होम / होम इन्श्युरन्स / स्टँडर्ड फायर आणि स्पेशल पेरिल्स
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

हाऊस इन्श्युरन्स फायर आणि स्पेशल पेरिल्स प्लॅन

तुमची प्रॉपर्टी ही तुमची सर्वात मौल्यवान इन्व्हेस्टमेंटपैकी एक आहे आणि आग, वादळ आणि इतर धोक्यांसारख्या अनपेक्षित घटनांपासून त्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. आग आणि नैसर्गिक आपत्ती या पूर्व-सूचनेशिवाय येतात. तुमची संपत्ती आणि मौल्यवान वस्तूंची अतोनात हानी त्यामुळे होते. स्टँडर्ड फायर आणि पेरिल्स इन्श्युरन्स अशा अनपेक्षित घटनांपासून आवश्यक संरक्षण प्रदान करते. आग, वीज पडणे, स्फोट आणि इतर धोक्यांपासून होणारे नुकसान कव्हर करते. या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीसह, तुम्ही तुमचे घर किंवा बिझनेस परिसर सुरक्षित करू शकता, अनपेक्षित आपत्तींच्या बाबतीत तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात याची खात्री करू शकता.

तुमचे घर हे तुमचे सुरक्षा कवच आहे! त्यास का संरक्षित करू नये?

एक इन्श्युरन्स; मोठे डिस्काउंट
एक इन्श्युरन्स, मोठे डिस्काउंट
एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि पूर्णपणे कस्टमाईज करण्यायोग्य इन्श्युरन्स प्लॅन मिळवण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते? ते देखील 50% डिस्काउंटवर! आता मोठी बचत करताना योग्य होम इन्श्युरन्स प्लॅनसह तुमचे ॲसेट्स सुरक्षित करा.
मोठी प्रॉपर्टी जास्त कव्हरेज
मोठी प्रॉपर्टी जास्त कव्हरेज
तुमच्या आवश्यकतांच्या साईझनुसार, तुम्हाला पुरेशी वाटत असलेली कव्हरेज रक्कम निवडण्याची तुम्हाला सुविधा मिळते. 1 लाख ते 3 कोटी दरम्यान कोणतीही योग्य संख्या निवडा आणि तुमचे घर धोक्यांपासून सुरक्षित ठेवा.
15 वर्षांपर्यंत संरक्षित राहा
15 वर्षांपर्यंत संरक्षित राहा
तुमच्या आनंदी ठिकाणाला विशेष संरक्षणाची आवश्यकता असते. एचडीएफसी एर्गो होम इन्श्युरन्स प्लॅनसह तुमचे घर सुरक्षित करा. 15 वर्षांपर्यंत टिकणाऱ्या एकाच इन्श्युरन्ससह मनःशांती मिळवा.
अधिक जबाबदाऱ्या, कव्हरेज देखील वाढवतात
अधिक जबाबदाऱ्या, कव्हरेज देखील वाढवतात
वाढत्या हाऊसिंग सोसायटीच्या सुरक्षा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आमचा इन्श्युरन्स प्लॅन सहजपणे वाढविला जाऊ शकतो. तुम्ही आता प्रत्येक वर्षाच्या शेवटी सम इन्श्युअर्ड 10% ने वाढवू शकता.

यात काय समाविष्ट आहे?

आग
आग

जसे आग तुमच्या भावनेला क्षति पोहोचवू शकत नाही, त्याचप्रमाणे आम्ही खात्री करू की आग तुमच्या सामानाचे नुकसान करणार नाही. आम्ही त्यास कव्हर करू.

नैसर्गिक आपत्ती
नैसर्गिक आपत्ती

तुम्ही नैसर्गिक आपत्तींचे भाकीत करू शकत नाही; परंतु तुम्ही भूकंप, पूर, वादळ, हरिकेन इत्यादींपासून तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करू शकता.

मानवी संकट
मानवी संकट

अडचणीचा काळ तुमच्या घरावर तसेच तुमच्या मनःशांतीवर परिणाम करू शकतो. संप, दंगा, दहशतवाद आणि दुर्भावनापूर्ण कृतीपासून त्याला सुरक्षित ठेवा.

