एचडीएफसी एर्गो सह टू-व्हीलर इन्श्युरन्स
एचडीएफसी एर्गो सह टू-व्हीलर इन्श्युरन्स
वार्षिक प्रीमियम केवळ ₹538 पासून सुरू*

वार्षिक प्रीमियम सुरुवात

केवळ ₹538 मध्ये*
7400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेज ^

2000+ कॅशलेस

नेटवर्क गॅरेज**
इमर्जन्सी रोडसाईड असिस्टन्स

इमर्जन्सी रोडसाईड

असिस्टन्स
4.4 कस्टमर रेटिंग ^

4.4

कस्टमर रेटिंग
होम / टू-व्हीलर इन्श्युरन्स / होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स

होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स

होंडा बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन

गेल्या दशकभरात, होंडा मोटर कंपनीने सातत्याने भारतीय खरेदीदारांचा विश्वास आणि अपेक्षा राखली आहे. ते 1948 मध्ये स्थापित करण्यात आले होते आणि 1949 मध्ये त्यांची पहिली मोटरसायकल सादर केली - द 'ड्रीम' D-टाईप. होंडाने 1984 मध्ये हिरो ग्रुपच्या सहकार्याने त्यांची भारतातील कामगिरी सुरू केली. 2001 मध्ये, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) प्रा. लि. स्थापित झाली आणि त्यांच्या पहिल्या मॉडेल - होंडा ॲक्टिव्हा सह, कंपनीने भारतीय मार्केट मध्ये मजबूत स्थान मिळवण्यास सुरुवात केली. दहा वर्षांनंतर, 2011 मध्ये, ते औपचारिकरित्या हिरो ग्रुपसह विभक्त झाले. कमी मेंटेनन्स खर्च लक्षात घेता होंडा मोटारसायकल खरेदी करणे योग्य आहे आणि जर तुम्ही होंडा मोटरसायकल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स घेणे उचित आहे.

होंडाच्या आता भारतात चार उत्पादन सुविधा आहेत आणि देशातील टू-व्हीलर्सचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक आहेत आणि जगातील सर्वात मोठे उत्पादक आहेत. ॲक्टिव्हा व्यतिरिक्त, होंडाचे प्रसिद्ध मॉडेल्स युनिकॉर्न, डिओ, शाईन इ. आहेत. एचडीएफसी एर्गो नो क्लेम बोनस प्रोटेक्शन, झिरो डेप्रीसिएशन इ. सारख्या विविध ॲड-ऑन कव्हर्ससह होंडा बाईक इन्श्युरन्स ऑफर करते.

