एचडीएफसी एर्गो सह टू-व्हीलर इन्श्युरन्स
एचडीएफसी एर्गो सह टू-व्हीलर इन्श्युरन्स
वार्षिक प्रीमियम केवळ ₹538 पासून सुरू*

वार्षिक प्रीमियम सुरुवात

केवळ ₹538 मध्ये*
7400+ कॅशलेस नेटवर्क गॅरेज ^

2000+ कॅशलेस

नेटवर्क गॅरेज**
इमर्जन्सी रोडसाईड असिस्टन्स

इमर्जन्सी रोडसाईड

असिस्टन्स
4.4 कस्टमर रेटिंग ^

4.4

कस्टमर रेटिंग
होम / टू-व्हीलर इन्श्युरन्स / TVS टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन

TVS टू-व्हीलर इन्श्युरन्स खरेदी करा/रिन्यू करा

टीव्हीएस टू-व्हीलर इन्श्युरन्स

TVS मोटर कंपनी, एक स्वदेशी ब्रँड जो आता जागतिक दिग्गज आहे, त्याचे संस्थापक टी व्ही सुंदरम अय्यंगार यांच्या नावावर आहे. जरी कंपनीची स्थापना 1911 मध्ये करण्यात आली होती, तरी त्याची मोटर कंपनी 1970 च्या उत्तरार्धात अस्तित्वात आली जेव्हा TVS 50 मोपेड्सचे उत्पादन सुरू केले. आज, हा भारतातील तिसरा सर्वात मोठा टू-व्हीलर उत्पादक आहे आणि त्याची इतर प्रदेशांसह मिडल ईस्ट, आफ्रिका आणि मध्य अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे.

मोपेडपासून ते स्कूटर, प्रवासी मोटरसायकल, स्पोर्टी बाईकपर्यंत, TVS टू-व्हीलर्सची विस्तृत श्रेणी तयार करते. ब्रँडमध्ये 44 दशलक्षपेक्षा जास्त कस्टमर्स आणि चार उत्पादन प्लांट आहेत - तमिळनाडू मधील होसूर, कर्नाटक मधील म्हैसूर, हिमाचल प्रदेश मधील नालागढ आणि इंडोनेशिया मधील करावांग.