अपघाती नुकसान
अपघाती नुकसान

जर पाण्याच्या टँक फुटणे किंवा ऑटोमॅटिक स्प्रिंकलर इंस्टॉलेशन मधून गळतीमुळे तुमच्या बिल्डिंगला कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही त्यासाठी भरपाई देण्याची खात्री करू.

यात काय समाविष्ट नाही?

लाँग टर्म प्लॅन्स
लाँग टर्म प्लॅन्स

आम्ही को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी लाँग टर्म प्लॅन्स ऑफर करत नाही.

परिणामी नुकसान
परिणामी नुकसान

परिणामी नुकसान हे असे नुकसान असतात जे सामान्य गोष्टींच्या उल्लंघनाचे नैसर्गिक परिणाम नसतात, असे नुकसान कव्हर केले जात नाहीत

जमिनीची किंमत
जमिनीची किंमत

आम्हाला समजते की तुमच्या जमिनीचे मूल्य आहे, तथापि आमची पॉलिसी जमिनीच्या किमतीसाठी देय करत नाही.

निर्माणाधीन प्रॉपर्टी
निर्माणाधीन प्रॉपर्टी

आम्ही तुमच्या घराला कव्हर करतो जिथे तुम्ही राहता, कोणतीही प्रॉपर्टी जी ताब्यात नाही किंवा बांधकाम होत आहे ती कव्हर केली जात नाही.

जाणीवपूर्वक गैरवर्तन
जाणीवपूर्वक गैरवर्तन

आम्ही सुनिश्चित करतो की तुमचे अनपेक्षित नुकसान कव्हर केले जाते, तथापि जर तुमच्या प्रॉपर्टीचे जाणीवपूर्वक नुकसान केले असेल तर ते पॉलिसीच्या कव्हरेज व्याप्तीमधून पूर्णपणे बाहेर राहते.

नुकसान
नुकसान

आम्ही समजतो की तुमची प्रॉपर्टी हळूहळू जुनी होत जाते आणि त्याला तडे जातात किंवा दुरुस्तीची आवश्यकता असते, तथापि इन्श्युरन्स कव्हर बिल्डिंगच्या मेंटेनन्ससाठी कव्हरेज ऑफर करणार नाही.

अवॉर्ड्स
एचडीएफसी एर्गोच का?

1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करण्याद्वारे अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
अवॉर्ड्स
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
अवॉर्ड्स

1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
अवॉर्ड्स

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
अवॉर्ड्स

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 20 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स आणि ॲड-ऑन कव्हर्स प्रदान करून अविरतपणे कस्टमरच्या गरजांची पूर्तता करीत आहोत.
अवॉर्ड्स

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
अवॉर्ड्स

अवॉर्ड्स

एचडीएफसी एर्गोने फिक्की इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये "क्लेम्स अँड कस्टमर सर्व्हिस एक्सलन्स" कॅटेगरी अंतर्गत अवॉर्ड वर नाव कोरले आहे.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