लोकप्रिय होंडा टू-व्हीलर मॉडेल्स

1
होंडा ॲक्टिव्हा
होंडाच्या बॅजची पहिली मॉडेल म्हणून 2001 मध्ये ॲक्टिव्हा बाजारात आली आणि आज स्कूटरमध्ये तिचा दबदबा कायम आहे. आता सहाव्या पिढीमध्ये ॲक्टिव्हा पूर्णपणे नवीन इंजिन प्लॅटफॉर्म, होंडाची प्रशंसित eSP टेक्नॉलॉजी, ॲडजस्टेबल रिअर सस्पेन्शन, टेलिस्कोपिक सस्पेन्शनसह मोठी फ्रंट व्हील्स आणि बऱ्याच गोष्टींसह येते.
2
होंडा SP125
होंडाची पहिली BS VI-कम्प्लायंट मोटरसायकल असलेली क्लास-लीडिंग 125 CC बाईक आहे ज्यात सिंगल-सिलिंडर, फ्यूएल-इंजेक्टेड मोटर आहे जी 7,500 RPM वर 10.8 PS निर्माण करते. यात ACG फीचर असल्याने अगदी आरामात, शांतपणे ती स्टार्ट करू शकता. ही ड्रम आणि डिस्क ब्रेक्सच्या पर्यायांसह टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक अब्सॉर्बर्स सह येते.
3
होंडा युनिकॉर्न
ही 150-180 CC सेगमेंटमधील नो-नॉनसेन्स कम्युटर बाईक आहे. 160-CC मोटर सह 7,500 RPM वर 12.73 PS निर्माण करते. होंडाच्या मालकीच्या HET इंजिनसह, तुम्ही सुरळीत, विश्वसनीय राईडचा आनंद घेऊ शकता. PGM-FI सिस्टीम कार्यक्षम ज्वलन आणि कमी उत्सर्जनासाठी इंजिनला उत्तम इंधन वितरण सुनिश्चित करते. लाँग व्हीलबेस खराब रस्त्यांवर अधिक स्थिरता आणि आराम सुनिश्चित करते.
4
होंडा हॉर्नेट 2.0
मोटो GP-प्रेरित हॉर्नेट 2.0 ही होंडाची 180-200cc सेगमेंट मध्ये दिमाखदार आगमनाची सुरुवात आहे. PGM-FI सिस्टीमसह सिंगल-सिलिंडर 185 cc मोटर द्वारे समर्थित, बाईक बहुतांश रस्त्यांवर अगदी आरामात चालते. स्पोर्टी आणि मस्क्युलर डिझाईन खास बाईकप्रेमी तरुणांसाठी करण्यात आली आहे. तसेच, यात असलेले USD सस्पेन्शन्स तर कमालच आहेत, ज्यामुळे तुम्ही बाईक खरेदी केल्याचे समाधान मिळते.
5
होंडा शाईन
होंडाची 100-125 CC टू-व्हीलर मार्केटमध्ये देखील छाप असून त्यात होंडा शाईन चा देखील वाटा आहे. 124 CC BS VI-कम्प्लायंट इंजिन असून हे 7,500 RPM मध्ये 10.59 PS निर्माण करते. ही एक जास्त गाजावाजा न करणारी, सर्वसामान्यांची कम्युटर बाईक आहे, इंधनाच्या खर्चाकडे लक्ष देऊन विश्वास संपादन करणारी व योग्य कामगिरी करण्याची बाईक आहे.
6
होंडा डीआयओ
अत्यंत लोकप्रिय स्कूटरला एक मेकओव्हर मिळतो जो तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी मोठ्या स्टाईलचा समावेश करतो. 110-CC मोटर PGM-FI फ्यूएल सिस्टीमसह आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ही याची खासियत आहे. टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि लार्ज फ्रंट व्हील्स चा समावेश केल्यामुळे मागील एडिशन पेक्षा ही चालवण्यास खूप आरामदायी आहे. एक्स्टर्नल फ्यूएल लिड सुनिश्चित करते की इंधन भरताना तुम्ही बसून राहू शकता.

एचडीएफसी एर्गो चे होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्सचे प्रकार

बाईकचे मालक झाला आहात म्हणजे काम झाले असे नाही होत, तुमच्याकडे बाईक इन्श्युरन्स देखील असला पाहिजे. अधिक स्पष्टच सांगायचे झाले तर भारतीय रस्त्यांवर तुमच्या स्वप्नातील टू-व्हीलर चालवायची असल्यास तुम्हाला होंडा बाईक इन्श्युरन्स पॉलिसीची आवश्यकता आहे. परंतु हा केवळ कायदेशीर आवश्यकता नाही; हा आर्थिकदृष्ट्या देखील चांगला निर्णय आहे. बेसिक थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स पासून ते दीर्घकालीन टू-व्हीलर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॅकेजपर्यंत, तुमची पॉलिसी अप्रिय घटनेच्या बाबतीत आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करते. तुमच्यासाठी पर्याय पुढीलप्रमाणे:

हा सर्वात सुचवला जाणारा पर्याय आहे, कारण यामध्ये थर्ड-पार्टी दायित्व, वैयक्तिक अपघात कव्हर आणि महत्त्वाचे – ओन डॅमेज बाईक इन्श्युरन्स कव्हर समाविष्ट आहे. हे तुम्हाला, तुमच्या बाईकला आणि अपघातात तुमची चूक असल्यास तुमच्या दायित्वांना संपूर्ण फायनान्शियल संरक्षण प्रदान करते. तुम्ही निवडक ॲड-ऑन्ससह तुमचे कव्हरेज आणखी वाढवू शकता.

X
सर्वांगीण संरक्षण हवे असलेल्या बाईक प्रेमींसाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:
बाईक अपघात

अपघात, चोरी, आग इ.

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

नैसर्गिक आपत्ती

थर्ड-पार्टी लायबिलिटी

ॲड-ऑन्सची निवड

अधिक जाणून घ्या

हे अशा प्रकारचे इन्श्युरन्स आहे जे मोटर व्हेईकल ॲक्ट, 1988 अंतर्गत अनिवार्य आहे. थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत, मृत्यू किंवा अपंगत्व किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कव्हर करते. हे अपघातामुळे तुम्हाला सामोरे जावे लागणाऱ्या कोणत्याही लीगल लायबिलिटीज साठी देखील कव्हर करते.

