईमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे, त्याचे स्वच्छ किनारे आणि आलिशान रिसॉर्ट्स स्वर्गाच्या तुलनेचे आहेत. भव्य बुद्ध पुतळ्याला भेट द्या किंवा रोमांचक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्या. थायलंडसाठी योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह तुमची ट्रिप सुरक्षित करा आणि या बेटाच्या सौंदर्याचा आणि उत्साहपूर्ण उपक्रमांचा आनंद घ्या.

थायलँडमध्ये करावयाच्या गोष्टी

थायलंडमध्ये प्रवास करताना, तुम्हाला असंख्य रोमांचक उपक्रम करण्याची संधी मिळते, येथे पोहोचल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

• स्पीड बोट घ्या आणि फांग नगा खाडी मधील चुनखडीचे कार्स्ट पाहा किंवा प्रोमथेप केप सारख्या शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यावर एक नेत्रदीपक सूर्यास्त पहा, यासाठी तुमच्याकडे थायलंडसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स असल्याची खात्री करा.

• वाट अरुणला भेट द्या, जे त्याच्या सुशोभित डिझाईनसाठी आणि त्याच्या शिखरावरून शहराच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. या सांस्कृतिक रत्नात प्रवेश करताना थायलंडसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स सुनिश्चित करा.

• योग्य थायलंड पास इन्श्युरन्स घ्या व एलिफंट नेचर पार्क सारख्या अभयारण्याला भेट देऊन हत्तींच्या मधोमध राहायचा अनुभव घ्या आणि पर्यावरणाबाबत जागरूक राहा.

• विश्रांतीसाठी आणि रोमांचक जल उपक्रमांसाठी, कोरल बेटावर एक दिवस घालवा, आराम करा किंवा स्नॉर्कलिंग करा, त्यामुळे थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे चांगली कल्पना आहे.

• भव्य चुनखडीच्या खडकांवर चढण्याचे आव्हान स्वीकारा आणि थायलंडसाठी ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह तुमचा प्रवास सुरक्षित करा.

• बँकॉक किंवा चियांग माई मधील क्लासेसमध्ये जाऊन पारंपारिक थाई पाककोशल्य शिका जे तुम्हाला पारंपारिक पद्धतीने स्थानिक पदार्थ कसे बनवायचे हे शिकवतात, म्हणून तुमच्याकडे भारतातून थायलंडसाठी योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे.

• कायाकिंग, स्नॉर्केलिंग किंवा हायकिंगद्वारे या बेटांच्या हिरवाईचा आणि आकर्षक दृश्यांचा आनंद घ्या, यासाठी तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे.

• एप्रिलमध्ये थायलंडच्या नवीन वर्षाच्या उत्सवामध्ये सामील व्हा आणि देशभरात आयोजित वॉटर फेस्टिव्हल म्हणजे पाण्यातील लढायांचा उत्सव साजरा करा. तुमच्याकडे थायलंड पास इन्श्युरन्स असेल तेव्हा तुम्ही या उत्साही उत्सवांचा आनंद घेऊ शकता.

• कोह ताओमध्ये डायव्हिंग किंवा स्नॉर्केलिंगला जा आणि जलचर जगामध्ये हरवून जा, थायलंडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स काढल्याने तुम्हाला या रोमांचक उपक्रमांदरम्यान केवळ कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज मिळत नाही तर तुमची संपूर्ण ट्रिप सुरक्षित देखील होते.

• या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला एक प्राचीन शहर म्हणून भेट द्या ज्यात भव्य मंदिरांचे भग्नावशेष आणि ऐतिहासिक अवशेष समाविष्ट आहेत, म्हणून प्रथम थायलंडसाठी विश्वसनीय ट्रॅव्हल इन्श्युरन्स असल्याची खात्री करा.

पैसे वाचवण्याच्या टिप्स

थायलंड सारख्या देशात प्रवास करताना, पैसे वाचवण्यासाठी काही टिप्स आणि धोरणांचे काळजीपूर्वक पालन करणे महत्वाचे आहे, जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्ही तुमचे पैसे योग्य प्रकारे खर्च करू शकाल. येथे काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत:

• थायलंडमधील अनेक मंदिरांनी निश्चित प्रवेश शुल्काच्या ऐवजी देणग्यांची शिफारस केली आहे. तुमच्या साधनांमध्ये योगदान देताना ही पूजा ठिकाणे पाहा.

• शहरात प्रवास करण्यासाठी सॉन्गथ्यू किंवा ओपन-एअर ट्रकमध्ये शेअरिंग करणे निवडा. ते केवळ किफायतशीर नसून स्थानिक अनुभव देखील देतात, विशेषत: कमी अंतरासाठी.