लोकप्रिय TVS टू-व्हीलर मॉडेल्स

1
TVS स्कूटी पेप+
2005 मध्ये लाँच केलेले, हे वजनाने हलके वाहन अनेक रंगांमध्ये येते. त्याच्या DRL LED लॅम्प सह, त्यामध्ये आकर्षक लुक आहे. ते सहसा नवशिक्यांमध्ये मनपसंत मानले जाते कारण त्यांच्या 87.8cc सिंगल सिलिंडर आणि 4-स्ट्रोक इंजिनसह ते नियंत्रित करणे सोपे आहे. यामध्ये सीट अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्टोरेजसह USB मोबाईल चार्जिंग पर्याय उपलब्ध आहे.
2
TVS ज्युपिटर
ही TVS कंपनीची फॅमिली-फ्रेंडली स्कूटर आहे आणि निश्चितच तिच्या आधीच्या 110cc पेक्षा मोठी, चांगली आणि अधिक शक्तिशाली आहे. त्याचे सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन चांगले ॲक्सिलरेशन प्रदान करते आणि राईड करण्यासाठी त्यास अतिशय चैतन्यशील बनवते. त्याची इंधन कार्यक्षमता प्रशंसनीय आहे. सुधारित LED हेडलाईट्स रात्री अधिक दृश्यमानता सुनिश्चित करतात आणि डिस्क ब्रेक्स तुम्हाला त्वरित थांबवतात. डायमंड कट अलॉय व्हील्स एकूणच लुकमध्ये भर घालतात.
3
TVS स्टार सिटी प्लस
बाईकचा स्टायलिश रेड आणि ब्लॅक लुक आहे. क्लोज-सेट हँडलबार आणि स्कल्प्टेड फ्यूएल टँक याला दैनंदिन, आरामदायी प्रवासासाठी एक उत्तम पर्याय बनवते. हायड्रॉलिक रिअर शॉक अब्सॉर्बर्स हे सुनिश्चित करतात की ते खडबडीत राईड्स वरही विश्वसनीय साथीदार ठरू शकते. सर्वोत्तम कामगिरी प्रदान करण्यासाठी BS6 व्हेरियंट ETFi टेक्नॉलॉजीसह परिपूर्ण आहे. इकोथ्रस्ट इंजिन उत्कृष्ट मायलेज आणि कमी उत्सर्जन देते. यामध्ये USB चार्जर देखील आहे.
4
अपाचे RTR सीरिज
तुम्ही अप्रतिम अपाचे RR 310 लिक्विड कूल इंजिन पाहिले असेल, परंतु त्याच्या आधीचे देखील काही कमी प्रभावी नव्हते. पहिले अपाचे, 150cc मॉडेल, जेव्हा ते 2005 मध्ये लाँच करण्यात आले तेव्हा लक्षवेधी बनले होते. जसजशी वर्षे उलटत गेली, तसतसे अपाचेचे नवीन व्हेरियंट लाँच केले गेले ज्यात मोठ्या इंधन क्षमता, अधिक वैशिष्ट्ये, तांत्रिक प्रगती आणि सुधारित परफॉर्मन्स ऑफर केले गेले.
5
TVS XL 100
मोपेड अद्याप अनेकांसाठी पसंतीचे वाहन आहे. TVS मोपेड त्याच्या डिझाईन आणि परफॉर्मन्ससह खरेदीदारांना प्रभावित करत आहे. पिक-अप चांगले आहे आणि रायडरला सुरळीत प्रवासाचा आनंद घेता येतो. यात उत्तम शक्ती आहे आणि दोन प्रवाशांसह अतिरिक्त सामान वाहून नेऊ शकते. मोपेड एकाधिक कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
6
TVS iQUBE
TVS iQUBE भविष्यातील स्कूटर आहे. ज्यांना शाश्वततेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायचे आहे ते ही इलेक्ट्रिक स्कूटर निवडू शकतात जी अतुलनीय रायडिंग अनुभव देते. एक तांत्रिक चमत्कार, बाईकसाठी थोडी मेंटेनन्स आवश्यक आहे. LED हेड आणि टेल लॅम्प, पुरेशी स्टोरेज स्पेस, USB चार्जिंग पोर्ट्स, इनबिल्ट ब्लूटूथ आणि इतर वैशिष्ट्ये याला नेक्स्ट-जेन टू-व्हीलर बनवतात.

एचडीएफसी एर्गो ऑफर करत असलेल्या TVS टू-व्हीलर इन्श्युरन्सचे प्रकार

एचडीएफसी एर्गो 4 प्रकारचे टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑफर करते जे कॉम्प्रिहेन्सिव्ह थर्ड-पार्टी इन्श्युरन्स, थर्ड पार्टी इन्श्युरन्स आणि स्टँडअलोन ओन डॅमेज कार आणि ब्रँड न्यू बाईकसाठी कव्हर याप्रमाणे आहेत. तुम्ही तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्श्युरन्स मध्ये ॲड-ऑन कव्हर जोडून तुमच्या बाईकचे संरक्षण वाढवू शकता.

हा सर्वात शिफारस केलेला पर्याय आहे कारण यामध्ये थर्ड-पार्टी लायबिलिटी, पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर आणि महत्त्वाचे म्हणजे - ओन डॅमेज कव्हर समाविष्ट आहे. हे तुम्हाला, तुमच्या बाईकला आणि अपघातात तुमची चूक असल्यास तुमच्या दायित्वांना संपूर्ण फायनान्शियल संरक्षण प्रदान करते. तुम्ही निवडक ॲड-ऑन्ससह तुमचे कव्हरेज आणखी वाढवू शकता.

X
सर्वांगीण संरक्षण हवे असलेल्या बाईक प्रेमींसाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:
बाईक अपघात

अपघात, चोरी, आग इ.

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

नैसर्गिक आपत्ती

थर्ड-पार्टी लायबिलिटी

ॲड-ऑन्सची निवड

अधिक जाणून घ्या

हे अशा प्रकारचे इन्श्युरन्स आहे जे मोटर व्हेईकल ॲक्ट, 1988 अंतर्गत अनिवार्य आहे. थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत, मृत्यू किंवा अपंगत्व किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कव्हर करते. हे अपघातामुळे तुम्हाला सामोरे जावे लागणाऱ्या कोणत्याही लीगल लायबिलिटीज साठी देखील कव्हर करते.