X
बाईक क्वचितच वापरणाऱ्यांसाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

थर्ड-पार्टी प्रॉपर्टी नुकसान

थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत

ज्यांच्याकडे यापूर्वीच थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसी आहे आणि कव्हरेजची व्याप्ती वाढवायची आहे त्यांच्यासाठी स्टँडअलोन ओन डॅमेज पॉलिसी आदर्श आहे. हे अपघातामुळे तुमच्या स्वत:च्या वाहनाच्या हानीमुळे उद्भवणाऱ्या नुकसानापासून तुम्हाला कव्हर करते. तसेच, तुम्ही तुमचे कव्हरेज वाढविण्यासाठी ॲड-ऑन्सची निवड अनलॉक करता.

X
ज्यांच्याकडे यापूर्वीच वैध थर्ड पार्टी कव्हर आहे त्यांच्यासाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:
बाईक अपघात

अपघात, चोरी, आग इ

नैसर्गिक आपत्ती

ॲड-ऑन्सची निवड

तुमच्या बाईकच्या मालकीच्या अनुभवात सोय आणि संपूर्ण संरक्षण जोडण्यासाठी डिझाईन केलेला प्लॅन, मल्टी-इअर होंडा बाईक इन्श्युरन्स पॅकेजमध्ये पाच वर्षाचा थर्ड-पार्टी दायित्व घटक आणि ॲन्युअल रिन्यू करण्याचा ओन डॅमेज इन्श्युरन्स घटक समाविष्ट आहे. जरी तुम्ही वेळेवर तुमचे ओन डॅमेज घटक रिन्यू करण्यास विसरलात तरीही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कव्हर केले जाईल.

X
ज्यांनी नवीन टू-व्हीलर खरेदी केली आहे त्यांच्यासाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:
बाईक अपघात

अपघात, चोरी, आग इ

नैसर्गिक आपत्ती

पर्सनल ॲक्सिडेंट

थर्ड-पार्टी लायबिलिटी

ॲड-ऑन्सची निवड

होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स मधील समावेश आणि अपवाद

तुमची होंडा बाईक इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या पॉलिसीच्या प्रकारानुसार कव्हरेज प्रदान करते. थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स केवळ थर्ड-पार्टी व्यक्ती किंवा मालमत्तेच्या नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करत करते, तर होंडासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्श्युरन्स पॉलिसी खालील गोष्टी कव्हर करते:

अपघात

अपघात

अपघातामुळे तुमच्या स्वत:च्या बाईकची हानी झाल्यामुळे उद्भवणारे फायनान्शियल नुकसान कव्हर केले जाते.

आग आणि स्फोट

आग आणि स्फोट

आग किंवा स्फोट यामुळे होणारी तुमच्या बाईकची हानी कव्हर केली जाते.

चोरी

चोरी

जर तुमची बाईक चोरीला गेली तर तुम्हाला बाईकच्या IDV सह भरपाई मिळेल.

आपत्ती

आपत्ती

भूकंप, वादळ, पूर, दंगा आणि तोडफोड यासारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना कव्हर केले जाते.

पर्सनल ॲक्सिडेंट

पर्सनल ॲक्सिडेंट

तुमच्या ₹15 लाखांपर्यंत उपचार संबंधित शुल्कांची काळजी घेतली जाईल.

थर्ड पार्टी लायबिलिटी

थर्ड पार्टी लायबिलिटी

थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत, अपंगत्व किंवा मृत्यू आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे नुकसान देखील कव्हर केले जाते.