भारत गृह रक्षा इन्श्युरन्स पॉलिसी रेसिडेन्शियल प्रॉपर्टीची संरचना आणि त्यातील कंटेंटला कव्हरेज प्रदान करते. कंटेंट मध्ये ही आग, भूकंप, वादळ, पूर आणि इतर नामांकित धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसान/हानी पासून घरातील वस्तू किंवा गोष्टी कव्हर करेल.
हे कव्हर इन्श्युअर्डच्या घराच्या संरचनेसाठी आहे. गॅरेज, व्हरांडा, निवासासाठी वापरले जाणारे घरगुती आऊटहाऊस, कम्पाउंडच्या भिंती, राखीव भिंती, पार्किंगची जागा, सोलर पॅनेल्स, पाण्याच्या टँक किंवा निवास, कायमस्वरुपी फिक्स्चर्स आणि फिटिंग्स आणि अंतर्गत रस्ते यासारख्या अतिरिक्त संरचना देखील कव्हर केल्या जाऊ शकतात. लक्षात घ्या की कच्चे बांधकाम / निर्माणाधीन प्रॉपर्टी या पॉलिसीच्या व्याप्ती बाहेर आहे.
सामान्यपणे कोणत्याही घरातील कंटेंट म्हणजेच, फर्निचर आणि फिटिंग्स, टेलिव्हिजन सेट्स, टेलिफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अँटेना, वॉटर स्टोरेज उपकरण, एअर कंडिशनर्स, किचन उपकरण आणि इतर घरगुती वस्तूंना कंटेंट कव्हर अंतर्गत कव्हर केले जाऊ शकते.
मौल्यवान कंटेंट म्हणजे ज्वेलरी, चांदीचे भांडे, पेंटिंग्स, कलाकृती, मौल्यवान कार्पेट्स, प्राचीन वस्तू, दुर्मिळ वस्तू, पेंटिंग्स. शुद्ध सोने किंवा अनसेट मौल्यवान खडे, हस्तलिखिते, वाहने, स्फोटक पदार्थ यासारखे काही कंटेंट पॉलिसी अंतर्गत वगळले आहेत.
कोणताही घरमालक किंवा भाडेकरू भारत गृह रक्षा पॉलिसी खरेदी करण्यास पात्र आहे. कृपया लक्षात घ्या की कोणत्याही BGR पॉलिसीसाठी इन्श्युअर्डने एकतर घराची संरचना किंवा घरातील कंटेंट किंवा दोन्हीही निवडणे आवश्यक आहे.
BGR एक वर्ष किंवा एकापेक्षा जास्त वर्षासाठी जारी केले जाऊ शकते मात्र वैयक्तिक घरमालकांच्या बाबतीत 10 वर्षांपेक्षा जास्त नाही. को-ऑपरेटिव्ह सोसायटी किंवा गैर-वैयक्तिकच्या नावावरील घरांसाठी पॉलिसीचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही.
होय, भारत गृह रक्षा पॉलिसी खालील खर्चांसाठीही देय करते:
• आर्किटेक्ट, सर्वेक्षक, कन्सल्टिंग इंजिनीअरच्या वाजवी शुल्कासाठी क्लेम रकमेच्या 5% पर्यंत;
• साईटवरून मलबा काढण्याच्या वाजवी खर्चासाठी क्लेमच्या रकमेच्या 2% पर्यंत.
• BGR पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्डला भाड्याचे नुकसान आणि पर्यायी निवासासाठी भाडे यासाठी देखील कव्हरेज मिळते जर इन्श्युअर्ड इव्हेंट मधून उद्भवणाऱ्या भौतिक नुकसानीमुळे घराची बिल्डिंग राहण्यासाठी योग्य नसेल.
• कोणत्याही इन्श्युअर्ड इव्हेंटमुळे आणि घटनेपासून जवळपास 7 दिवसांच्या आत चोरी.
भारत गृह रक्षा केवळ घराची बिल्डिंग आणि/किंवा घरातील कंटेंटसाठीच इन्श्युरन्स कव्हर प्रदान करत नाही, तर ते मान्य मूल्य आधारावर मौल्यवान कंटेंटला देखील कव्हर प्रदान करू शकते. समाविष्ट करता येणारे इतर ॲड-ऑन्स खालीलप्रमाणे आहेत:
• अतिरिक्त प्रीमियम मध्ये स्वतःसाठी आणि पती/पत्नीसाठी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर. पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स कव्हर इन्श्युअर्ड धोक्यामुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूपासून इन्श्युअर्ड सदस्यांना संपूर्ण फायनान्शियल संरक्षण प्रदान करते.