X
बाईक क्वचितच वापरणाऱ्यांसाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

थर्ड-पार्टी प्रॉपर्टी नुकसान

थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत

ज्यांच्याकडे यापूर्वीच थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसी आहे आणि कव्हरेजची व्याप्ती वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी ही पॉलिसी आदर्श आहे. हे अपघातामुळे तुमच्या स्वत:च्या वाहनाच्या हानीमुळे उद्भवणाऱ्या नुकसानापासून तुम्हाला कव्हर करते. तसेच, तुम्ही तुमचे कव्हरेज वाढविण्यासाठी ॲड-ऑन्सची निवड अनलॉक करता.

X
ज्यांच्याकडे यापूर्वीच वैध थर्ड पार्टी कव्हर आहे त्यांच्यासाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:
बाईक अपघात

अपघात, चोरी, आग इ

नैसर्गिक आपत्ती

ॲड-ऑन्सची निवड

तुमच्या बाईकच्या मालकीच्या अनुभवात सोय आणि संपूर्ण संरक्षण जोडण्यासाठी डिझाईन केलेला प्लॅन, मल्टी इयर बाईक इन्श्युरन्स पॅकेजमध्ये पाच वर्षाचा थर्ड-पार्टी दायित्व घटक आणि वार्षिक नूतनीकरणीय स्वत:च्या नुकसानीचा इन्श्युरन्स घटक समाविष्ट आहे. जरी तुम्ही वेळेवर तुमचे ओन डॅमेज घटक रिन्यू करण्यास विसरलात तरीही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कव्हर केले जाईल.

X
ज्यांनी नवीन टू-व्हीलर खरेदी केली आहे त्यांच्यासाठी योग्य, हा प्लॅन खालीलप्रमाणे कव्हर करतो:
बाईक अपघात

अपघात, चोरी, आग इ

नैसर्गिक आपत्ती

पर्सनल ॲक्सिडेंट

थर्ड-पार्टी लायबिलिटी

ॲड-ऑन्सची निवड

TVS टू-व्हीलर इन्श्युरन्स मधील समावेश आणि अपवाद

तुमची टीव्हीएस बाईक इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या पॉलिसीच्या प्रकारानुसार कव्हरेज देते. थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स केवळ थर्ड पार्टी व्यक्ती किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करते, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह टीव्हीएस बाईक इन्श्युरन्स पॉलिसी खालील गोष्टींना कव्हर करते:

अपघात

अपघात

अपघातामुळे तुमच्या स्वत:च्या बाईकची हानी झाल्यामुळे उद्भवणारे फायनान्शियल नुकसान कव्हर केले जाते.

आग आणि स्फोट

आग आणि स्फोट

आग किंवा स्फोट यामुळे होणारी तुमच्या बाईकची हानी कव्हर केली जाते.

चोरी

चोरी

जर तुमची बाईक चोरीला गेली तर तुम्हाला बाईकच्या IDV सह भरपाई मिळेल.

आपत्ती

आपत्ती

भूकंप, वादळ, पूर, दंगा आणि तोडफोड यासारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना कव्हर केले जाते.

पर्सनल ॲक्सिडेंट

पर्सनल ॲक्सिडेंट

तुमच्या ₹15 लाखांपर्यंत उपचार संबंधित शुल्कांची काळजी घेतली जाईल.

थर्ड पार्टी लायबिलिटी

थर्ड पार्टी लायबिलिटी

थर्ड-पार्टी व्यक्तीला दुखापत, अपंगत्व किंवा मृत्यू आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे नुकसान देखील कव्हर केले जाते.

TVS टू-व्हीलर इन्श्युरन्स कसे रिन्यू करावे

तुमच्या TVS बाईक इन्श्युरन्स रिन्यूवल साठी केवळ काही मिनिटे लागतील. तुमच्या स्वतःच्या घरी बसून आरामात फक्त काही क्लिकनेच ते पूर्ण होऊ शकते. खाली नमूद केलेल्या चार-स्टेप्स प्रोसेसचे अनुसरण करा आणि त्वरित कव्हर मिळवा!