• करन्सी एक्स्चेंज फी टाळण्यासाठी ट्रान्झॅक्शन साठी थाई बाहत वापरा. अनेक विक्रेते कॅश पेमेंटला प्राधान्य देतात. त्यामुळे स्थानिक करन्सी सोबत असल्याने कधीकधी चांगल्या डील्स मिळू शकतात.

• सार्वजनिक ठिकाणी अधूनमधून होणारे स्ट्रीट परफॉर्मन्स किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून मोफत मनोरंजनाचा आनंद घ्या. खर्च न करता थाई संस्कृती सोबत अनुरुप होण्याचा हा निश्चितच सर्वोत्तम मार्ग आहे.

• ग्रामीण भागात समुदाय-आधारित निवासस्थान किंवा होमस्टेमध्ये राहण्याचा विचार करा. हे केवळ स्थानिक व्यक्तींना पाठबळ देत नाही. तर माफक दरांत अद्वितीय सांस्कृतिक अनुभव देखील प्रदान करतात.

• अद्याप लोकप्रिय नसलेली प्रवासाची ठिकाणे किंवा अनोखे मार्ग शोधा, हे केवळ तुम्हाला अभूतपूर्व अनुभव देणार नाहीत, तर पर्यटकांच्या कमी संख्येमुळे त्यांना जास्त किंमतही लागणार नाही. इतकेच काय, तुम्हाला कमी किमतीत सर्व्हिस आणि निवास मिळेल.

• थायलंडमध्ये अनेकदा आयोजित केलेल्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये किंवा उत्सवांमध्ये सहभागी व्हा. यापैकी बहुतांश उत्सवात प्रवेश मोफत आहे आणि त्यामधून देशाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडते.

• अर्ली-बर्ड डिस्काउंट किंवा प्रमोशनचा लाभ घेण्यासाठी उपक्रम, विमाने किंवा निवास आधीच बुक करा. अनपेक्षित खर्च कव्हर करण्यासाठी थायलंडसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स सुनिश्चित करताना सर्वोत्तम डील्स मिळविण्यासाठी ऑनलाईन किंमतीची तुलना करा.

• थायलंड पाससह आकर्षणांसाठी सवलतीच्या प्रवेश शुल्काचा आनंद घ्या किंवा पार्टनर संस्थांमध्ये विशेष ऑफर मिळवा.

• मंदिरे, उद्याने आणि सांस्कृतिक स्थळे यासारख्या विनामूल्य आकर्षणांचा आनंद घ्या. हायकिंग सारख्या विनामूल्य उपक्रमांमध्ये भाग घ्या किंवा अनोख्या अनुभवासाठी स्थानिक मार्केटला भेट द्या.

• बँकॉकच्या चतुचक मार्केट किंवा चियांग माईच्या नाईट बझारमध्ये तुम्ही किती चांगल्या वाटाघाटी करू शकता ते दाखवा. स्मृतीचिन्हे, कपडे आणि स्थानिक शिल्पांसाठी किंमतीच्या वाटाघाटी करा.

• स्थानिक वाहतूक साधन निवडा, जसे की टुकटुक, सॉन्गथ्यू (शेअर टॅक्सी) किंवा खाजगी टॅक्सीऐवजी सार्वजनिक बस वापरा, जेणेकरून तुमचा प्रवास किफायतशीर होईल. तसेच, तुम्ही त्या घेण्यापूर्वी किमतीच्या वाटाघाटी करा.

थायलँड मधील प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटची यादी

थायलंडमधील प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटची यादी येथे आहे. थायलंडमध्ये अचानक काही देशी खाद्यपदार्थ खावेसे वाटतील तेव्हा तुम्ही यातून निवडू शकता:

• तंदूर - पट्टाया
ॲड्रेस: 219/54 पट्टाया बीच रोड, पट्टाया
शिफारशित डिश: तंदूरी चिकन

• रंग महल - बँकॉक
ॲड्रेस: रेम्ब्रँड हॉटेल, 19 सुखुमवित सोई 18, बँकॉक
शिफारशित डिश: बटर चिकन

• इंडस रेस्टॉरंट - बँकॉक
ॲड्रेस: 43 71 सुखुमवित सोई 26, बँकॉक
शिफारशित डिश: चिकन टिक्का मसाला

• माया रेस्टॉरंट आणि बार - फुकेत
ॲड्रेस: 47 G-48 G, बोट ॲव्हेन्यू, चेरंगताले, थालंग, फुकेत
शिफारशित डिश: लँब रोगन जोश

• गग्गन - बँकॉक
ॲड्रेस: 68/1 सोई लँगसुआन, फ्लोएन चिट रोड, लुम्पिनी, बँकॉक
शिफारशित डिश: नाविन्यपूर्ण भारतीय खाद्यपदार्थ (स्वादिष्ट मेन्यू)