तुमच्या होंडा बाईक इन्श्युरन्ससाठी ॲड-ऑन्स

झिरो डेप्रीसिएशन कव्हर - वाहनासाठी इन्श्युरन्स
झिरो डेप्रीसिएशन
झिरो डेप्रीसिएशन ॲड-ऑन कव्हर सह, क्लेम सेटल करताना इन्श्युरर बाईक किंवा स्कूटरच्या पार्ट्स वरील डेप्रीसिएशनला विचारात घेत नाही. पॉलिसीधारकाला डेप्रीसिएशन मूल्याच्या कोणत्याही वजावटीशिवाय नुकसानग्रस्त पार्ट साठी संपूर्ण क्लेम रक्कम मिळेल.
नो क्लेम बोनस प्रोटेक्शन - कार इन्श्युरन्स रिन्यूवल
नो क्लेम बोनस (NCB) प्रोटेक्शन
नो क्लेम बोनस (NCB) ॲड-ऑन कव्हर पॉलिसीधारकाला जर त्यांनी मागील पॉलिसी कालावधीमध्ये कोणताही क्लेम रजिस्टर न केल्यास NCB लाभ मिळविण्यास पात्र बनवेल.
इमर्जन्सी असिस्टन्स कव्हर - कार इन्श्युरन्स क्लेम
इमर्जन्सी असिस्टन्स कव्हर
हे ॲड-ऑन कव्हर रोडसाईड असिस्टन्स कव्हर म्हणूनही ओळखले जाते. ज्या पॉलिसीधारकाची इन्श्युअर्ड टू-व्हीलर हायवेच्या मध्यभागी खराब होते त्याला इन्श्युररद्वारे ऑफर केले जाणारे हे इमर्जन्सी असिस्टन्स आहे.
रिटर्न टू इनव्हॉईस - कारची इन्श्युरन्स पॉलिसी
रिटर्न टू इनव्हॉईस
जर तुमची बाईक किंवा स्कूटर चोरीला गेली असेल किंवा दुरुस्तीच्या पलीकडे असेल तर रिटर्न टू इनव्हॉईस ॲड-ऑन कव्हर तुम्हाला जेव्हा तुम्ही खरेदी केली होती त्या तुमच्या टू-व्हीलरच्या इनव्हॉईस मूल्याच्या समतुल्य रकमेचा क्लेम करण्यास पात्र बनवेल.
सर्वोत्तम कार इन्श्युरन्स प्रोव्हायडरद्वारे इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्टर
इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्टर
इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्टर ॲड-ऑन कव्हर इंजिन आणि गिअरबॉक्स चाईल्ड पार्ट्सच्या दुरुस्ती आणि बदली खर्चासाठी इन्श्युररला कव्हरेज प्रदान करेल. जर पाणी प्रवेश, लुब्रिकेटिंग ऑईलचे लीकेज आणि गिअरबॉक्सच्या हानीमुळे नुकसान झाले असेल तर कव्हरेज ऑफर केले जाते.

होंडा बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन कसे खरेदी करावे

जर तुम्ही होंडा मोटरसायकलचे मालक असाल तर टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी किंवा रिन्यू करणे योग्य आहे. तुम्ही होंडा बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन कसे खरेदी करू शकता हे येथे दिले आहे:
स्टेप 1. आमच्या एचडीएफसी एर्गो वेबसाईटद्वारे बाईक इन्श्युरन्स प्रॉडक्टवर नेव्हिगेट करा आणि तुमच्या बाईक रजिस्ट्रेशन क्रमांकासह तपशील भरा आणि नंतर कोट मिळवा वर क्लिक करा.
स्टेप 2: कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर दरम्यान निवडा. तुम्ही एका वर्षापासून ते तीन वर्षांपर्यंतचा प्लॅन निवडू शकता.
स्टेप 3: तुम्ही पॅसेंजर आणि पेड ड्रायव्हर्ससाठी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर देखील जोडू शकता. तसेच, तुम्ही नो क्लेम बोनस प्रोटेक्शन कव्हर, झिरो डेप्रीसिएशन इ. सारखे ॲड-ऑन निवडून पॉलिसी कस्टमाईज करू शकता
स्टेप 4: तुमच्या मागील बाईक इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल तपशील द्या. उदा. मागील पॉलिसीचा प्रकार (कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा थर्ड पार्टी, पॉलिसी कालबाह्यता तारीख, तुम्ही केलेल्या क्लेमचा तपशील, जर असल्यास)
स्टेप 5: तुम्ही आता तुमचा होंडा बाईक इन्श्युरन्स प्रीमियम पाहू शकता
सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारे प्रीमियम भरा.
होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेसवर किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवली जाईल.