  • स्टेप #1
    स्टेप #1
    एचडीएफसी एर्गो वेबसाईटला भेट द्या आणि तुमची पॉलिसी खरेदी किंवा नूतनीकरण करणे निवडा
  • स्टेप #2
    स्टेप #2
    तुमच्‍या बाईकचे तपशील, रजिस्ट्रेशन, शहर आणि मागील पॉलिसी तपशील, जर असल्यास टाईप करा
  • स्टेप #3
    स्टेप #3
    कोट प्राप्त करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर प्रदान करा
  • स्टेप #4
    स्टेप #4
    ऑनलाईन पेमेंट करा आणि त्वरित कव्हर मिळवा.!

एचडीएफसी एर्गो तुमची पहिली निवड का असावी

बाईक इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे. मालक-रायडरला देशात कायदेशीररित्या राईड करण्यासाठी याची आवश्यकता असते. शिवाय, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहणे देखील महत्त्वाचे आहे. अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत ज्यामुळे तुमच्या बाईकचे मोठे नुकसान होऊ शकते आणि ते दुरुस्त करणे तुम्हाला महागात पडू शकते. तसेच अपघात आणि चोरी कोणत्याही चेतावणी शिवाय होऊ शकतात. हे सर्वोत्तम रायडर्स सोबत आणि तुमच्या बाईकमध्ये कितीही सुरक्षा वैशिष्ट्ये असली तरी होऊ शकते. एचडीएफसी एर्गोची बाईक इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला या अनपेक्षित खर्च टाळण्यास मदत करेल. TVS बाईक इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तुम्ही आमची निवड करावी असे इन्श्युरर आम्ही का आहोत याची अनेक कारणे आहेत, परंतु येथे टॉप कारणे दिली आहेत:

व्यापक सर्व्हिस

व्यापक सर्व्हिस

तुम्हाला अशा इन्श्युररची आवश्यकता आहे ज्याची तुम्ही राहता त्या क्षेत्रात किंवा देशात मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. आणि संपूर्ण भारतात 2000 पेक्षा जास्त कॅशलेस गॅरेजसह, एचडीएफसी एर्गो नेहमीच मदत मिळेल याची खात्री करते.

24x7 रोडसाईड असिस्टन्स

24x7 रोडसाईड असिस्टन्स

24x7 रोडसाईड असिस्टन्स सुविधा हे सुनिश्चित करते की कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास तुम्ही कधीही असहाय्यपणे अडकून पडणार नाही.

एक कोटीपेक्षा जास्त कस्टमर

एक कोटीपेक्षा जास्त कस्टमर

एचडीएफसी एर्गोचे 1.6 कोटीपेक्षा जास्त आनंदी कस्टमर्स आहेत, याचा अर्थ असा की तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

ओव्हरनाईट सर्व्हिस

ओव्हरनाईट सर्व्हिसेस

जेव्हा तुमची कार सर्व्हिसमध्ये असेल तेव्हा तुमचा रुटीन विस्कळीत होऊ शकतो. तथापि, किरकोळ अपघाती दुरुस्तीसाठी आमच्या ओव्हरनाईट सर्व्हिससह, केवळ तुमची रात्रीची झोप पूर्ण करा आणि तुमच्या सकाळी प्रवासासाठी वेळेवर कार तुमच्या दारात डिलिव्हर केली जाईल.

सोपे क्लेम

सोपे क्लेम

आदर्श इन्श्युररने क्लेमवर त्वरित आणि सहजपणे प्रोसेस केली पाहिजे. आणि एचडीएफसी एर्गो अगदी हेच करते, कारण आम्ही पहिल्याच दिवशी जवळपास 50% क्लेमवर प्रोसेस करतो, ज्यामुळे तुमच्या चिंता कमी होतात.

संपूर्ण भारतात 2000+ नेटवर्क गॅरेज
2000+ˇ नेटवर्क गॅरेज
संपूर्ण भारतात

वाचा नवीनतम TVS इन्श्युरन्स ब्लॉग्स

तुम्हाला TVS च्या या बंद झालेल्या बाईक्स आठवतात का?

तुम्हाला TVS च्या या बंद झालेल्या बाईक्स आठवतात का?