• हार्डशिप अलाउन्स - अन्न, औषधे, कपडे आणि बालकांच्या आवश्यक वस्तूंच्या आपत्कालीन खरेदीसाठी इन्श्युअर्डला झालेला खर्च
• घरगुती कर्मचाऱ्यांचे ॲक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन - इन्श्युअर्ड व्यक्तीद्वारे इन्श्युअर्ड परिसरात नियुक्त केलेल्या घरगुती कर्मचाऱ्यांच्या ॲक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशनला कव्हर केले जाते, जर हे हॉस्पिटलायझेशन ड्युटीवर उपस्थित असताना कोणत्याही इन्श्युअर्ड धोक्यामुळे झाले असेल.
पॉलिसी कालावधीदरम्यान होणाऱ्या खालील अनपेक्षित घटनांद्वारे इन्श्युअर्ड प्रॉपर्टीला होणारे भौतिक नुकसान किंवा हानी किंवा नाश या पॉलिसीमध्ये कव्हर केले जाते.
• आग
• स्फोट किंवा विस्फोट
• वीज पडणे
• भूकंप, ज्वालामुखी उद्रेक किंवा इतर जसे की निसर्गाचे आघात
• वादळ, चक्रीवादळ, टायफून, टेम्पेस्ट, हरिकेन, टोर्नेडो, त्सुनामी, पूर आणि जलप्रलय
• तुमची घराची बिल्डिंग ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन खचणे, भूस्खलन, दरड कोसळणे इ.
• वणवा, वनातील आग, जंगलातील आग
• दंगा, संप, दुर्भावनापूर्ण नुकसान
• ऑटोमॅटिक स्प्रिंकलर इंस्टॉलेशन मधून गळती
• दहशतवाद
पॉलिसी खाली नमूद केलेल्या इव्हेंटच्या परिणामी किंवा कारणास्तव किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणाऱ्या इन्श्युअर्ड प्रॉपर्टीचे कोणतेही नुकसान किंवा हानी किंवा नाश यासाठी होणारे नुकसान आणि खर्च कव्हर करत नाही:
• उद्देशपूर्वक, जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर कृती किंवा चुकी, किंवा इन्श्युअर्डच्या वतीने कोणीही किंवा इन्श्युअर्डच्या संगनमताने.
• युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूची कृती, शत्रुत्व किंवा युद्धासारख्या कारवाया इ.
• कोणत्याही आण्विक इंधनातून किंवा न्यूक्लिअर इंधनाच्या ज्वलनापासून किंवा रेडिओॲक्टिव्ह, विषारी, स्फोटक इत्यादी मधून असलेल्या कोणत्याही आण्विक कचऱ्यापासून रेडिओ ॲक्टिव्हिटी द्वारे आयोनायझिंग रेडिएशन किंवा दूषितीकरण.
• कोणत्याही इन्श्युअर्ड प्रॉपर्टीचे नुकसान जी हरवली आहे किंवा गहाळ झालेली आहे किंवा गायब झाली आहे जी कोणत्याही एकाच ओळखण्यायोग्य इव्हेंटसह लिंक केली जाऊ शकत नाही.
• कमाईचे नुकसान, विलंबामुळे नुकसान, मार्केट संबंधी नुकसान किंवा कोणत्याही प्रकारचे इतर परिणामी किंवा अप्रत्यक्ष नुकसान किंवा हानी किंवा अन्य नुकसान.
• कोणताही क्लेम तयार करण्यासाठी किंमत, फी किंवा खर्च..
होम बिल्डिंग कव्हर आणि होम कंटेंट कव्हरसाठी प्रीमियम हे सम इन्श्युअर्ड रक्कम आणि तुमच्या घराच्या बिल्डिंग आणि घरातील कंटेंटच्या रिस्क प्रोफाईलला परिभाषित करणाऱ्या इतर विविध घटकांवर अवलंबून असते.
तुम्हाला काही जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत.
तुम्ही करणे आवश्यक आहे:
• जेव्हा तुम्ही प्रपोजल सादर करता तेव्हा तुमच्याबद्दल आणि तुमच्या घराबद्दल आणि तुमच्या घरातील वस्तू किंवा गोष्टींविषयी सर्व आणि खरी माहिती सांगा,
• तुमच्या घराची बिल्डिंग आणि घरातील कंटेंटची चोरी, नुकसान किंवा हानी टाळण्यासाठी काळजी घ्या आणि - अनधिकृत व्यक्ती तुमच्या घराच्या बिल्डिंगचा ताबा घेणार नाही याची खात्री करा,