सेकंड-हँड होंडा बाईक साठी टू-व्हीलर इन्श्युरन्स कसा खरेदी करावा

तुम्ही सेकंड हँड होंडा बाईक खरेदी केली असली तरीही, तुमच्याकडे त्यासाठी टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी असणे आवश्यक आहे. 1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्टनुसार वैध बाईक इन्श्युरन्स पॉलिसीशिवाय रायडिंग करणे बेकायदेशीर आहे.

सेकंड-हँड बाईक इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी, खालील गोष्टी लक्षात ठेवा:

• नवीन RC नवीन मालकाच्या नावावर असल्याची खात्री करा

• इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) तपासा

• जर तुमच्याकडे विद्यमान बाईक इन्श्युरन्स पॉलिसी असेल तर डिस्काउंट मिळवण्यासाठी नो क्लेम बोनस (NCB) ट्रान्सफर करा

• अनेक ॲड-ऑन कव्हरमधून निवडा (इमर्जन्सी रोडसाईड असिस्टन्स, नो क्लेम बोनस प्रोटेक्शन, झिरो डेप्रीसिएशन कव्हर इ.)

आता सेकंड हँड होंडा बाईकसाठी होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी करण्याच्या स्टेप्स पाहूया

स्टेप 1. एचडीएफसी एर्गो वेबसाईटच्या बाईक इन्श्युरन्स सेक्शनला भेट द्या, तुमचा सेकंड हँड होंडा बाईक रजिस्ट्रेशन क्रमांक टाईप करा आणि कोट मिळवा वर क्लिक करा.

स्टेप 2: तुमच्या सेकंड-हँड बाईकचे मेक आणि मॉडेल टाईप करा.

स्टेप 3: तुमच्या मागील सेकंड-हँड बाईक इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल तपशील द्या.

स्टेप 4: थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर दरम्यान निवडा.

स्टेप 5: तुम्ही आता तुमचा होंडा बाईक इन्श्युरन्स प्रीमियम पाहू शकता.

होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यू कसे करावे?

तुमच्या होंडा बाईक इन्श्युरन्स रिन्यूवल साठी फक्त काही मिनिटे लागतील. तुमच्या स्वतःच्या घरी बसून आरामात फक्त काही क्लिकनेच ते पूर्ण होऊ शकते. खाली नमूद केलेल्या चार-स्टेप्स प्रोसेसचे अनुसरण करा आणि त्वरित कव्हर मिळवा!

  • स्टेप #1
    स्टेप #1
    एचडीएफसी एर्गो वेबसाईटला भेट द्या आणि तुमची पॉलिसी खरेदी किंवा रिन्यू करणे निवडा
  • स्टेप #2
    स्टेप #2
    तुमच्‍या बाईकचे तपशील, रजिस्ट्रेशन, शहर आणि मागील पॉलिसी तपशील, जर असल्यास टाईप करा
  • स्टेप #3
    स्टेप #3
    कोट प्राप्त करण्यासाठी तुमचा ईमेल ID आणि फोन क्रमांक प्रदान करा
  • स्टेप #4
    स्टेप #4
    ऑनलाईन पेमेंट करा आणि त्वरित कव्हर मिळवा.!

तुमच्या होंडा टू-व्हीलरसाठी कालबाह्य पॉलिसी कशी रिन्यू करावी?

जर तुमची होंडा बाईक इन्श्युरन्स पॉलिसी कालबाह्य झाली असेल तर RTO ला मोठे दंड भरणे टाळण्यासाठी ती रिन्यू करण्याचा सल्ला दिला जातो. 1988 च्या मोटर व्हेईकल ॲक्टनुसार प्रत्येक वाहन मालकाकडे किमान मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचे थर्ड पार्टी कव्हर असणे आवश्यक आहे.
आता होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवलच्या स्टेप्स पाहूया.

स्टेप1: एचडीएफसी एर्गो वेबसाईटवरील बाईक इन्श्युरन्स सेक्शनला भेट द्या आणि जर तुमची मागील पॉलिसी एचडीएफसी एर्गो सह असेल तर रिन्यू पॉलिसी निवडा. जर तुमची होंडा बाईक इन्श्युरन्स पॉलिसी अन्य इन्श्युररसह असल्यास तुम्ही तुमचा टू-व्हीलर रजिस्ट्रेशन क्रमांक टाईप करणे आवश्यक आहे.
Step 2: Enter details associated with your HDFC ERGO policy that you want to renew, include or exclude add-on covers, and complete the journey by paying the bike insurance premium online. Choose comprehensive or third-party cover if your policy was with another insurer. After that, you can select add-ons if you opt for comprehensive cover.
स्टेप 3: रिन्यू केलेली बाईक इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर मेल केली जाईल किंवा तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवली जाईल.