• स्पाईस मार्केट - चियांग मे
ॲड्रेस: फोर सीझन्स रिसॉर्ट, 502 मू 1, माई रिम-सामोएंग ओल्ड रोड, चियांग मे
शिफारशित डिश: बिर्याणी

• डोसा किंग - बँकॉक
ॲड्रेस: 1533 नवीन फेचबुरी रोड, मक्कासन, रत्चाथेवी, बँकॉक
शिफारशित डिश: मसाला डोसा

• दिल्ली दरबार - बँकॉक
ॲड्रेस: सुखुमवित सोई 22, बँकॉक
शिफारशित डिश: पनीर टिक्का आणि गार्लिक नान

• इंडियन हट - फुकेत
ॲड्रेस: 38/41-44 मू 4, व्हिसेट रोड, रवाई, फुकेत
शिफारशित डिश: चिकन बिर्याणी

• सर्वान्न भवन - बँकॉक
ॲड्रेस: 21/62 चायाप्रक रोड, बँकॉक
शिफारशित डिश: मसाला डोसा आणि फिल्टर कॉफी

थायलंडमधील स्थानिक कायदा आणि शिष्टाचार

थायलंडला प्रवास करताना तुम्ही खालील स्थानिक कायदे आणि शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे, जेणेकरून थायलंडमध्ये प्रवास करताना तुम्हाला आदरयुक्त आणि चिंतामुक्त अनुभव मिळेल. याव्यतिरिक्त, थायलंडसाठी योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्स असल्याने तुम्हाला अनपेक्षित घटनांपासून पुरेसे कव्हरेज मिळते आणि तुम्हाला स्थानिक नियमनांचे पालन करण्यातही मदत होते. येथे काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत:

• मंदिरे किंवा धार्मिक स्थळांच्या भेटीवेळी योग्य पद्धतीने ड्रेस परिधान करा. पारदर्शक कपडे परिधान करणे टाळा ; स्थानिक आचार नियम आणि धार्मिक भावनांचा आदर म्हणून पूर्ण शरीरभर कपडे परिधान करा.

• थाई राजेशाहीबद्दल कोणत्याही प्रकारचा अनादर टाळा. राजघराण्याबद्दल टीका किंवा अपमानास्पद टिप्पणी बेकायदेशीर आहे आणि कारावासासह गंभीर परिणाम होऊ शकतात.

• अनेक घरे, मंदिरे किंवा काही दुकानांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट बाहेर ठेवण्याची प्रथा आहे. इतर असे करत आहेत का ते पहा आणि सभ्यता आणि सांस्कृतिक जागरूकता प्रदर्शित करण्यासाठी त्याचे अनुसरण करा.

• बुद्ध प्रतिमा आणि कलाकृतींप्रती आदरभाव व्यक्त करा. त्यांना स्पर्श करणे किंवा त्यांच्या जवळ अयोग्य पोज देणे टाळा. कारण हे अनादर मानले जाते.

• पारंपारिक थाई अभिवादनाला "वाई" असे म्हणतात, यासाठी तुमचे दोन्ही हात जोडा, जसे तुम्ही प्रार्थनेसाठी जोडता आणि किंचित वाका. आदर दर्शविण्यासाठी ही मुद्रा स्वीकारा, विशेषत: जेव्हा तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तींना भेटत असाल किंवा औपचारिक व्यवहार करत असाल.

• तावीज किंवा जंतर यासारख्या पवित्र वस्तूंबाबत सावधगिरी बाळगा ; जोपर्यंत तुम्हाला असे करण्यास आमंत्रित केले जात नाही तोपर्यंत त्यांना स्पर्श करणे किंवा त्यावर टिप्पणी करणे टाळा.

• स्नेहाचे सार्वजनिक प्रदर्शन टाळा, विशेषतः पुराणमतवादी भागात. काही पर्यटन स्थळांमध्ये हे मान्य असले तरी, स्थानिक लोकांना त्रास होऊ शकतो म्हणून स्वत:वर संयम ठेवणे चांगले.

• ड्रग्ज संबंधित थायलंडचे कायदे अतिशय कडक आहेत. ड्रग्ज बाळगणे किंवा तस्करी केल्याबद्दल दोषी आढळलेल्यांना दीर्घ तुरुंगवास किंवा मृत्युदंडासह कठोर शिक्षा होऊ शकते.

