FAQs

कार इन्श्युरन्स ही एक प्रकारची इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी फायनान्शियल हानी होऊ शकते अशा कोणत्याही नुकसानापासून तुमच्या वाहनाला संरक्षण प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, तुमच्या वाहनाच्या वापरामुळे उद्भवलेली कोणतीही थर्ड पार्टी लायबिलिटी कार इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केली जाते. मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार, लायबिलिटी ओन्ली पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती रस्त्यावर वाहन वापरू शकत नाही.
कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या वाहनाला कोणतेही नुकसान, आग, चोरी, भूकंप इत्यादींमुळे होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण प्रदान करते. याव्यतिरिक्त, मृत्यू, शारीरिक दुखापत आणि थर्ड पार्टी प्रॉपर्टी नुकसानीच्या बाबतीत कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी हे कव्हर प्रदान करते.
कायद्यानुसार, केवळ थर्ड पार्टी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी आवश्यक आहे, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती रस्त्यावर वाहन वापरू शकत नाही. तथापि, थर्ड पार्टी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी अंतर्गत, आग, चोरी, भूकंप, दहशतवाद इत्यादींमुळे तुमच्या वाहनाला झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही आणि त्यामुळे मोठे फायनान्शियल नुकसान होऊ शकते. म्हणूनच, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर खरेदी करण्याची शिफारस केली जाते कारण ते थर्ड पार्टी लायबिलिटी पासून संरक्षणासह फायनान्शियल संरक्षण प्रदान करते.
दोन प्रकारच्या कार इन्श्युरन्स पॉलिसी आहेत - कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि लायबिलिटी ओन्ली पॉलिसी
सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार, 1 सप्टेंबर, 2018 पासून, प्रत्येक नवीन कार मालकाला लाँग टर्म पॉलिसी खरेदी करावी लागेल. तुम्ही तुमच्या मौल्यवान मालमत्तेसाठी खालील लाँग टर्म पॉलिसीमधून निवडू शकता:
  1. वर्षे पॉलिसी कालावधी साठी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी
  2. वर्षे पॉलिसी कालावधी साठी पॅकेज पॉलिसी
  3. 3 वर्षांच्या लायबिलिटी कव्हरसह बंडल्ड पॉलिसी आणि स्वत:च्या नुकसानीसाठी 1 वर्षाचे कव्हर
होय, मोटर व्हेईकल ॲक्ट अनुसार रस्त्यावर चालणारे प्रत्येक मोटर वाहन किमान लायबिलिटी ओन्ली पॉलिसीसह इन्श्युअर्ड असणे आवश्यक आहे.
झिरो डेप्रीसिएशन हे ॲड-ऑन कव्हर आहे आणि ते अतिरिक्त प्रीमियम भरून खरेदी करावे लागेल. हे डेप्रीसिएशन शिवाय तुमच्या वाहनाला संपूर्ण कव्हरेज ऑफर करते. उदाहरणार्थ, जर तुमचे वाहन पूर्णपणे खराब झाले असेल तर तुम्हाला कोणतेही डेप्रीसिएशन शुल्क भरावे लागणार नाही आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन पूर्ण क्लेम रकमेसाठी पात्र असेल.
इमर्जन्सी असिस्टन्स हे ॲड-ऑन कव्हर आहे आणि अतिरिक्त प्रीमियम भरून खरेदी करावे लागेल. यामध्ये अनेक लाभ आहेत जसे की बिघाड, टायर रिप्लेसमेंट, टोईंग, फ्यूएल रिप्लेसमेंट इ. बाबतीत सहाय्य, जे पॉलिसी कालावधी दरम्यान प्राप्त केले जाऊ शकतात. या लाभांना प्राप्त करण्यासाठी कस्टमरना पॉलिसीवर नमूद केलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे.

अगदी सोप्या भाषेत, क्लेम-फ्री वर्षानंतर तुमची पॉलिसी रिन्यू करताना देय ओन डॅमेज प्रीमियममध्ये हे डिस्काउंट आहे. काळजीपूर्वक वाहन चालविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे.

सर्व प्रकारची वाहनेओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही20%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही25%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही35%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही45%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही50%
तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी ऑनलाईन सहजपणे रिन्यू करू शकता. तुम्हाला सेल्फ इन्स्पेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे, एकदा का एचडीएफसी एर्गो द्वारे डॉक्युमेंट्स मंजूर झाल्यानंतर, पेमेंट लिंक पाठवली जाईल आणि तुम्ही पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पॉलिसीची कॉपी प्राप्त होईल.
मागील पॉलिसीच्या कालबाह्य तारखेपासून 90 दिवसांपर्यंत नो क्लेम बोनस वैध असते. जर पॉलिसी 90 दिवसांच्या आत रिन्यू केली नाही तर नो क्लेम बोनस 0% होईल आणि रिन्यू केलेल्या पॉलिसीवर कोणताही लाभ दिला जाणार नाही.

वाहनाचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) हे 'सम इन्श्युअर्ड' मानले जाईल आणि प्रत्येक इन्श्युअर्ड वाहनासाठी प्रत्येक पॉलिसी कालावधी सुरू होताना ते निश्चित केले जाईल.
वाहनाचा IDV ब्रँडच्या उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आणि इन्श्युरन्स/रिन्यूवल सुरू होताना इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित वाहनाच्या मॉडेलच्या आधारावर निश्चित केला जावा आणि डेप्रीसिएशनसाठी (खाली निर्दिष्ट केलेल्या शेड्यूलनुसार) ॲडजस्ट केला जावा. साईड कार आणि/किंवा ॲक्सेसरीजचे IDV, जर असतील तर, वाहनात फिट केले असल्यास परंतु वाहनाच्या उत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किंमतीमध्ये समाविष्ट नसल्यास देखील निश्चित केले जाईल.

वाहनाचे वयIDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे %
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही5%
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही15%
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही20%
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही30%
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही40%
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही50%
कोणतेही पेपरवर्क आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंटेशनची आवश्यकता नाही आणि तुम्हाला तत्काळ तुमची पॉलिसी मिळेल.
एन्डॉर्समेंट पास करून विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर केली जाऊ शकते. विद्यमान पॉलिसी अंतर्गत एन्डॉर्समेंट पास करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC/NCB रिकव्हरी सारखे सहाय्यक डॉक्युमेंट्स आवश्यक असतील.
किंवा
तुम्ही विद्यमान पॉलिसी कॅन्सल करू शकता. पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30 सारख्या सहाय्यक डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल.
विद्यमान वाहनाची विक्री करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर विद्यमान इन्श्युररद्वारे NCB रिझर्व्हिंग लेटर जारी केले जाईल. NCB रिझर्व्हिंग लेटरच्या आधारे, हा लाभ नवीन वाहनाकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो
तुम्हाला इन्श्युरन्स ट्रान्सफर करण्यासाठी सहाय्यक डॉक्युमेंट्ससह इन्श्युररशी संपर्क साधावा लागेल. सहाय्यक डॉक्युमेंट्स मध्ये सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC, जुनी RC कॉपी, ट्रान्सफर केलेली RC कॉपी आणि NCB रिकव्हरी रक्कम यांचा समावेश असेल.
तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी ऑनलाईन सहजपणे रिन्यू करू शकता. तुम्हाला एचडीएफसी एर्गो सेल्फ इन्स्पेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, एकदा का डॉक्युमेंट्स एचडीएफसी एर्गो द्वारे मंजूर झाल्यानंतर, पेमेंट लिंक पाठविली जाईल आणि तुम्ही पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पॉलिसीची कॉपी प्राप्त होईल.
तुम्ही एकतर एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या कॉल सेंटर किंवा एचडीएफसी एर्गोच्या मोबाईल ॲपमार्फत क्लेम रजिस्टर करू शकता
तुम्ही एकतर एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या कॉल सेंटर किंवा एचडीएफसी एर्गोच्या मोबाईल ॲपमार्फत क्लेम रजिस्टर करू शकता
रात्रभर दुरुस्ती सुविधेसह, किरकोळ नुकसानीची दुरुस्ती एका रात्रीत पूर्ण केली जाईल. सुविधा केवळ प्रायव्हेट कार आणि टॅक्सीसाठीच उपलब्ध आहे. रात्रभर दुरुस्ती सुविधेची प्रोसेस खाली नमूद केली आहे
  1. क्लेम ला कॉल सेंटर किंवा एचडीएफसी एर्गो मोबाईल ॲप्लिकेशन (IPO) द्वारे सूचित करणे आवश्यक आहे.
  2. आमची टीम कस्टमरशी संपर्क साधेल आणि वाहनाच्या नुकसानीच्या फोटोसाठी विनंती करेल.
  3. या सर्व्हिस अंतर्गत 3 पॅनेलपर्यंत मर्यादित नुकसान स्वीकारले जातील.
  4. वाहन सूचनेनंतर लगेच दुरुस्त केले जाऊ शकत नाही कारण वर्कशॉप अपॉईंटमेंट आणि पिक-अप हे वाहनाच्या पार्ट आणि स्लॉट उपलब्धतेच्या अधीन आहे.
  5. कस्टमरला गॅरेजमध्ये जाण्यासाठी आणि गॅरेजमधून परत येण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.
  6. सध्या ही सर्व्हिस दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, गुडगाव, जयपूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या निवडक 13 शहरांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्ही तुमच्या बँकद्वारे जारी केलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे, इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, EMI, UPI (जीपे, फोनपे, पेटीएम, इ.), QR कोडद्वारे तुमचा पॉलिसी प्रीमियम भरू शकता. कृपया नोंद घ्या, आम्ही कोणत्याही क्लब कार्ड किंवा डायनर्स कार्डमार्फत पेमेंट स्वीकारत नाही.
अवॉर्ड्स आणि मान्यता
best_bfsi_2011 best_employer_brand best_employer_brand_2012 best_employer_brand_besi_2012 bfsi_2014 cfo_2014 iAAA icai_2013 icai_2014 icai_2015 icai_2016 iir_2012 iir_2016
x