• क्लेमला सपोर्ट करणाऱ्या तुमच्या क्लेम आणि डॉक्युमेंटमध्ये खरे आणि पूर्ण प्रकटीकरण करा,
• तुम्ही कराल त्या क्लेमची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य द्या,
• जेव्हा तुम्हाला नुकसान होईल तेव्हा क्लेम करा आणि क्लेम प्रक्रियेचे पालन करा,
• यामधील बदलाविषयी आम्हाला सूचित करा
- तुमचा ॲड्रेस,
- तुमच्या घरगुती बिल्डिंगच्या संरचनेमध्ये कोणतेही समावेश, बदल, विस्तार,
- तुमच्या घराच्या बिल्डिंगचा वापर, (जर तुम्ही तुमच्या घराची बिल्डिंग भाड्याने दिली असेल तर आम्हाला सूचित करा,
- तुमच्या घराच्या बिल्डिंग मध्ये आता केवळ पूर्णपणे तुम्ही राहत नाही.
क्लेमची रक्कम प्राप्त करण्यापूर्वी तुमचा मृत्यू झाल्यास, एचडीएफसी एर्गो तुमच्या नॉमिनी/कायदेशीर प्रतिनिधींना देय करेल. कृपया तुमच्या नॉमिनीला आमच्याकडे रजिस्टर करा जेणेकरून क्लेम जलदपणे सेटल केला जाईल.
तुमचे घर हे पुनर्निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेसाठी कव्हर केले जाते, जे पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेला तुमच्या घराच्या बिल्डिंगच्या बांधकामाच्या प्रचलित खर्चाच्या दराने मोजले जाते. हे बिल्डिंगसाठी सम इन्श्युअर्ड आहे. तुमच्या घरातील वस्तू किंवा गोष्टी त्यांना बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेसाठी कव्हर केल्या जातात. जर तुमचे घर किंवा तुमच्या घरातील वस्तू किंवा गोष्टी नुकसानग्रस्त झाल्यास एचडीएफसी एर्गो तुम्ही दुरुस्तीवर खर्च केलेली रक्कम देय करतात. जर तुमचे घर किंवा वस्तू किंवा गोष्टी हरवल्या किंवा पूर्णपणे नष्ट झाल्यास एचडीएफसी एर्गो त्या वस्तूसाठी सम इन्श्युअर्ड देय करतात.
तुम्ही परवानगीनुसार या पॉलिसीच्या कव्हरमध्ये बदल करणे निवडू शकता. तुम्ही कोणत्याही बदलासाठी प्रपोजल किंवा विनंती करणे आवश्यक आहे. हे केवळ एचडीएफसी एर्गोने तुमचे प्रपोजल स्वीकारल्यानंतर आणि तुम्ही लागू असेल तेथे अतिरिक्त प्रीमियम भरल्यानंतरच लागू होईल.
तुम्ही पॉलिसी कालावधी दरम्यान कोणत्याही वेळी ही पॉलिसी कॅन्सल करू शकता. एचडीएफसी एर्गो BGR पॉलिसी मजकूर अंतर्गत नमूद केलेल्या कॅन्सलेशन मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रीमियमचा भाग परत करेल. जर दिलेल्या पॉलिसीसाठी क्लेम यापूर्वीच भरला गेला असेल तर दिलेल्या पॉलिसीसाठी कोणताही रिफंड दिला जाणार नाही.
तुम्ही कंपनीच्या कोणत्याही एजंटशी किंवा मध्यस्थ किंवा इतर मंजूर वितरण चॅनेलशी संपर्क साधू शकता. आमच्या वेबसाईटद्वारे कोणीही प्रॉडक्टविषयी सर्व माहिती घेऊ शकतात तसेच प्रॉडक्ट खरेदी करू शकता. तुम्ही आमच्या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकता किंवा प्रॉडक्टशी संबंधित माहिती किंवा पॉलिसी खरेदीसाठी तुमच्या नजीकच्या आमच्या ऑफिसशी संपर्क साधू शकता.
पॉलिसी कालावधीच्या शेवटी ही पॉलिसी कालबाह्य होईल. जर तुम्हाला पॉलिसी रिन्यू करायची असेल तर तुम्हाला पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी रिन्यूवलसाठी अप्लाय करावे लागेल आणि आवश्यक प्रीमियम रक्कम भरावी लागेल. या पॉलिसीचे रिन्यूवल ऑटोमेटिक नाही, एचडीएफसी एर्गो रिन्यूवलच्या उद्देशाने तुमच्याकडून संबंधित माहिती घेऊ शकते.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x