होंडा कॅशलेस बाईक इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

जर तुम्हाला तुमच्या होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी कॅशलेस क्लेम करायचा असेल तर तुम्हाला खालील स्टेप्स पार कराव्या लागतील:
• आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून किंवा 8169500500 वर व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून घटनेविषयी एचडीएफसी एर्गो क्लेम टीमला कळवा.
• तुमचे टू-व्हीलर एचडीएफसी एर्गो कॅशलेस नेटवर्क गॅरेजमध्ये घेऊन जा. येथे, तुमचे वाहन इन्श्युररद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीद्वारे तपासले जाईल.
• आमची मंजुरी मिळाल्यानंतर, गॅरेज तुमची बाईक दुरुस्त करण्यास सुरुवात करेल.
• यादरम्यान, आवश्यक डॉक्युमेंट्स आणि योग्यरित्या भरलेला क्लेम फॉर्म आम्हाला सादर करा. जर कोणत्याही विशिष्ट डॉक्युमेंटची आवश्यकता असेल तर आम्ही तुम्हाला त्याविषयी सूचित करू.
• एचडीसी एर्गो क्लेम टीम बाईक इन्श्युरन्समधील कॅशलेस क्लेमच्या तपशिलाला व्हेरिफाय करेल आणि एकतर क्लेम स्वीकारेल किंवा नाकारेल.
• यशस्वी व्हेरिफिकेशननंतर, आम्ही दुरुस्तीचा खर्च थेट गॅरेजला देय करून कॅशलेस बाईक इन्श्युरन्स क्लेम सेटल करू. लक्षात ठेवा की तुम्हाला लागू होणारी कपातयोग्य, काही असल्यास, तुमच्या स्वतःच्या खिशातून भरावी लागेल.
नोंद: थर्ड-पार्टी नुकसानाच्या बाबतीत, तुम्ही अपघातात सहभागी असलेल्या इतर वाहनाच्या मालकाचा तपशील घेऊ शकता. तथापि, तुमच्या वाहनाच्या लक्षणीय नुकसान किंवा चोरीसाठी, तुम्हाला कॅशलेस बाईक इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस सुरू करण्यापूर्वी नजीकच्या पोलिस स्टेशनवर FIR रिपोर्ट दाखल करावा लागेल.

होंडा रिएम्बर्समेंट बाईक इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

होंडा बाईक इन्श्युरन्स किंवा होंडा स्कूटी इन्श्युरन्स पॉलिसीसाठी रिएम्बर्समेंट क्लेम दाखल करताना, तुम्हाला खालील स्टेप्स पार कराव्या लागतील
• स्टेप 1: एचडीएफसी एर्गो क्लेम टीमला कॉलद्वारे किंवा आमच्या वेबसाईटद्वारे रजिस्टर करून घटनेसंदर्भात क्लेम सूचित करा. आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून किंवा 8169500500 वर व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून आमच्या क्लेम टीमशी संपर्क साधा. आमच्या एजंटने प्रदान केलेल्या लिंकसह, तुम्ही डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करू शकता. तुम्ही सर्वेक्षक किंवा वर्कशॉप पार्टनरद्वारे सेल्फ इन्स्पेक्शन किंवा ॲप सक्षम डिजिटल इन्स्पेक्शनची निवड करू शकता.
• स्टेप 2: अपघातात सहभागी असलेल्या वाहनांचा रजिस्ट्रेशन क्रमांक नोट करा.
• स्टेप 3: आवश्यक असल्यास, नजीकच्या पोलिस स्टेशनवर FIR दाखल करा. क्लेम दाखल करण्यासाठी FIR कॉपी आवश्यक असू शकते.
• स्टेप 4: अपघाताचे तपशील जसे वेळ आणि लोकेशन नोट करा. कोणत्याही साक्षीदाराचे नाव आणि संपर्क तपशील नोट करा.
• स्टेप 5: क्लेम ट्रॅकरद्वारे तुमच्या क्लेमच्या स्टेटसला ट्रॅक करा.
• स्टेप 6: जेव्हा तुमचा क्लेम मंजूर होईल तेव्हा तुम्हाला मेसेजद्वारे नोटिफिकेशन मिळेल.