संपूर्ण लेख पाहा
मार्च 15, 2022 रोजी प्रकाशित
TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर - या कॅटेगरीतील सर्वोत्तम पैकी एक स्कूटर

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर - या कॅटेगरीतील सर्वोत्तम पैकी एक स्कूटर

संपूर्ण लेख पाहा
मार्च 15, 2022 रोजी प्रकाशित
TVS टू-व्हीलरला इतके लोकप्रिय बनवणारी कारणे

TVS टू-व्हीलरला इतके लोकप्रिय बनवणारी कारणे

संपूर्ण लेख पाहा
मार्च 11, 2022 रोजी प्रकाशित
तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 5 सर्वोत्तम ॲक्सेसरीज

तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 5 सर्वोत्तम ॲक्सेसरीज

संपूर्ण लेख पाहा
मार्च 9 2022 रोजी प्रकाशित

TVS विषयी नवीनतम बातम्या

सप्टेंबरच्या विक्रीमधील वाढीमुळे TVS शेअर्समध्ये उसळी

TVS मोटर कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर रोजी NSE वर अर्ध्या टक्क्याने वाढून ₹1,531.10 वर पोहोचले कारण टू-व्हीलर उत्पादकाने वर्षभरापूर्वीच्या 379,011 युनिट्सच्या तुलनेत सप्टेंबर मध्ये 402,553 युनिट्सच्या एकूण विक्रीमध्ये 6% वर्ष-दर-वर्ष (YoY) वाढ रिपोर्ट केली आहे. टू-व्हीलर्सची एकूण विक्री सप्टेंबरमध्ये 361,729 युनिट्स पासून 7% YoY वाढून 386,955 युनिट्स झाली. TVS मोटर कंपनीचा स्टॉक 2023 मध्ये आतापर्यंत जवळपास 42% वाढला आहे आणि मागील वर्षात त्यात 53% सतत वाढ झाली.

प्रकाशित तारीख: ऑक्टोबर 05, 2023

TVS ने भारतात ₹ 98,919 मध्ये रेडर 125 साठी स्पेशल सुपर स्क्वॉड एडिशन लाँच केले आहे

TVS ने रेडर 125 चे स्पेशल सुपर स्क्वॉड एडिशन लाँच केले आहे, जिथे बाईक आता मार्व्हल सीरिज: ब्लॅक पँथर आणि आयर्न मॅन द्वारे प्रेरित दोन नवीन पेंट स्कीममध्ये उपलब्ध असेल. या बदलांव्यतिरिक्त, बाईकमध्ये वैशिष्ट्ये किंवा मेकॅनिकल बदलांमध्ये कोणताही अतिरिक्त समावेश नाही. अगदी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक देखील बदललेले नाहीत. रेडर 125 सुपर स्क्वॉड एडिशन मध्ये फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम ब्रेक आहेत. नवीन रेडर 125 व्हेरियंट तेच 124.8cc वापरते, आणि त्याची किंमत ₹ 98,919 (एक्स-शोरुम, दिल्ली) आहे

प्रकाशित तारीख: ऑगस्ट 14, 2023

वारंवार विचारले जाणारे प्रश्न


होय, तुम्ही टायर्स मोठ्या साईझ मध्ये बदलू शकता, परंतु नवीन घेर आणि वर्तमान घेर मधील फरक 2% पेक्षा कमी असेल तरच. तुम्हाला बदलाविषयी इन्श्युररला देखील कळवावे लागेल, जेणेकरून तुम्हाला क्लेम रजिस्टर करणे आवश्यक असेल तर सर्व काही सुरळीत होईल.
बाईक हँडओव्हर औपचारिकता पूर्ण करताना TVS बाईक इन्श्युरन्स पॉलिसी बाईकच्या मूळ मालकाकडून ट्रान्सफर केली जाऊ शकते. तुम्हाला त्याविषयी इन्श्युररला सूचित करणे आवश्यक आहे. तथापि, जर तुम्हाला नवीन बाईक इन्श्युरन्स पॉलिसी घ्यायची असेल किंवा दुसऱ्या इन्श्युरन्स प्रदात्याकडे स्विच करायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. कोणत्याही प्रकारे, तुमच्या बाईकला इन्श्युअर्ड करणे आवश्यक आहे.
हे तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरवर अवलंबून असते. तथापि, तुमच्या TVS अपाचे साठी नवीन बाईक इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो कारण तुम्हाला नवीन बाईकसाठी मोठ्या कव्हरेजची आवश्यकता असू शकते.
होय, जर अँटी-थेफ्ट डिव्हाईस ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित असेल. हे कारण हे इन्श्युरन्स प्रोव्हायडरसाठी जोखीम घटक कमी करते.