थायलंड मधील भारतीय दूतावास

थायलंडच्या प्रवासादरम्यान, तुम्हाला थायलंडमधील हे भारतीय दूतावास लक्षात ठेवले पाहिजेत:

थायलँड-स्थित भारतीय दूतावास कामकाजाचे तास ॲड्रेस
भारतीय वाणिज्य दूतावास, चियांग माईसोम-शुक्र: 9 AM - 5 PM33/1, थुंग हॉटेल रोड, वॉट केट, चियांग मे
भारतीय वाणिज्य दूतावास, फुकेतसोम-शुक्र: 9 AM - 5 PM25/25, म्युएंग मे रोड, T. तलाद्याई, फुकेत टाउन
भारतीय दूतावास, बँकॉकसोम-शुक्र: 9 AM - 5:30 PM46 सोई प्रसरणमित्र, सुखुमवित सोई 23, बँकॉक

सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या देशांसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

खालील पर्यायांमधून तुमची निवड करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या परदेशी ट्रिपसाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकता

इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स फ्लाईट विलंब, हरवलेले सामान किंवा प्रवासाशी संबंधित गैरसोयींमुळे होणारे त्रास लक्षणीयरीत्या कमी करतो.

वाचा नवीनतम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ब्लॉग्स

स्लायडर-राईट
डेनपासर मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे: परिपूर्ण गाईड

डेनपासर मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे: परिपूर्ण गाईड

अधिक वाचा
18 डिसेंबर, 2024 रोजी प्रकाशित
फिनलँड मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे: परिपूर्ण गाईड

फिनलँड मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे: परिपूर्ण गाईड

अधिक वाचा
18 डिसेंबर, 2024 रोजी प्रकाशित
कुटा मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे: परिपूर्ण गाईड

कुटा मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे: परिपूर्ण गाईड

अधिक वाचा
18 डिसेंबर, 2024 रोजी प्रकाशित
इस्तांबुल मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे

इस्तांबुल मध्ये भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे

अधिक वाचा
26 नोव्हेंबर, 2024 रोजी प्रकाशित
माल्टा व्हिसा मुलाखत प्रश्न

अत्यावश्यक माल्टा व्हिसा मुलाखत प्रश्न आणि टिप्स

अधिक वाचा
26 नोव्हेंबर, 2024 रोजी प्रकाशित
स्लायडर-लेफ्ट

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

थायलँडसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची शिफारस केली जाते. हे तुमच्या प्रवासामध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, ट्रिप रद्दीकरण आणि अनपेक्षित घटनांसाठी कव्हरेज प्रदान करते. तुमची ट्रिप पुरेशी कव्हर करण्यासाठी भारतातील थायलंडसाठी सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स सुनिश्चित करा.

विविध इन्श्युरन्स प्रदाता थायलंडच्या विशिष्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी ऑनलाईन खरेदी पर्याय ऑफर करतात. त्यांच्या वेबसाईटला भेट द्या, प्लॅन्सची तुलना करा आणि तुमच्या प्रवासाच्या गरजांसाठी सर्वोत्तम असेल ते निवडा.

आवश्यक वस्तूंमध्ये उष्णकटिबंधीय हवामानासाठी पातळ कपडे, सनस्क्रीन, कीटकांपासून बचाव करणारे रिपेलेंट, आरामदायी पादत्राणे आणि मंदिरात जाण्याकरिता योग्य पोशाख यांचा समावेश होतो. आवश्यक औषधे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ट्रॅव्हल अडॅप्टर देखील पॅक करा.

थाई बात (टीएचबी) हे स्थानिक चलन आहे. स्थानिक व्यवहारांसाठी थाई बात घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु पर्यटन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जातात.

कालावधी हा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमावर अवलंबून आहे. अनेक प्रवासी 7-10 दिवस खर्च करतात. ज्यामध्ये बँकॉक, चियांग मे आणि फुकेत सारख्या लोकप्रिय डेस्टिनेशनची भ्रमंती करतात. सर्वसमावेशक अनुभवासाठी, 2-3 आठवड्यांत अधिकाधिक ठिकाणे तुम्ही कव्हर करू शकतात.

थायलंड सर्वसाधारणपणे पर्यंटकांसाठी अत्यंत सुरक्षित आहे. तथापि, गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. फसवणुकीपासून दक्ष राहा आणि स्थानिक नियम आणि आचारनियमांचे पालन करा.

थाई खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आहे. पॅड थाई, टॉम युम गुंग, ग्रीन करी आणि मँगो स्टिकी राईस यांचा निश्चितच आस्वाद घ्या. अस्सल पाककलेचा अनुभव घेण्यासाठी स्ट्रीट फूडचा निश्चितच आस्वाद घ्या.

अवॉर्ड्स आणि मान्यता

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

iAAA रेटिंग

ISO सर्टिफिकेशन

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

स्लायडर-राईट
स्लायडर-लेफ्ट
सर्व अवॉर्ड्स पाहा
एचडीएफसी एर्गोकडून ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन खरेदी करा

वाचन पूर्ण झाले? ट्रॅव्हल प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?