एचडीएफसी एर्गो तुमची पहिली निवड का असावी?

बाईक इन्श्युरन्स हा बाईक मालकीचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. वाहन चालवताना कायदेशीररित्या इन्श्युरन्स असणे आवश्यक आहेच मात्र आकस्मिक होणार्‍या अपघातात आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी देखील महत्त्वाचे आहे. तसेच, तुम्ही कितीही सुरक्षित वाहन चालवत असाल, तुमची सुरक्षा ही अन्य वाहनांवर देखील अवलंबून असते. अपघातामुळे दुरुस्तीचा खर्च येतो, अवाजवी बिले येतात त्यावेळी बाईक इन्श्युरन्स या अनपेक्षित, आऊट-ऑफ-पॉकेट खर्चांपासून तुमचे संरक्षण करते. त्यानंतर स्टेप आहे योग्य इन्श्युरर निवडण्याची. तुम्ही तुमच्या होंडा बाईक इन्श्युरन्स पॉलिसी साठी एचडीएफसी एर्गो का निवडावे त्याचे कारण पुढीलप्रमाणे

व्यापक सर्व्हिसेस

व्यापक सर्व्हिस

तुम्हाला अशा इन्श्युररची आवश्यकता आहे ज्याची तुम्ही राहता त्या क्षेत्रात किंवा देशात मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. आणि संपूर्ण भारतात 7100 पेक्षा जास्त कॅशलेस गॅरेजसह, एचडीएफसी एर्गो नेहमीच मदत मिळेल याची खात्री करते.

24x7 रोडसाईड असिस्टन्स

24x7 रोडसाईड असिस्टन्स

24x7 रोडसाईड असिस्टन्स सुविधा हे सुनिश्चित करते की कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास तुम्ही कधीही असहाय्यपणे अडकून पडणार नाही.

एक कोटीपेक्षा जास्त कस्टमर

एक कोटीपेक्षा जास्त कस्टमर

एचडीएफसी एर्गोचे 1.6 कोटीपेक्षा जास्त आनंदी कस्टमर्स आहेत, याचा अर्थ असा की तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

ओव्हरनाईट दुरुस्ती

ओव्हरनाईट सर्व्हिसेस

जेव्हा तुमची कार सर्व्हिसमध्ये असेल तेव्हा तुमचा रुटीन विस्कळीत होऊ शकतो. तथापि, किरकोळ अपघाती दुरुस्तीसाठी आमच्या ओव्हरनाईट सर्व्हिससह, केवळ तुमची रात्रीची झोप पूर्ण करा आणि सकाळी तुमच्या प्रवासासाठी वेळेवर कार घरपोच डिलिव्हर केली जाईल.

होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स क्लेम

सोपे क्लेम

आदर्श इन्श्युररने क्लेमवर त्वरित आणि सहजपणे प्रोसेस केली पाहिजे. एचडीएफसी एर्गो हे करते कारण आम्ही आमच्या पॉलिसीधारकांच्या क्लेमवर कार्यक्षमतेने प्रोसेस करतो. आमचा 100% क्लेम सेटलमेंट रेशिओचा रेकॉर्ड आहे.

वाचा नवीनतम होंडा टू-व्हीलर इन्श्युरन्स ब्लॉग्स

होंडा ॲक्टिव्हाचा विकास

गेल्या काही वर्षांत होंडा ॲक्टिव्हाचा विकास

संपूर्ण लेख पाहा
एप्रिल 21, 2022 रोजी प्रकाशित
होंडा स्पोर्ट्स बाईक

होंडा स्पोर्ट्स बाईक का निवडावी?

संपूर्ण लेख पाहा
एप्रिल 20, 2022 रोजी प्रकाशित
होंडा ॲक्टिव्हा खरेदी करण्याची कारणे

होंडा ॲक्टिव्हा विषयी जाणून घेण्याच्या 6 गोष्टी ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली

संपूर्ण लेख पाहा
एप्रिल 04, 2022 रोजी प्रकाशित
होंडा ॲक्टिव्हा विषयी सर्वकाही

होंडा ॲक्टिव्हा विषयी तुम्हाला माहित असायला हवे असे सर्वकाही

संपूर्ण लेख पाहा
एप्रिल 04, 2022 रोजी प्रकाशित
ब्लॉग राईट स्लायडर
ब्लॉग लेफ्ट स्लायडर
अधिक ब्लॉग पाहा
आत्ताच मोफत कोट मिळवा
टू-व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यासाठी तयार आहात
संपूर्ण भारतात 2000+ नेटवर्क गॅरेज
2000+ˇ नेटवर्क गॅरेज
संपूर्ण भारतात

होंडा विषयी लेटेस्ट न्यूज

Honda to Launch Its First E-Scooter on Nov 27

Honda Motorcycle and Scooter India plans to launch its first e-scooter on Nov 27. The new e-scooter is expected to be an electric variant of the Activa, showcasing updated features like a rectangular LED headlamp. Honda’s teaser titled “Electrify Your Dreams” provides a glimpse of the e-scooter’s LED headlamp and iconic logo, hinting at a stylish Activa design. Honda is expected to use Lithium Iron Phosphate (LFP) batteries offering a range of 100km on a single charge.



Published on: Nov 14, 2024

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने होलसेल मध्ये हिरो मोटोकॉर्पला मागे टाकले

हिरो मोटोकॉर्पची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिलं स्थान जपानच्या होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने पटकाविले आहे. रिटेल सेल्स मध्ये, हिरोचं स्थान अढळ राहिलं आहे. होंडाने एप्रिल-जुलै कालावधीमध्ये डोमेस्टिक होलसेल्स मध्ये केवळ 18.53 लाखांपेक्षा जास्त युनिट पर्यंत मजल मारली, तर हिरोने सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल उत्पादकांच्या (एसआयएएम) डाटानुसार 18.31 लाखांपेक्षा जास्त युनिट्स विक्री करण्याचे व्यवस्थापन केले आहे. “सणाच्या हंगामापूर्वी आणि रिकव्हरीच्या सुरुवातीच्या लक्षणांवर आधारित, होंडाने नेटवर्कला पुरवठा सुनिश्चित केला आहे”, जाटो डायनॅमिक्स या संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवी भाटिया म्हणाले.

प्रकाशित तारीख: ऑगस्ट 22, 2024

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


निश्चितपणे. तुमच्याकडे हॉर्नेटची पहिली एडिशन असो किंवा आधीची डिओ असो, तुम्ही ज्या बाईकने राईड करू इच्छिता त्यासाठी तुम्ही इन्श्युरन्स खरेदी करू शकता आणि खरेदी करावे. वापरात नसलेल्या बाईकसाठी पार्ट्स आणि स्पेअर्स मिळवणे नवीन मॉडेल्सपेक्षा जास्त कठीण आणि महाग असू शकतात, म्हणूनच इन्श्युरन्स असणे अधिक महत्त्वाचे ठरते.
तुम्ही बाईक हँडओव्हरची औपचारिकता पूर्ण करत असताना तुम्हाला जुन्या मालकाकडून बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर केला जाऊ शकतो. इन्श्युररला सूचित करा आणि दोन्ही पार्टीकडून योग्य डॉक्युमेंट्सच्या मदतीने, होंडा बाईक इन्श्युरन्स पॉलिसी नाममात्र खर्चात ट्रान्सफर केली जाऊ शकते. हे महत्त्वाचे आहे कारण जर इन्श्युररला माहित नसेल की तुम्ही बाईकचे वर्तमान मालक आहात, तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
बहुतांश इन्श्युरर प्रीमियमच्या प्रो राटा ॲडजस्टमेंटसह बाईक इन्श्युरन्स पॉलिसी नवीन बाईकमध्ये ट्रान्सफर करण्याची अनुमती देतात. तथापि, जर तुम्ही तुमचे विद्यमान वाहन विकले असेल तर जुनी पॉलिसी नवीन मालकाकडे ट्रान्सफर करण्याचा आणि तुमच्या नवीन होंडा बाईकसाठी नवीन पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुमच्या जुन्या वाहनासाठी असलेले कव्हरेज नवीन बाईकसाठी पुरेसे असू शकत नाही.
इन्श्युरन्स प्रीमियम हा प्रश्नातील वाहनांच्या इंजिनच्या क्षमतेवर अवलंबून असतो. SP 125 चे 125-CC इंजिन आहे तर डिओ चे 110-CC इंजिन आहे. त्यामुळे, SP 125 चा प्रीमियम होंडा डिओपेक्षा जास्त असेल.